45 Career and Job Terms That You Need To Know – नोकरी अर्जाकरता आवश्यक अशा  -इंग्रजी शब्दांची यादी  मराठीत अर्थासहित

45 Career and Job Terms That You Need To Know – नोकरी अर्जाकरता आवश्यक अशा  -इंग्रजी शब्दांची यादी  मराठीत अर्थासहित

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नोकरी करत असताना नोकरीशी संबंधित अनेक महत्वाचे इंग्रजी शब्द आपणास आॅफिसमध्ये काम करत असताना ऐकायला मिळत असतात.

हे काही असे शब्द आहेत जे आपणास माहीत असतील तर आपण आपल्या कामावरील इतर सहकारी वर्गाशी उत्तम रीत्या संवाद साधु शकतो.

पण यांचा अर्थ माहीत नसल्यास आपली मोठी फजिती फसगत देखील होण्याची शक्यता असते.

हे शब्द माहीत असल्यास नोकरी करताना कोणकोणते महत्वाचे शब्द आपणास ऐकायला मिळतील याचे पुर्वज्ञान आपणास होते.याने कुठल्याही ठिकाणी नोकरी करताना किंवा नोकरीला लागताना आपल्या मध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास झळकत असतो.आपल्याला आपल्या आजुबाजुला असलेल्या सहकारी वर्गाशी संवाद साधताना अडचण देखील येत नाही.

चला तर मग जाणुन घेऊया नोकरी अर्जाकरीता आवश्यक काही महत्वाचे इंग्रजी शब्द जे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.

