एव्हियन फ्लू – Avian Influenza or Bird Flu information in Marathi –

Avian Influenza or Bird Flu in Marathi –

देशात वाढत आहे Avian Influenza रोगाचे पेशंट,आजच जाणून घ्या या रोगासंबंधी सर्व माहिती –

आजकाल देशातील काही राज्यामध्ये Avian Influenza रोगाचा खतरा वाढत आहे.या रोगामुळे देशातील खूप लोक त्रस्त झाले आहेत.तसे तर ह्या रोगाचा खतरा सरळ माणसांना होत नाही , परंतु कोंबड्या किंवा पक्ष्यांच्या माध्यमातून हा रोग मानवांमध्ये पसरू शकतो आणि वेळेवर उपचार झाले नाही तर, ह्या रोगामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला या Avian Influenza रोगाविषयी माहिती माहीत असणे गरजेचे आहे.

Avian Influenza or Bird Flu information in Marathi –


मागील काही दिवसांपासून Avian Influenza रोगाचे म्हणजेच बर्ड फ्ल्यू चे पेशंट आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये सापडत आहेत.या राज्यांमध्ये महाराष्ट्र,गुजरात,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान,हरियाणा,इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

दिल्ली मध्ये देखील मेलेल्या कावळ्या आणि बदकांवरून या बर्ड फ्ल्यू ची चाचणी घेण्यात आली आहे. Avian Influenza रोगाचे म्हणजेच बर्ड फ्ल्यू चे संक्रमण मानवामध्ये होणे,खूप अवघड आहे, तरीपण आपण मानवाने या सबंधित ची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्याला या बर्ड फ्ल्यू रोगाचा खतरा होणार नाही.


चला तर पाहूया

Avian Influenza रोगाची म्हणजेच बर्ड फ्ल्यू रोगाची लक्षणे आणि तो रोग बरा करण्यासाठी करावे लागणारे उपचार –


वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन (WHO) यांच्या मते Avian Influenza हा रोग प्राण्यांमध्ये पसरणारा एक रोग आहे आणि हा रोग Influenza A च्या व्हायरस मुळे संक्रमित होतो.हा बर्ड फ्ल्यू रोग हा जास्तकरून जंगलातील पक्षांमध्ये पसरतो.आणि या जंगली पक्षातून हा रोग गावठी कोंबड्या किंवा पक्ष्यांमध्ये पसरतो.हा रोग जरी मानवांना होत नसला किंवा मानवांमध्ये पसरत नसला ,तरीही मानवांमध्ये हा रोग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण मानवांनी योग्य ती दक्षता घेतली पाहिजे.

See also  पीआयबी फॅक्ट चेक काय आहे? | PIB Fact Check


माणसांमध्ये पसरू शकतो का हा Avian Influenza (बर्ड फ्ल्यू) रोग ?


वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन (WHO) यांच्या मते Avian Influenza हा रोग जास्तकरून पक्ष्यांमध्ये पसरतो. परंतु हा बर्ड फ्ल्यू नावाचा रोग माणसांमध्ये देखील पसरू शकतो. मानवां मध्ये हा रोगाचा व्हायरस संक्रमित झाला तर त्या व्यक्तीला जोराचा ताप आणि सर्दी – खोकला येतो. ह्या रोगाचा व्हायरस मानवा मध्ये संक्रमित झाला,तर त्या व्यक्तीला उलटी येणे, यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.जर एका व्यक्तीला हा रोग झाला आणि त्या व्यक्तीने वेळेवर ह्या रोगावरती उपचार नाही केले,तर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.


कसा पसरतो हा Avian Influenza रोग ?


ज्या ठिकाणी पोल्ट्री आहे आणि तेथील मेलेल्या कोंबड्यां मुळे हा रोग मानवा मध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या पसरू शकतो.त्यामुळे पोल्ट्री मध्ये Influenza व्हायरस संबंधी संक्रमण नियंत्रित करणे गरजेचे आहे.

Avian Influenza रोगासाठी कोणत्या टेस्ट केल्या जातात ?


Avian Influenza या रोगासाठी ब्लड टेस्ट केल्या जातात .ज्या व्यक्ती मध्ये याची लक्षणे जाणवत आहेत, अशा व्यक्तींची ब्लड टेस्ट केली जाते आणि त्यावरून त्या व्यक्तीला Avian Influenza (बर्ड फ्ल्यू) आहे की नाही हे समजते.वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन (WHO) यांच्या मते RT -PCR या टेस्ट वरून देखील या बर्ड फ्ल्यू चे निदान काढता येते.या बर्ड फ्लू रोगाचे निदान काढण्यासाठी रॅपिड Influenza डायग्नोसिस टेस्ट घेतली जाते.

कशा पद्धतीने या Avian Influenza या रोगावरती उपचार केले जातात ?


ह्या रोगाच्या उपचारासाठी जास्तकरून अँटी बॅक्टेरियल औषधांचा वापर केला जातो ,जसे की न्यूरोमिनिडेज़ इन्हिबिटर औषध.हे उपचार करताना पेशंट एक आठवड्या च्या आत बरा होतो.

या

Avian Influenza सारख्या हानिकारक रोगापासून वाचण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाय योजना केल्या पाहिजेत ?


अँटी वायरल औषधांच्या वापरा व्यतिरिक्त आपण बर्ड फ्लू रोगा पासून वाचण्यासाठी खालील उपाययोजना केल्या पाहिजेत :

See also  CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर-आपले सरकार सेवा केंद्र.


१) नियमित हात साबणाने किंवा हॅण्ड वॉश ने स्वच्छ धुणे – या बर्ड फ्लू नामक रोगा पासून वाचण्यासाठी आपण आपले हात नियमित पणे स्वच्छ धुतले पाहिजेत,जेणेकरून या बर्ड फ्लू रोगाचा किटाणू आपल्या हाता पासून लांब राहील.
२) शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे – आपल्याला जेव्हाही खोकला येईल किंवा शिंक येईल,तेव्हा आपण शिंकताना किंवा खोकताना तोंडवरती रुमाल किंवा टिशू पेपर ठेवला पाहिजे.
३) आपल्याला जर बर्ड फ्ल्यू रोगाची लक्षणे आपल्या शरीरामध्ये जाणवू लागली तर ,आपण आपल्या घरातल्या व्यक्तिंपासून काही दिवस लांब राहीले पाहिजे.जेणेकरून त्यांना बर्ड फ्ल्यू चे संक्रमण होणार नाही.
४) आपण जिथे पोल्ट्री आहे ,तिथे काम नसल्यास शक्यतो जाणे टाळले पाहिजे.
५) आपण जेव्हा दुसऱ्या देशात जाणार असू तेव्हा आपण नाकाला मास्क घातला पाहिजे आणि जर शक्य असेल तर ज्या देशांमध्ये बर्ड फ्ल्यू रोगाचे पेशंट आहे , अशा देशामध्ये जाणे आपण शक्यतो टाळले पाहिजे.