बारसु रिफायनरी प्रकरण नेमकी काय आहे? ह्या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध का केला जात आहे? – Barsu refinery project controversy in Marathi

बारसु रिफायनरी प्रकरण ? Barsu refinery project controversy in Marathi

कोकणात पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्पावरून वाद पेटलेला आहे.राजापुर,बारसु सोनगाव ह्या परिसरात क्रुड आॅईल रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

असे सांगितले जात आहे की भारत सरकारला महाराष्ट्र राज्यातील पश्चिम किनारपट्टी भागात एक मेगा आॅईल प्रकल्पाची उभारणी करायची आहे.

खर पाहायला गेले तर हा रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल लिमिटेड प्रकल्प सुरू करण्याची घोषणा २०१५ मध्येच करण्यात आली होती.

याआधी हा प्रकल्प नाणार येथे सुरू करण्यात येणार होता पण तेथील स्थानिक लोकांनी अणि शिवसेनेने ह्या प्रकल्पाला विरोध दर्शवल्याने हा प्रकल्प मध्येच थांबविण्यात आला होता.

यानंतर महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेवर आले ज्यांनी हा प्रकल्प नाणार इथे न राबविता बारसु सोनगाव येथे राबविण्यात यावा असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला.

शासनाने याला आता संमती देखील दिली आहे.ठाकरे सरकार सत्तेवर असताना हा प्रकल्प पुर्ण झाला नव्हता त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प शिंदे सरकारच्या सत्तेत असताना दुसरया राज्यात गेला असा ठपका शिंदे सरकारवर पडु नये म्हणून शिंदे फडणवीस सरकार ह्या प्रकल्पाला पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हा प्रकल्प सुरू झाल्यावर बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अणि प्रदेशाचा देखील विकास होईल असे शिंदे फडणवीस सरकार कडुन सांगितले जाते आहे.

हया प्रस्तावित रिफायनरी साठी सोमवार पासुन मातीचे परीक्षण करायला सुरुवात देखील झाली होती.पण येथील स्थानिकांचा ह्या प्रकल्पाला रिफायनरीला विरोध करावयास सुरुवात केली आहे.

येथील स्थानिक लोकांचे असे मत आहे की पर्यावरणावर वाईट परिणाम होईल, ह्या रिफायनरी मधुन जे दुषित पाणी बाहेर पडेल ते नदीत मिसळल्याने नदीचे पाणी दुषित होईल.
सर्व फळझाडांची देखील नासाडी होईल.

आणि ह्या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम येथील मासेमारी व्यवसायावर पडेल त्यामुळे येथील मासेमारी व्यवसाय करणारयांनी देखील ह्या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

हा विरोध मोडुन काढायला जमावबंदीचा आदेश देखील शासनाने दिला अनेक जणांची धरपकड देखील करण्यात आली.

ह्या प्रकल्पाला राजकीय स्वरूप देखील प्राप्त झाले आहे राष्ट्रवादी अणि ठाकरे गटाकडुन ह्या प्रकल्पाला विरोध केला जात आहे तर पण भाजपला हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पुर्ण करायचा आहे.

रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय?

बाहेरच्या देशातील कच्चे खनिज तेल आणुन हे खनिज तेल तेलशुदधीकरण प्रकल्पातुन शुदध केले जाईल अणि मग पेट्रोल डिझेल ह्या रिफायनरी मधुन बाहेर पडेल.

बारसु सोनगाव मध्ये स्थानिकांकडून ह्या प्रकल्पाला विरोध का केला जातो आहे?

याआधी नाणार येथे ह्या प्रकल्पाला विरोध केला गेला आता बारसु मध्ये देखील यावरून आपणास प्रश्न हा पडतो की कोकणात ह्या रिफायनरी प्रकल्पास एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध केला केला जातो आहे.

आता हया विरोधाचे कारण आपण सविस्तरपणे जाणुन घेऊया.

बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांकडुन विरोध केला जाण्याची कारणे –

Barsu refinery project controversy in Marathi
Barsu refinery project controversy in Marathi

१) जमीन अधिग्रहणामुळे शेतीवर होणारा परिणाम –

रत्नागिरी येथील बारसु ह्या गावात रिफायनरी प्रकल्पासाठी ६ हजार २०० एकर इतकी जमीन संपादीत करणे शासनाला आवश्यक आहे यापैकी २९०० एकर इतक्या जमिनीसाठी परवानगी देखील प्राप्त झाली आहे.

पण विपुल प्रमाणात अशा प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी येथील स्थानिक लोकांचा विरोध आहे.कारण एवढ्या विपुल प्रमाणात जमीनी जर शासनाला प्रकल्पासाठी दिल्या तर येथील गावच्या लोकांच्या पारंपरिक व्यवसाय असलेल्या शेती व्यवसायाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो.

कोकणात वर्षातुन एकदा घेतले जात असलेले तांदुळ हे पीक अधिक महत्वाचे असले तरी गेल्या काही दशकात आंबे,काजु,नारळ,सुपारी यांच्या बागांमुळे कोकणाचे आधीचे चित्र बदलत चालले आहे.

ह्या सर्व नगदी पिकांमुळे शेतकरींच्या आर्थिक परिस्थिती मध्ये देखील सुधारणा होताना दिसुन येत आहे.पण रिफायनरी प्रकल्प दरम्यान ह्या जमिनी शासनाला दिल्या गेल्यावर शेतकरयांच्या सर्व फळबागा मोठया प्रमाणात नष्ट होणार आहे.म्हणुन स्थानिक शेतकरी वर्गाकडून ह्या प्रकल्पाला विरोध केला जातो आहे.

