AI कृत्रिम बुद्धिमता म्हणजे काय?- AI and IoT Marathi information
ह्यात कृत्रिम यंत्र ला मानवी बुद्धिमता, भावना आणि मानवी स्वभाव प्रमाणे वागण्याचं प्रशिक्षण दिले जाते
थोडक्यात काय तर AI म्हणजे संगणकचा असा कार्यक्रम जो मानवप्रमाणे स्वतःच्या अनुभवां वरून वागू , शिकू शकेल आणि स्वतः निर्णय घेऊ शकेल. यंत्राने मानवप्रमाणे वागावं असे ह्या टेक्नॉलॉजी चा उद्देश आहे.
टेक्नॉलॉजीत येऊ घातलेल्या क्रांतीमुळे लवकरच आपल्या दैनंदिन व्यवहारात AI artificial intelligence मोठया प्रमाणावर उपयोग होण्यास सुरवत होणार आहे. भविष्य हे स्वयंमचलीत उपकरणाच असणार हे नक्की.
टेस्ला ची नवीन इलेक्ट्रिक कार, अलेक्सा , गुगल चे स्मार्ट वॉचेस चा आज बऱ्या पैकी वापर वाढला असून. अशीच नवीन स्मार्ट उपकरण ,दैनंदिन काम, ऑफिस ची काम शैक्षणिक, वैदकीय सेवा आणि वाहन उद्योगातमोठे तांत्रिक बदल घडवून आणण्यास सज्ज झाले आहे AI टेक्नॉलॉजी आज सज्ज होत आहे.
अलेक्सा च उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. अमेझॉन ने निर्मित केलेले हे उपकरण virtual assistant म्हणजे आभासी मदतनीस जे मनुष्यास मदत करते. अलेक्सा ला मानवी बोलणं समजन्याचं प्रशिक्षण दिलेले असल्याने ते आपण दिलेल्या सूचना ,काम सहजरित्या करते, जसे संगीत उपकरण सुरू करणे, अलार्म लावणे, घरातील लाइट्स लावणे.
आपल्याला जगप्रसिध्द ऐबो रोबोकुत्रा बद्दल नक्कीच वाचलं पाहिजे, हा रोबोकुत्रा सोनी कंपनी ने निर्मित केला असून मानवी चेहरे ओळखून संवाद सुद्दा साधतो.
AI चे प्रकार: AI and IoT Marathi information
- प्रतिसदात्मक यंत्र-सर्वात जुना प्रकार AI
- मर्यादित स्मरणशक्ती
- मानवी मन- AI कॅटेगरीत मोठया प्रमाणावर संशोधन सुरू असून, आपण बऱ्याच सायन्स फिक्शन मुव्हीज मध्ये पाहिलेलं आहे ज्यात मशीन मानव इच्छा आणि निर्णय नुसार काम करते.
- स्वयंसिद्ध किंवा स्वजाणीव- हा AI प्रकार निर्माण करणे शात्रज्ञान चं स्वप्न असून हा सर्वात आधुनिक प्रकार असणार आहे ,ह्यात यंत्र ना स्वयंसिद्ध आणि स्वजाणीव प्राप्त करून देण्यासाठी संशोधन सुरू आहे.
Al टेक्नॉलॉजि चे फायदे
- AL हे मानवी त्रुटी ,चूका कमी करून अचूकता वाढवेल, वैदकीय क्षेत्रात हे वरदान ठरत आहे.
- AL टेकक्नॉलॉजी आधारित उपकरण आपल्याला दैनंदिन काम जसे ऑनलाइन खरेदी, साफसफाई , घरातील लहानसहान काम करण्यास मदत करेल.
- स्वयंशासित वाहनांमुळे माणसाचा प्रवास जास्त सुखकारक होऊन ,माणसाला स्वतः वाहन चालवण्याची गरज नसेल
- ऑनलाइन खरेदीत AL आभासी मदतनीस मानवी कस्टम केअरची जागा घेऊन ग्राहकाना मदत करतील
- AL आभासी शिक्षक , मानवी शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांआया अडचणी सोडवण्यास मदत करते .
IoT म्हणजे काय? – AI and IoT Marathi information
इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ज्यात उपकरणे बिनतारी wirless यंत्रणेद्वारे एकमेकांना जोडली जाऊन माहिती ची देवाणघेवाण करतात. ह्यात माहितीदेवाणघेवाण करता मानवी हस्तक्षेपा ची गरज पडत नाही.
उपकरणे हे संवेदक म्हणजे sensor किंवा सॉफ्टवेअर म्हणजे कार्यप्रणालीद्वारे जोडलेली असतात.
IoT चे उदाहरणे उपयोग आणि फायदे
- येणाऱ्या काळात iot आपण दळणवळण आणि संवाद क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवुन आणणार आहे
- आज प्रत्येक सेकंद गणिक 127 नवीन उपकरण iot ला जोडली जात आहेत.
- वैदकीय क्षेत्रात इमर्जन्सी ICU त वैद्यकिय उपकरण हाताळणे
- Mind AI नावाचे थर्मोस्टेट द्वारें , घरातील तापमान नियोजन, माणसच्या वागणूक आकलन करून Ac संचालित करू शकेल
- स्मार्ट होम- ह्याद्वारे घरातले टीव्ही ,वॉशिंग मशीन , वातानुकूलित मशीन किंवा आपले दरवाजे खिडक्या सुद्दा iot द्वारे संचालित केले जातील
- वाहकविराहित वाहन- जसे गुगल ची Waymo सेल्फड्रायविंग चे प्रयोग सुरू असून लवकरच ती रस्त्यावर उतरेल.
- स्मार्ट वॉचेस- ह्या आजकाल बऱ्याच प्रचिलीत आणि लोकप्रिय झाल्या असून , आपल्या झोपेचा पॅटर्न,हृदयाची स्पंदन, व्यायाम चा अभ्यास करून आपल्याला आपल्या आरोग्य विषयी माहिती देईन.
वरील माहिती वरून आपण अंदाज बांधू शकतो की येणारा काळ हा AI आणि IOT चा असणार असून टेस्ला ,गुगल आणि ऍपल सारख्या कंपनींनी नि ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब सुरू केलेला असून मानवी जीवनात ह्या तंत्रज्ञान द्वारे अमुलाग्र बदल येणार आहे.
AI and IoT Marathi information )
ECOVACS Deebot 500 Robotic Vacuum Cleaner with App & Voice Control, Strong Suction and Multiple Cleaning Modes, Self-Charging for Carpets & Hard Floors,Work with Alexa (Black)
Introducing Echo Show 5 – Smart display with Alexa – 5.5″ screen & crisp sound (Black)
अभिवृद्धी म्हणजे काय