45 Career and Job Terms That You Need To Know
  • Annual Leave -वार्षिक रजा
  • वार्षिक रजा हा रोजगार कराराचाच महत्वाचा भाग असतो.कोणत्या कर्मचारीला वर्षभरात किती दिवस कामावरून सुट्टी घेऊन घरी राहण्याची परवानगी दिली जाईल यालाच वार्षिक रजा म्हणतात.
  • Apprenticeship -शिकाऊ शिक्षण
  • ही प्रशिक्षण देण्याची महत्वाची प्रणाली आहे.यात एका विशिष्ट उद्योग व्यवसायातील इंडस्ट्रीचे उज्वल भविष्य ठरणार असलेल्या सभासदांना कामाचे प्रशिक्षण देण्यात येते.
  • यात नोकरीचे प्रशिक्षण अणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात.
  • White Collar -व्हाईट काॅलर
  • हा शब्द मुख्यत्वे मध्यम तसेच उच्च स्तरीय नोकरींसाठी वापरला जातो.यात सर्व कर्मचारी आॅफिशिअल वातावरणात राहुन काम करीत असतात.
  • Zero Hour Contract -शुन्य तास करार
  • हा कंपनी अणि एका विशिष्ट व्यक्तीमध्ये घडुन येणारा एक प्रकारचा करार असतो यात नियोक्ता कंत्राटदारास किमान तास प्रदान करण्यासाठी बांधिल राहत नाही.
  • Trade Union – व्यापारी संघ तसेच संघटना,
  • ट्रेड युनियन ही कुठल्याही कंपनी मध्ये काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाची एक विशिष्ट संघटना असते.
  • ही संघटना कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारीला चांगले वेतन प्राप्त व्हावे,कामावर चांगली वागणुक दिली जावी इत्यादी करीता नियोक्ताशी वाटाघाटी करण्याचे काम करते.
  • Application Tracking System – अर्ज ट्रॅकिंग सिस्टम
  • हे एक असे साॅफ्टवेअर आहे ज्याचा वापर कंपनीमध्ये जाॅब प्रोफाइलशी जुळत असलेले सर्वोत्तम रिझयुम ओळखण्यासाठी अणि अपात्र अर्जदारांना फिल्टर करण्यासाठी केला जातो.
  • याचसोबत ओपन पोझिशनशी संबंधित माहितीसाठी रेझयुम स्कॅन करायला देखील याचा वापर केला जातो.
  • Compensation Package -भरपाई पॅकेज
  • हा कुठल्याही कंपनीच्या वतीने त्यांच्या कंपनीत काम करत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गाला प्रदान करण्यात येणारा लाभ आहे.
  • यात कर्मचारीचे वेतन,पीटीओ,कंट्रीब्युशन अणि इतर लाभ समाविष्ट असतात.
  • Offer Letter – आॅफर पत्र
  • हे एक पत्र असते जे नियोक्ता आपल्या कंपनीत कामाला लागलेल्या कर्मचारीला देत असतो यात पदावर जाॅईन झाल्याची तारीख,रोजगारात दिले जाणारे फायदे,अणि रोजगार अटी समाविष्ट असतात.
  • Cover Letter – कव्हर पत्र
  • हे एक पत्र असते जे कुठलाही उमेदवार नोकरीसाठी अर्ज करताना आपल्या बायोडाटा सोबत देत असतो.
  • आपण सदर पदावर नोकरी करण्यासाठी पात्र कसे ठरतो हे ह्यात उमेदवार स्पष्ट करत असतो.
  • Deduction – कपात
  • ही एक विशिष्ट रक्कमेची कपात असते जी कंपनींमध्ये काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाच्या वेतनातुन केली जात असते.
  • याने कर्मचारी वर्गाचे करपात्र उत्पन्नात घट होत असते.अणि कर्मचारी वर्गाचे दायित्व देखील कमी होत असते.
  • Employee – कर्मचारी
  • कर्मचारी हा कंपनीत कामाला असलेला एक विशिष्ट व्यक्ती असतो.जो कंपनीत काम करतो त्याबदल्यात कंपनी त्याला वेतन देत असते.
  • Maternity Leave – प्रसुती रजा
  • ही एक प्रसुती रजा असते जी कंपनीत कामाला असलेल्या महिला कर्मचारी वर्गाला प्रेगनेंसी प्रसुती काळादरम्यान कंपनीकडुन देण्यात येते.
  • Minimum Wage – किमान वेतन
  • हा नियोक्ता आपल्या कर्मचारी वर्गाला अदा करत असलेला किमान तासाचा दर असतो.
  • Overtime -जादा वेळ
  • कंपनीत कामाच्या निर्धारित करण्यात आलेल्या तासिकेपेक्षा अतिरिक्त काम करणे अधिक तास काम करणे.
  • Pension – पेंशन
  • हे जेव्हा कुठलाही कर्मचारी कामावरून निवृत्त होत असतो तेव्हा त्याला कंपनीकडून निवृत्तीनंतर दिले जाणारे ठाराविक मासिक वेतन आहे.
  • Outsourcing – आऊटसोर्सिंग
  • ही एक प्रक्रिया असते ज्यात कंपनीतील काही कार्ये सर्विसेस पुर्ण करण्यासाठी कंपनीच्या बाहेरील दुसरया व्यक्तीला तसेच संस्थेला नियुक्त केले जाते.
  • Leave -. रजा
  • कुठल्याही कर्मचारी वर्गाला कामावर अनुपस्थित राहण्यासाठी देण्यात येणारी परवानगी असते.
  • Internship – इंटर्नशीप
  • हा नियोक्ताकडुन काही मर्यादित कालावधीसाठी कर्मचारी वर्गाला दिला जाणारा कामाचा विशिष्ट अनुभव असतो.अनेक कंपन्या एजन्सी आपल्या कंपनीत काम करण्यासाठी कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी नवोदित पास आऊट विद्यार्थ्यांना इंटर्नशीप आॅफर करत असते.
  • Hiring Manager – नियुक्ती व्यवस्थापक
  • हा एक असा विशिष्ट व्यक्ती असतो जो कंपनीत काही विशिष्ट पदांवर कर्मचारी वर्गाची भरती करण्यासाठी नवीन कर्मचारींची नियुक्ती करत असतो.
  • Contract Of Employment – रोजगाराचा करार
  • हा कर्मचारी आणि नियोक्ता यांच्यात झालेला एक विशिष्ट करार असतो यावर या दोघांची स्वाक्षरी केलेली असते.यात कर्मचारी अणि नियोक्ता या दोघांच्या अधिकार अणि जबाबदारी नमुद केलेल्या असतात.
  • Breaks –
  • ही काही तासांची रजा असते जी कर्मचारी वर्गाला आपल्या कामावरून दुर जाण्यासाठी दिली जाते.
  • इतर इंग्रजी शब्द अणि त्यांचा अर्थ –
  • Employment -रोजगार‌ नोकरी
  • Recruitment – भरती
  • Employer – नियोक्ता
  • Employee – कर्मचारी
  • Colleagues – सह कर्मचारी
  • Vacancy – जागा
  • Resignation – राजीनामा
  • Perk – सुविधा
  • Promotion – पदोन्नती
  • Sack – काढुन टाकणे
  • Work Load – कामाचा भार
  • Suspend – निलंबित करणे
  • Sick Leave – आजारपणातील सुटटी
  • Paternity Leave -पितृत्व रजा
  • Interview – मुलाखत
  • Interviewer -मुलाखत घेणारा
  • Work Place – कार्यस्थळ
  • Trainee – प्रशिक्षणार्थी
  • Full Time – पुर्णवेळ
  • Part Time – अंशकालीन
  • Salary – वेतन पगार
  • Increment – वेतन वृदधी
  • Applicant – अर्जदार
  • Blue Collar – शारीरिक मेहनतीचे काम करणारे
  • Retirement – सेवानिवृत्ती
See also  मालेगाव येथे मनपामध्ये फायरमन अग्नीशमन विमोचक पदाच्या 50 जागांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू- Malegaon Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi