जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे? – 2023 Jeevan Pramaan Patra Online Marathi information

जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे? – 2023 Jeevan Pramaan Patra Online Marathi information

जीवन प्रमाण म्हणजे काय?

जीवन प्रमाण हे भारत देशामधील आयटी अणि इलेक्ट्राँनिक क्षेत्राकडुन तयार करण्यात आले आहे.जीवन प्रमाण हा निवृत्त व्यक्तींच्या आधार कार्डशी जोडलेला जीवन प्रमाणपत्र कार्यक्रम आहे ज्याला इंग्रजीत लाईफ सर्टिफिकेट प्रोग्रँम आहे.

जीवन प्रमाणची सुरूवात कधी करण्यात आली होती?

जीवन प्रमाणची सुरूवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० नोव्हेंबर २०१४ मध्ये केली होती.

जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय?

  • हे एक अत्यंत महत्वाचे सर्टिफिकेट आहे.जे केंद्र तसेच राज्य सरकार तसेच इतर विविध संस्था कडुन दरमहा पेंशन प्राप्त करत असलेल्या व्यक्तींसाठी खासकरून बनवले गेले आहे.
  • जीवन प्रमाणपत्रास हयातीचा दाखला तसेच इंग्रजीत लाईफ सर्टिफिकेट असे देखील म्हटले जाते.
  • ज्या व्यक्तींना पेंशन सेवा सुविधा प्राप्त होते आहे अशा व्यक्तींनी जीवन प्रमाणपत्र काढणे बंधनकारक असते.
  • लाइफ सर्टिफिकेटसाठी आपल्याला स्वताला देखील पुरावा म्हणून कार्यालयात हजर राहावे लागत असते.
  • पहिले आपणास वर्षातून एकदा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये वैयक्तिकरित्या स्वता जीवन प्रमाणच्या कार्यालयात तसेच बँकेत जावे लागायचे अणि आपण हयातीत आहे म्हणजेच आपण जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागायचा.
  • पण आता तसे राहीले नाहीये आता आपण ऑनलाइन देखील आपल्या हयातीचा पुरावा देऊ शकतो.

जीवन प्रमाणपत्र कधी काढावे लागते?

 

जीवन प्रमाणपत्र हे पेंशनर व्यक्तींनी दरवर्षी नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यात काढणे फार गरजेचे असते.

जीवन प्रमाणपत्र काढणे का महत्वाचे असते?

जे व्यक्ती हे लाईफ सर्टिफिकेट काढत नाही त्यांची पेंशन बंद देखील केली जाऊ शकते.म्हणुन आपली पेंशन सुरू ठेवण्यासाठी पेंशनर्सने हे जीवन प्रमाणपत्र दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये आवर्जुन काढायलाच हवे.

See also  NPS वर प्राप्त होणारे कर लाभ =Tax Benefit On NPS In Marathi

पेंशनर व्यक्तीला जीवन प्रमाणपत्र कोण देत असते?

पेंशनर व्यक्ती ज्या सरकारी आँफिस तसेच कार्यालयामध्ये संस्थेमध्ये कामाला होता त्या कार्यालयातील उच्च अधिकारी त्या पेंशनर व्यक्तिला जीवन प्रमाणपत्र देत असतात.

जीवन प्रमाणची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?

https://jeevanpramaan.gov.in/ ही जीवन प्रमाणची आँफिशिअल वेबसाइट आहे.जे व्यक्ती वयस्कर आहेत शारीरीक दृष्टया दुर्बल,कमजोर आहेत जे स्वता आँफिसात चालत जाऊन आपल्या जिवंत असल्याचे प्रमाण देऊ शकत नही.कार्यालयात गर्दीत तासनतास उभे राहु शकत नही

त्यांना आपला हयातीचा पुरावा इंटरनेटच्या माध्यमातुन आँनलाईन सादर करता यावा म्हणुन ही आँनलाईन वेबसाइट केंद्र सरकार कडुन बनविण्यात आली आहे.

जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे?how to get life certificate online in Marathi

