बद्रीनाथ मंदिराविषयी माहिती – Badrinath temple information in Marathi
बद्रीनाथ हे मंदिर भारत देशात उत्तराखंड ह्या राज्यातील बद्रीनाथ नावाच्या एका गावात आहे.हया मंदिरात भगवान विष्णू यांचा अवतार बद्रीनाथाचे पुजन केले जाते.
बद्रीनाथ मंंदीर हे हिंदु धर्मातील सर्वात मानाच्या चार धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
बद्रीनाथ हे मंदिर उत्तराखंड राज्यातील चमोली ह्या जिल्ह्यामध्ये अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे.हया बद्रीनाथ मंदिराचा उल्लेख स्कंदपुराण विषणुपुराण इत्यादी अशा अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये देखील करण्यात आलेला आहे.
बद्रीनाथ मंंदीर हे हिंदु धर्मातील लोकांच्या अत्यंत श्रदधेचे तसेच पूजनीय स्थान मानले जाते.हे प्राचीन मंदीर विष्णू देवाला समर्पित केलेले मंदीर आहे.
हया मंदिराची निर्मिती सातव्या ते नवव्या शतकात करण्यात आली होती.शंकराचार्य यांनी हे मंदिराची स्थापना केली होती.यानंतर गढवालचा राजा हयाने ह्या मंदिरामध्ये बद्रीनाथाची मुर्ती स्थापित केली.
१८०३ मध्ये अचानक भुकंप आल्याने मंदिराची अत्यंत हानी झाली होती.त्यानंतर जयपुरच्या राजाच्या हातुन पुन्हा ह्या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.
भौगोलिक दृष्ट्या पाहावयास गेले तर हे ठिकाण हिमालय पर्वतामधील उच्च शिखरातील गढवाल क्षेत्रातील समुद्र तळापासून ३ हजार १३२ मीटर एवढ्या उंचीवर स्थित आहे.
हिवाळ्यात येथील हवामान खराब राहत असल्याने हे मंदीर वर्षातुन फक्त सहा महिन्यांसाठी एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धापर्यत भाविक तसेच यात्रेकरूंसाठी उघडले जाते.
ह्या मंदिराच्या वास्त्रु शिल्पावरून मंदिराविषयी असे सांगितले जाते की हे मंदिर आठव्या शतकापर्यंत एक बौदध मठ होते यानंतर पुढे शंकराचार्य यांनी ह्या मंदिराला हिंदु धर्मीय मंदीरात रूपांतरीत केले होते.
असे म्हटले जाते की ह्या मंदिरांचे वास्तुशास्त्र हे बौदध विहारासारखे दिसत असल्याने ह्या अगोदर इथे बौदध विहार असावे असा अंदाज वर्तवला जातो.
ह्या मंदीराची निर्मिती दगडाच्या साहाय्याने करण्यात आली आहे.मंदिरात गर्भ गृह,सभा तसेच दर्शन मंडप देखील बांधण्यात आले आहे.मंदिराच्या खिडक्या कमानी आकाराच्या आहेत.
गर्भ गृहामध्ये भगवान बद्रीनाथ यांची एक शालीग्रामची मुर्ती बसवण्यात आली आहे.गर्भगृहाचे छत हे जणु शंकुच्या आकाराचे आहे.
ही शालिग्राम मुर्ती चतुर्भुज आहे.मुरतीच्या वरचे छत सोन्याचे आहे.भगवान बद्रीनाथ यांच्या एका हातात शंख अणि एका हातात चक्र आहे.बाकीचे दोन्ही हात योगमुद्रेमध्ये मांडीवर असल्याचे दिसून येते.
मंदिराच्या गर्भगृहात नर नारायणाची,नारद, नवदुर्गा,गरूड,उद्धव, लक्ष्मी नृसिंह आदी शंकराचार्य, इत्यादींच्या मुर्त्या देखील आहेत.
दरवर्षी मुर्तीचा मेळा नावाचा एक सण उत्सव पृथ्वीचे गंगेवर झालेल्या आगमनासाठी इथे साजरा करण्यात येत असतो.याचसोबत जुन महिन्या दरम्यान इथे बदरीकेदार नावाचा अजुन एक उत्सव साजरा केला जातो.आठ ते नऊ दिवस चालणारया ह्या सण उत्सवात सहभागी व्हायला लाखो भाविक गर्दी करताना इथे दिसुन येतात.
दरवर्षी येथे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.असे मानले जाते की प्रत्येक हिंदू धर्मातील भक्तजणांना इथे एकदा तरी दर्शनासाठी यावे अशी मनोमन इच्छा असते.
ह्या मंदिराचे नाव बद्रीनाथ ठेवण्यामागे देखील एक आख्यायिका आहे.असे सांगितले जाते की भगवान विष्णू येथे तपश्चर्या करण्यासाठी बसलेले असताना त्यांना उन्ह लागत होते.तेव्हा माता लक्ष्मी हयांनी बदरीच्या झाडाचे रूप धारण करत भगवान विष्णू यांना सावली प्रदान केली होती.
तेव्हापासून बदरी वरून ह्या ठिकाणाला बद्रीनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले.
भगवान विष्णू यांच्या ह्या बद्रीनाथ मंदिरास भेट देण्यासाठी मे ते जुन महिना हा एक उत्तम कालावधी मानला जातो.सप्टेंबर आॅक्टोंबर महिन्यात देखील भाविक बरयाच प्रमाणात इथे दर्शनासाठी येतात.पण नोव्हेंबर मध्ये इथे बर्फ पडायला सुरुवात होते म्हणून पावसाळ्यात हे मंदीर सर्व भाविकांसाठी बंद ठेवण्यात येते.