प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक (WPFI) प्रेस फ्रीडम नेमकं काय असते?

कालच INDIA या विरोधी पक्ष गटबंधन ने काही पत्रकारांना सोबत संवाद साधण्यास बंदी घातली , काही नांमंकीत खालील पत्रकारांना बायकॉट करण्यात आले आणि  आणि पुन्हा एकदा प्रेस फ्रीडम बद्दल चर्चा सुरू झाली

प्रेस फ्रीडम नेमकं काय असते? त्याच महत्व – WPFI

प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक (WPFI) हा एक वार्षिक अहवाल आहे जो रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे दरवर्षी प्रकाशित केला जातो. हा अहवाल जगातील 180 देशांमध्ये प्रेस स्वातंत्र्याच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यात येते

प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात देशांची रँकिंग किंवा मानांकन खालील घटकांवर आधारित केली जाते:

 1. पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय
 2. पत्रकारांवर होणारे सरकारी दबाव, मुस्कटदाबी
 3. प्रसारमाध्यमांवर होणारे आर्थिक नियंत्रण
 4. प्रसारमाध्यमांवर होणारे राजकीय नियंत्रण
 5. प्रसारमाध्यमांवर होणारे सामाजिक नियंत्रण
 6. प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकाचे जगात महत्त्व खालीलप्रमाणे आहे:

हे सूचित करते की एखाद्या देशात प्रसारमाध्यमांना किती स्वातंत्र्य आहे.
हे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील आव्हानांचे निरीक्षण करते.
हे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते.
भारतातील प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक

भारताचा प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये 150 वा होता. हा गेल्या काही वर्षांत भारतातील प्रेस स्वातंत्र्यावरील हल्ल्यांमुळे घसरण झाली आहे.

प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकातील भारताच्या स्थानात सुधारणा करण्यासाठी खालील पावले उचलली जाऊ शकतात:

प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक (WPFI) प्रेस फ्रीडम नेमकं काय असते
प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक (WPFI) प्रेस फ्रीडम नेमकं काय असते
 1. प्रसारमाध्यमांवर होणारे सरकारी दबाव कमी करणे
 2. .पत्रकारांवर होणारे हल्ले आणि अन्याय रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करणे.
 3. योग्य ती कठोर पावले उचलणे
 4. प्रसारमाध्यमांवर होणारे आर्थिक नियंत्रण कमी करन्याय येईल
 5. प्रसारमाध्यमांवर होणारे राजकीय नियंत्रण कमी असायला हवे
 6. प्रसारमाध्यमांवर होणारे सामाजिक नियंत्रण कमी करणे.
See also  इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे - How To Earn Money From Instagram