  1. जीवन प्रमाणपत्र आपण जवळील सीएससी सेंटरवर जाऊन काढु शकतो किंवा स्वता देखील आँनलाईन ही प्रमाणपत्र काढु शकणार आहे.
  2. जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी आपण सर्वप्रथम जीवन प्रमाणच्या आँफिशिअल वेबसाइटला व्हिझिट करायचे आहे.https://jeevanpramaan.gov.in/
  3. जीवन प्रमाणच्या आँफिशिअला वेबसाइटला व्हिझिट केल्यावर होम पेजवर गेल्यावर आपणास मेन्युमध्ये download असे आँप्शन दिसुन येईल त्यावर आपण क्लीक करायचे आहे.
  4. डाऊनलोडवर क्लीक केल्यावर आपण खाली ईमेल आयडी मध्ये आपला ईमेल आयडी टाकायचा आहे.
  5. खाली दिलेला कँप्चया कोड देखील कँप्चया मध्ये टाकुन घ्यायचा आहे.अणि खाली दिलेल्या आय अंँग्री डाउनलोड ह्या आँप्शन वर क्लीक करायचे आहे.
  6. यानंतर आपण सुरूवातीला ईमेल आयडी मध्ये जो ईमेल टाकला आहे त्या ईमेल आयडीवर एक ओटीपी सेंड केला जाईल.तो आपणास जीवन प्रमाणच्या वेबसाइटवर जाऊन सबमीट करायचा आहे.
  7. ईमेल सेक्शन मधील प्रायमरी अपडेट मध्ये जाऊन आपण हा आलेला नवीन ओटीपी चेक करू शकतो.
  8. ईमेल मध्ये सेंड केलेला ओटीपी आपल्याला जीवन प्रमाणच्या वेबसाइट वर जाऊन जसाच्या तसा टाईम करायचा आहे.किंवा आपण हा ओटीपी ईमेलमधुन काँपी करून जीवन प्रमाणच्या वेबसाइट वर जाऊन डायरेक्ट पेस्ट देखील करू शकतो.
  9. ओटीपी सबमीट केल्यावर आपल्यासमोर दोन आँप्शन येत असतात.डाऊनलोड फाँर विंडोज ओएस अणि डाउनलोड फाँर मोबाइल अँप.यापैकी आपण कुठलेही एक आँप्शन निवडु शकतो.
  10. डाऊनलोड फाँर विंडोज आँप्शन निवडल्यावर आपण त्यावर क्लीक केल्यावर आपल्या ईमेल आयडी वर एक ईमेल पाठविला जातो.ज्यात ईमेलमध्ये जीवनप्रमाण कडुन आपणास दोन लिंक पाठवल्या जातात.
  11. यात पहिली लिंक आहे जीवनप्रमाण इंस्टाँलर इथे आपण क्लीक केले तर आपली जीवनप्रमाणची फाईल डाउनलोड होत असते.ज्यांच्याकडुन पहिल्या लिंकवरून फाईल डाऊनलोड नही झाली ते दुसरया लिंकचा वापर देखील करू शकतात.
  12. झीप फाईल एक्सट्रक्ट करण्यासाठी आपण डेस्क टाँपवर राईट क्लीक करून एक्सट्रँक्ट आँल ओव्हर वर क्लीक करायचे आहे.अणि शेवटी इंटर केल्यावर आपली फाईल एक्सट्रँक्ट होऊन जाईल.
  13. एक्सट्रँक्ट करून फोल्डर मध्ये प्रवेश केल्यावर जीवन प्रमाणची जी exe फाईल दोन हजार केबीचे एक छोटेसे साँफ्टवेअर आहे त्याच्यात आपल्याला डेव्हपमेंट करायची आहे.
  14. हे छोटेसे साँफ्टवेअर इंस्टाँल केल्यावर आपण इंस्टाँल नेक्सट करून घ्यायचे आहे.
  15. ज्यांचे माँरफो डिव्हाइस आहे त्यांनी दुसरे आ़ँप्शन सिलेक्ट करायचे आहे.अणि आपले माँरफो डिव्हाइस नसेल तर ते काढुन नेक्सट करून आपण दुसरे डिव्हाइस इंस्टाँल करू शकतो.
  16. साँफ्टवेअर इंस्टाँल केल्यानंतर ते साँफ्टवेअरचे चिन्ह आपणास दिसुन येईल त्यावर डबल क्लीक करून ते साँफ्टवेअर ओपन करायचे आहे.
  17. अणि समजा साँफ्टवेअर ओपन नही झाले बायोमँट्रिक डिव्हाइस नाँट कनेक्टेड असा इरर आला तर आपल्याला आपले बायोमँट्रिक डिव्हाइस जे काही असेल ते कनेक्ट करून घ्यायचे आहे.कनेक्ट केल्यावर डिव्हाइस अटँच फ्रेमवर्क रेडी असे नाव आपणास दिसुन येईल.
  18. साँफ्टवेअर इंस्टाँल करून झाल्यानंतर आपल्याला काही महत्वपूर्ण माहीती भरायची आहे ज्यात साँफ्टवेअर आँथेंटिकेशन मध्ये साँफ्टवेअर आँपरेटरची माहीती भरायची आहे.म्हणजे जो व्यक्ती हे साँफ्टवेअर चालवतो आहे त्याने आपली माहीती भरायची आहे.पेंशनरची नाही.
  19. साँफ्टवेअर आँपरेटर माहीतीमध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर,इमेल आयडी,मोबाईल नंबर टाकुन घ्यायचा आहे.
  20. यानंतर जनरेट ओटीपी वर क्लीक केल्यावर पेंशनरच्या मोबाइलवर एक ओटीपी सेंड केला जाईल तो इथे इंटर करून घ्यायचा आहे.
  21. ओके केल्यावर जो व्यक्ती साँफ्टवेअर चालवतो आहे त्याने स्वताचे नाव टाकायचे आहे.
  22. जर पेंशनर स्वता साँफ्टवेअर चालवत असेल तर तो त्याचे नाव आँपरेटर मध्ये टाकु शकतो.अन्यथा नही.
  23. आँपरेटरने त्याचे नाव टाकल्यावर स्कँन फिंगरवरती ओके करायचे आहे.अणि आपला अंगठा स्कँन करून घ्यायचा आहे.अंगठा स्कँन करून झाल्यानंतर आँथेंटिकिशन डन सक्सेसफुली असे नाव येईल.
  24. बायोमँट्रिक आँथेंटिकेशन स्कँन करून झाल्यावर पुन्हा आपल्याला ते साँफ्टवेअर ओपन करायचे आहे.यानंतर आपणास पेंशनरचे जीवन प्रमाण काढता येईल.
  25. आता ज्या व्यक्तीचे जीवन प्रमाण काढायचे आहे त्याचा इमेल आयडी आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर टाकायचा आहे.अणि जनरेट ओटीपी वर क्लीक करायचे आहे.
  26. जनरेट ओटीपी वर क्लीक केल्यानंतर आपण जो पेंशनरचा मोबाइल नंबर टाकला होता त्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी येईल.तो ओटीपी टाकुन आपण ओके करायचे आहे.
  27. यानंतर आपल्यासमोर पेंशनरची पुर्ण माहीती ओपन झालेली दिसुन येईल ज्यात पेंशनरचे नाव,पेंशनर टाईप,टाईप आँफ पेंशन,एजंसी एजंसी टाईप इत्यादी सर्व माहीती असते.जर ही माहीती आँटोमँटिकली नही आली तर आँपरेटरने पेंशनरला विचारून व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
  28. पेंशनर रिइम्पलाँई असेल किंवा रिमँरीज आहे का असे विचारले जाईल त्यात यस नो करून हो का नही ते सांगायचे आहे.
  29. यानंतर आय अंँग्रीवर क्लीक करून स्कँन फिंगरवर क्लीक करायचे.अणि पेंशनरच्या अंगठयाचा ठसा घ्यायचा आहे.पहिल्यांदा स्कँन नही झाला तर आपण दुसरयांदा अंगठा स्कँन करू शकतो.
See also  अमेरिकेतील पहिली रिपब्लिकन बॅक अयशस्वी का ठरली?जेपी मॉर्गन कडुन रिपब्लिकन बॅकेचे अधिग्रहण का करण्यात आले आहे? Why First Republic Bank failed in Marathi

