भारतातील ITI कंपनीने लाँच केले नवीन लॅपटॉप आणि मायक्रो पीसी – Smaash Lapto by ITI
कमी कार्बन डायऑक्साइड ची निर्मिती करणारा, याचसोबत लाईट ची देखील बचत करणारा हा ITI कंपनीने लाँच केलेला लॅपटॉप –
आजकाल प्रत्येक घरामध्ये लॅपटॉप किंवा पीसी नक्की असतो.आपल्या घरामध्ये एक तरी लॅपटॉप किंवा पीसी असतो , म्हणजे आजकाल तर लॅपटॉप किंवा पीसी सर्वत्र लागतो.जे कोणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना लॅपटॉप हा लागतोच,ते लॅपटॉप वरती खूप शिकण्या योग्य
गोष्टी करू शकतात ,किंवा घरी बसल्या ते लॅपटॉप वरती पार्ट टाईम जॉब करून ते पैसे कमावू शकतात.
आजकालच्या लॅपटॉप च्या वाढत्या डिमांड मुळे लॅपटॉप बनविणाऱ्या कंपण्यामध्ये देखील स्पर्धा खूप वाढली आहे आणि दिवसेंदिवस या लॅपटॉप बनविणाऱ्या कंपन्या मध्ये वाढ होतच आहे,अशातच भारताची प्रसिद्ध कंपनी ITI जी की बेंगळुरू येथे स्थित आहे ,या कंपनीने देखील त्यांचे नवीन लॅपटॉप आणि मायक्रो पीसी लाँच केले आहेत.आपण या लेखामध्ये ITI ने launch केलेल्या स्मॅश नावाच्या लॅपटॉप आणि मायक्रो पीसी बद्दल माहिती पाहणार आहोत.
सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील दूरध्वनी कंपनीने घोषणा केली की ते त्यांचा लॅपटॉप किंवा मायक्रो पीसी जागतिक बाजारात लॉन्च करणार आहेत.
बेंगळुरू मध्ये स्थित असलेली कंपनी ITI ने सोमवारी घोषणा केली की,त्यांचा नवीन ब्रँड ज्याचे नाव त्यांनी स्मॅश असे ठेवले आहे .हे स्मॅश नावाचे लॅपटॉप आणि मायक्रो पीसी ITI कंपनीने लाँच केले आणि त्यांना या स्मॅश नावाच्या मायक्रो पीसी आणि लॅपटॉप च्या सेल मध्ये चांगलाच फायदा होत आहे
.ITI ने लॉन्च केलेल्या स्मॅश लॅपटॉप वरून त्यांनी भारतातील खूप लॅपटॉप बनविणाऱ्या कंपन्यांना मागे टाकले आहे.या मध्ये ITI कंपनीने लीनोवो , डेल, एच पी , इत्यादी सारख्या मोठ्या लॅपटॉप बनविणाऱ्या कंपनीना मागे टाकले आहे.
ITI कंपनीने त्यांचा हा स्मॅश नावाचा प्रोडक्ट इंटेल कंपनीच्या मदतीने लाँच केला आहे.या स्मॅश प्रोडक्ट साठी लॅपटॉप च्या डिझाइन बनवण्यामध्ये आणि लॅपटॉप च्या मोडेल बनवण्यांमध्ये एक करार झाला होता.
ITI कंपनीने हा दावा केला की,”त्यांच्या कंपनी मध्ये बनलेला मायक्रो पीसी हा बाकीच्या इतर कंपनी मध्ये बनलेल्या नॉर्मल कॉम्प्युटर सारखे काम करण्यामध्ये सक्षम आहे.
ITI कंपनीच्या मते त्यांचे अगोदर चे लॉन्च झालेले १२,००० पेक्षा जास्त पीसी यशस्वी रित्या काम करत आहेत. कंपनीने अजून एक दावा केला की,” त्यांच्या कंपनीचे लॅपटॉप आणि मायक्रो पीसी हे कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडतात, जेणेकरून पर्यावरणाला त्याचा फायदा होईल.
ITI कंपनीने लाँच केलेल्या स्मॅश नावाच्या लॅपटॉप आणि मायक्रो पीसी मुळे लाईट ची बचत देखील होते आणि ITI कंपनीचे चेअरमन असणारे राजेश रॉय यांनी दावा केला की,”ITI ने लॉन्च केलेल्या स्मॅश प्रोडक्ट ला जनते कडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हा प्रोडक्ट इतर कंपनीच्या लॅपटॉप पेक्षा चांगला आहे.”