बांग्लादेश मधील आर्थिक संकटाविषयी माहीती – Bangladesh economical crises information in Marathi

बांग्लादेश मधील आर्थिक संकट- Bangladesh economical crises information in Marathi

मित्रांनो जेव्हापासून कोरोनाचा शिरकाव आपल्या सर्वाच्या जीवणात झाला तेव्हापासुन रशिया युक्रेन संकटानंतर संपुर्ण जगभरातील आर्थिक परिस्थिति हळु हळु ढासळु लागली आहे.

श्रीलंका,नेपाळ पाकिस्तान या देशांमध्ये आलेले आर्थिक संकट तर आपल्याला सर्वाना माहीत आहे.महागाई वाढली,पेट्रोल डिझेलचे भाव वाढले,नागरीकांना जीवणावश्यक वस्तुंचा तुटवडा पडु लागला अशा अनेक समस्या ठिकठिकाणी निर्माण झाल्या.

ज्याचे परिणामस्वरूप लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला ज्याचे परिणाम स्वरूप लोकांकडुन सत्तेला विरोध होताना दिसु लागला अणि जागोजागी सत्तापरिवर्तन देखील होताना आपणास येथे पाहायला मिळाले.

पण आता हीच समस्या भारताचा शेजारील देश बांग्लादेश मध्ये देखील निर्माण होताना आपणास दिसुन येत आहे.यासमस्येवर तोडगा काढण्यासाठी बांग्लादेश कडुन भारताचा सल्ला मागितला जात आहे.

भारताने पेट्रोल अणि डिझेलच्या किंमतीवर नियंत्रण कसे ठेवले?आपण रूसमधुन इतक्या स्वस्त दरात तेल कसे मागवितात? अशी विचारणा बांग्लादेश भारताला ह्या आर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी करीत आहे.

बांग्लादेश मधील सध्याची आर्थिक परिस्थिति कशी आहे?

बांग्लादेश मध्ये इंधनाचे पेट्रोल डिझेलचे भाव,दर अधिक वाढवण्यात आल्यामुळे येथे आज मोठया आर्थिक संकटाची परिस्थिति निर्माण झाली आहे.

पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपच्या समोर लोकांची लांबलचक गर्दी पाहायला मिळते आहे.ज्याचे परिणाम स्वरूप बांग्लादेश मधील संतप्त जनता सरकार सदर परिस्थिति नियंत्रणात आणण्यास असमर्थ आहे असे गृहित धरून सरकारला दोष देत आहे.

ह्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून बांग्लादेश सरकारविरूदध प्रदर्शने,घोषणाबाजी देखील करत आहे.

See also  राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस २०२३ काय आहे, महत्त्व, इतिहास । National Safe Motherhood Day In Marathi

एवढेच नव्हे तर पोलिसांच्या वाहनाची देखील संतप्त जनतेकडून काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे.

बांग्लादेश मधील आर्थिक संकटाचे मुख्य कारण काय आहे?

या याबत आपण अधिक सविस्तर पणे जाणुन घेऊया

मित्रांनो डाँलरच्या तुलनेमध्ये बांग्लादेशी चलन टका मध्ये 20 टक्क्यांपर्यत घट झालेली आहे.ज्यामुळे आता बांग्लादेशी चलनात होणारया पैशाच्या देवाणघेवाणीत व्यवहारात म्हणजेच पेमेंटमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे.

ज्याचे परिणाम स्वरूप जिथे लोकांना एखाद्या वस्तुसाठी 100 रूपये द्यावा लागत होते तिथे त्यांना 120 रूपये त्या वस्तुसाठी द्यावा लागत आहे.

म्हणजेच कमी वस्तुंची खरेदी करायला जास्त पैसे देण्याची वेळ आली आहे.सोबतच जीवणावश्यक वस्तुंचा तुटवडा भासु लागल्याने वस्तुंची मागणी अधिक वाढणार आहे अणि मागणी वाढली की महागाई देखील वाढणारच.ज्याचे परिणाम स्वरूप लोकांच्या उत्पन्नावर देखील नकारात्मक प्रभाव पडणार आहे.अणि साहजिकच आहे जीवणावश्यक वस्तु महागाई मुळे खरेदी करता न आल्याने संतप्त होऊन जनता सरकारविरूदध रस्त्यांवर घोषणाबाजी,आंदोलन करणारच.

म्हणुन आता बांग्लादेश मधील 10 टक्के असा डिझेल पाँवर प्लाण्ट जिथून डिझेलने वीजेची निर्मिती केली जाते तो बंद करण्यात आला आहे.

कारण बांग्लादेशातील चलन टका देशाची आर्थिक स्थिति कमजोर झाल्याने डाँलरच्या तुलनेत कमी पडत आहे.

येथील फाँरेक्स रिझर्व देखील कमी होत आहे.अणि फाँरेक्स रिझर्व कमी झाल्याने पेमेंटची समस्या निर्माण झाली आहे.

तसेच बांग्लादेशी चलनात लागोपाठ घट होत आहे.म्हणुन सेंट्रल बँकेने 11 महिन्यात 5.7 मिलियन डाँलर इतकी रक्कम टकाला सपोर्ट करायला गुंतवली आहे.जेणेकरून येथील स्थानिक चलन मजबूत होईल.

जगातील अर्थव्यवस्थेचे समीकरण कधीपासुन बिघडले?

रशिया युक्रेन युदधाचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहे?

बांग्लादेश मध्ये जवळजवळ 50 टक्के इतकी पेट्रोल अणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.असे म्हटले जात आहे की ही दरवाढ बांग्लादेश मधील आतापर्यतची सर्वाधिक दरवाढ आहे.

बांग्लादेशची निर्मिती झाल्यापासुन आतापर्यतच्या कालावधीची ही सर्वाधिक दरवाढ मानली जात आहे.

See also  नीरज चोप्रा कोण आहे? World Athletics championship 2023 winner Neeraj Chopra

मित्रांनो संपुर्ण जगभरात गँस अणि पेट्रोलचा पुरवठा करण्यात रशियाचे खुप मोठे योगदान आहे.पण आता जेवढे सेंक्शन रशियावर लागले त्याचा परिणाम इतर देशांवर होताना आपणास दिसुन येत आहे.

कारण आधी रशियाकडुन ज्या देशांमध्ये तेलाचा पुरवठा केला जात होता.ते देश आता गल्फ मधुन तेल मागवू लागले आहेत.ज्याचा संयुक्त परिणाम हा अनेक देशातील खाद्यपदार्थावर अणि पर्यटन व्यवसायावर देखील झाला आहे.

म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर जगातील अर्थव्यवस्थेचे पुर्ण समीकरणच रशिया युक्रेन युदधानंतर बदलताना दिसुन येत आहे.

बांग्लादेश मधील पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढले आहेत?

बांग्लादेश मधील पेट्रोलचे भाव सध्या 113 वरून 135 टका इतके झाले आहे.

बांग्लादेश ह्या आर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना करत आहे?

● बांग्लादेशने ह्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी यावर मात करण्यासाठी प्
पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वस्त दरात तेल मिळवण्यासाठी काय करावे असा भारताकडे सल्ला मागितला आहे

● बांग्लादेश ह्या परिस्थितुन बाहेर पडण्यासाठी चीनकडुन आर्थिक मदत मागत आहे.

● याचसोबत ह्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी बांग्लादेश एशियन डेव्हलपमेंट बँक तसेच वल्ड बँककडे देखील मदत मागत आहे.

● पण कुठुनच आर्थिक मदत प्राप्त होत नसल्याने बांग्लादेशने शेवटी आय एम एफ कडुन मदत मागितली आहे.