फिंगर यशस्वीपणे स्कँन झाल्यावर आपले जीवन प्रमाण पत्र यशस्वीरीत्या तयार झाले आहे असे समजावे.

जर आपल्याला ह्या जीवन प्रमाण पत्राचा स्क्रीन शाँट काढायचा असेल तर आपण डेस्कटाँपवर स्टार्ट मेन्यू वर जायचे आहे.स्निपिंग टुल टाईप करायचे आहे स्नीपिंग टुलमध्ये जाऊन ह्या जीवन प्रमाण पत्राचा आयडी दिलेला असेल त्याचा स्क्रीन शाँट आपण काढु शकतो.किंवा हा काँपी सुदधा करता येईल.

How to get life certificate online – Watch Video

 

जीवन प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे?

जीवन प्रमाणच्या आँफिशिअल वेबसाइट https://jeevanpramaan.gov.in/ वर जायचे अणि होमपेजवर कोपरयात एक प्रोफाइलचे आँप्शन म्हणजेच छोटेसे व्यक्तीचे चिन्ह आपणास दिसुन येईल.त्यावर क्लीक करायचे आहे.

यानंतर लाँग इन करायचे आहे लाँग इन करायला आपल्याला जीवन प्रमाण चा आयडी टाकायचा आहे.अणि खाली दिलेला कँप्चया कोड जसाच्या तसा भरायचा आहे.अणि जनरेट ओटीपी वर क्लीक करायचे आहे.

जो पेंशनरचा मोबाइल नंबर आपण जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी दिला होता.त्यावर एक ओटीपी सेंड केला जाईल.तो ओटीपी आपण येथे टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या लाँग इन आँप्शनवर क्लीक करायचे आहे.

लाँग इन केल्यावर आपणास पेंशनरचे नाव दिसुन येईल त्याच्याच खाली डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट असे एक आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लीक करून पेंशनरचे लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे.

जीवन प्रमाणपत्र आँनलाईन डाउनलोड केल्यावर कुठे जमा करायचे?

जीवन प्रमाणपत्र आँनलाईन डाउनलोड केल्यावर प्रिंट काढल्यावर पेंशनरला कुठेही जमा करायची आवश्यता नसते.ते त्याने स्वता जवळ ठेवावे.