२) प्रकल्पाचा मासेमारी वर होणारा वाईट परिणाम-

मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय मानला जातो पण शासनाच्या ह्या रिफायनरी प्रकल्प मुळे होणारया प्रदूषणामुळे ह्या मासेमारी व्यवसायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिफायनरी प्रकल्पात जे दुषित पाणी बाहेर पडेल ते नदीत मिसळल्याने नदीचे पाणी दुषित होईल.अणि नदीचे पाणी दुषित झाल्याने नदीतील मासे तसेच पाण्यातील इतर जीव नष्ट होऊ शकतात असे मत येथील मासेमारी व्यवसाय करणारयांनी व्यक्त केले आहे.

ह्या प्रकल्पात केल्या जात असलेल्या जहाज वाहतुकीमुळे मासेमारांचा पारंपरिक वहिवाटाचा हक्क देखील गमावला जाऊ शकतो.

म्हणजेच कोळी लोकांचा पोटापाण्याचा व्यवसाय बंद पडण्याची चिन्हे निर्माण होतात म्हणून येथील स्थानिक मासेमारांकडुन ह्या प्रकल्पाला विरोध केला जातो आहे.

३) पर्यावरणाला निर्माण होणारा धोका –

बारसु रिफायनरी ह्या प्रकल्पासाठी एक टर्मिनस बांधले जाणार आहे.हया टरिनलस दवारे आखातातुन शुदध तेल आणले जाणार आहे.अणि शुदध केलेले तेल वाहुन नेण्याचे कार्य केले जाणार आहे.

हे टर्मिनस अंगोळगड येथील समुद्र किनारा जवळ बांधले जाणार आहे.बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री याने सादर केलेल्या एका अहवालात असे दिले आहे की अंघोळगढ किनारयाच्या परिसरात जैवविविधता उच्च दर्जाची अणि विपुल प्रमाणात आहे.

माशांच्या प्रजोत्पादनासाठी हा किनारा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ह्या अहवालात नमूद केले आहे.पण रिफायनरी प्रकल्प जर ह्या परिसरात उभारला गेला तर हवा पाणी अन्न तिन्ही ठिकाणी प्रदूषण निर्माण होणार आहे.

रिफायनरी प्रकल्पामुळे अंगोळगड किनारा जो मासेमारी करीता नंदनवन मानला जातो इथे माश्यांच्या उत्पतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

४) कोकणाच्या निसर्ग संपन्नतेला निर्माण होणारा धोका-

कोकण हा पश्चिम घाट जैवविविधतेच्या बाबतीत जगात टाॅपला असलेल्या प्रदेशाचा भाग म्हणून ओळखला जातो.

येथील समुद्र आणि सहयाद्रीची उंच रांग ह्यामुळे कोकणाला निसर्ग सौंदर्य प्राप्त होते.पण येथील जैवविविधतेला पोहोचत असलेल्या हानीमुळे हया निसर्ग सौंदर्याला देखील धोका निर्माण होण्याची भीती निर्माण होते.

शासनाने आतापर्यत स्थापित केलेल्या विविध समीतींनी देखील ही बाब मांडली होती.पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी स्थापित करण्यात आलेल्या कसतुरीरंगन गाडगीळ अशा दोन समितींनी रिफायनरी सारखा प्रदुषण कारी प्रकल्प आणण्यासाठी विरोध केला होता.

इको लाॅजिस्ट यांचे असे मत आहे की कोकणात रिफायनरी सारखा प्रकल्प आला तर येथे प्रदुषणाची लाट निर्माण होईल असे मत मांडले आहे.

पण शासनाने ग्रीन रिफायनरी प्रकल्प असल्याने कुठलेही प्रदुषण होणार नसल्याचा दावा केला आहे पण येथील सर्वसामान्य स्थानिक नागरीक शासनाचे हे आश्वासन स्वीकारण्यास अजिबात तयार होत नाहीये.

५) समृदध संस्कृतीचा होणारा नायनाट –

रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या संस्कृतीला हानी पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.येथील हजारो वर्षे जुना ऐतिहासिक ठेवा धोक्यात येईल असे येथील स्थानिकांचे मत आहे.हा ठेवा आहे काताळशिलप.

बारसु भागात पठारावर काताळशिलप आहे.फार‌ जुने दहा हजार वर्षांपूर्वीचे आहे असे येथील लोकांकडुन म्हटले जाते.
बारसु सोबत येथील नऊ ठिकाणांना युनेस्कोने सुचिबदध केलेल्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे येथील स्थानिक लोकांचे मत आहे की विकासाच्या नावाखाली आमचा येथील हजारो वर्षे पुर्वीच्या स्थानिक वारसा नष्ट होऊ शकतो.

६) प्रकल्प राबविण्यासाठी वापरला जाणारा अलोकशाही मार्ग –

आपल्या भारत देशात लोकशाही अस्तित्वात असल्याने ज्या भागात कुठलाही प्रकल्प ज्या भागात राबविला जात आहे तेथील लोकांना ह्या प्रकल्पात समाविष्ट करून घेणे गरजेचे असते.

पण येथील स्थानिकांचे असे मत आहे की बारसु भागात हा प्रकल्प आणणयाआधी शासनाकडुन येथील स्थानिकांना यात सामिल करून घेण्यात आले नाहीये तसेच येथील स्थानिकांचे म्हणने देखील ऐकून घेण्यात आले नाहीये.म्हणजेच सदर प्रकल्पासाठी अलोकशाही मार्गाचा अवलंब केला गेला आहे असे येथील स्थानिकांचे म्हणने आहे.