कोविड-19 दुसरी लाट – न्यूयॉर्क सिटी करणार भारताला मोठी मदत


Biodata in Marathi

न्यूयॉर्क दुसर्‍या कोविड-19 च्या लाटेच्या दरम्यान वैद्यकीय साहित्याचा पुरवठा भारतात पाठवणार असे तेथील महापौरांनी सांगितले.

न्युयाँर्कचे महापौर बिल डे ब्लँसिओ यांनी शुक्रवारी स्थानिक वेळेत जाहीर केले की न्युयाँर्क शहर आवश्यक तो वैदयकीय पुरवठा भारतात पाठवणार आहे.भारतीयांना कोरोना व्हायरसच्या दुसरया लाटेसोबत संघर्ष करण्यासाठी मदत मिळावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आपल्या केलेल्या विधानानुसार बिल डे ब्लँसिओ म्हणाले आहे की न्युयाँर्क आपल्या साठवणीतील कोविड -१९ टेस्ट किट,स्वँब,व्हेंटीलेटर,बिपँप मशिनस,पल्स आँक्झीमीटर,तसेच अशा अनेक इतर वैदयकीय साहित्याचा पुरवठा भारतात पाठवणार आहे.

तसेच ते म्हणाले की काही वर्षापुर्वी न्युयाँर्क शहर हे जागतिक महामारीचे मुख्य केंद्र होते.अणि आता हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे की आम्ही भारताला ह्या संकटाच्या काळात मदत करावी.आम्ही भारतात काही महत्वाची वैद्यकीय उपकरणे पाठवत आहोत.

हा संदेश देण्यासाठी की कोणीही ह्या कोरोना विरुदधच्या संघर्षात एकटे नाहीये.सर्व मिळुन एकत्रितपणे आपण सगळयांचे जीव वाचवणार आहोत अणि कोरोना विरूदध लढा देऊन त्यावर मात देखील करणार आहोत.

भारताचे वाणिज्य महासंचालक रणधीर जयस्वाल यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे की,न्यूयॉर्क सिटीने भारत सरकारला दिलेल्या ह्या उदार भेटीबाबत आम्ही त्यांचे फार मनापासुन आभार मानतो अणि त्यांनी केलेल्या कार्याचे आम्हाला मनापासुन कौतुक देखील आहे.

न्यूयॉर्कने दान केलेले व्हेंटिलेटर, बीआयपीएपीज आणि टेस्टिंग किट भारतातील साथीच्या आजारांशी लढण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.पाठविला जाणारा पुरवठा अमेरिकन सरकारने भारताला पुरविलेल्या भरीव मदतीमध्ये आणखी भर घालेल.या महान शहराने दाखविलेली सहानुभूती खरच वाखाणण्याजोगी आहे.

Today we announced that New York City will tap into its stockpile to send #COVID19 test kits, swabs, ventilators, BiPap machines, pulse oximeters, and other medical supplies to India. @NYCMayor @nycgov https://t.co/iSkUKMZA2b

— Commissioner Dave A. Chokshi, MD (@NYCHealthCommr) May 14, 2021

How to Write the Perfect Resume: Stand Out, Land Interviews, and Get the Job You Want Kindle Edition

The Resume Writing Guide: A Step-by-Step Workbook for Creating a Winning Resume Kindle Edition

अभिवृद्धी म्हणजे काय

See also  हिमोफिलिया रोग काय आहे, तो कसा होतो, लक्षणे आणि उपचार? | Haemophilia Disease Info in Marathi


पुस्तके – बयोडेटा