ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा का करावी?ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचे महत्व काय आहे? – Trambakeshwar Pradakshina to Brahmagiri puja and vidhi

ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा-

Trambakeshwar Pradakshina to Brahmagiri puja and vidhi

ब्रम्हगिरी हा सहयाद्रीच्या पर्वत रांगेमधील विशाल पर्वत आहे.सहयाद्री पर्वतास पुराणात सात मुख्य पर्वर्तांपैकी एक असे म्हटले गेले आहे.

सगळयात जास्त ज्योतिलिंग आपणास सहयाद्री पर्वतावरच आढळुन येतात.

नाशिक नजीकच्या त्रयंबकेश्वर ह्या तीर्थस्थान असलेल्या ठिकाणी म्हणजेच त्रयंबकेश्वर गावाच्या मागे हा विशाल पर्वत वसलेला आहे.

शिवशंकराच्या बारा ज्योतीलिंगात त्रयंबकेश्रर हे ठिकाण देखील समाविष्ट आहे.म्हणुन श्रावण महिना आला की श्रावणी सोमवारमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी त्रयंबकेश्वर येथे आपणास पाहायला मिळते.

प्रत्येक श्रावण सोमवारी भाविक ब्रम्हगिरीस प्रदक्षिणा घालतात.अणि तिसरया सोमवारी तर भाविकांची खुपच प्रचंड गर्दी असते.

दक्षिण भारतातील सर्वाधिक पवित्र अणि महत्वपूर्ण मानली जाणारी गोदावरी ही नदी ब्रम्हगिरी ह्या पर्वतावरच उगम पावताना आपणास दिसून येते.

असे म्हटले जाते तसेच भाविकांची अशी श्रदधा आहे की इथे साक्षात शिवाचे वास्तव्य आहे.आजवर घडुन गेलेल्या अनेको महान त्रषी मुनींनी,संतानी ह्या ब्रम्हगिरी पर्वतावरच आपली तपश्चर्या केली आहे.

ह्या विषयी अनेक पौराणिक कथा आख्यायिका देखील आपणास वाचायला मिळतात.म्हणुन जे भाविक त्रयंबकेश्वर येथील ज्योतिलिंगाचे दर्शन घ्यायला येतात ते ह्या ब्रम्हगिरी पर्वताला सुदधा आवर्जुन भेट देत असतात.

श्रावण महिन्यात पावसाळयाच्या दिवसात येथील सौदर्य एकदम बघण्याजोगे असते.म्हणुन निसर्गाचा आनंद प्राप्त करायला निसर्गप्रेमी आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन इथे येतात.

देशभरातुन वेगवेगळया राज्यातील शिवभक्त येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात येत असतात.कारण श्रावनात ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करणे अधिक शुभ मानले जाते.

त्रयंबकेश्वर येथे श्रावन महिन्यात सोमवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचे खुपच महात्मय आहे.अणि पुराण काळापासुन ब्रम्हगिरी प्रदक्षिणा ही खुपच प्रचलित आहे.

ही प्रदक्षिणा पुण्य मिळवायला तसेच आपले जुने पाप नष्ट करण्यासाठी लोक करत असतात.आधी पुराणकालात ही प्रदक्षिणा शिक्षा म्हणुन घातली जात असे.पुराणात असे देखील म्हटले आहे की ज्याने ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा केली त्याला संपुर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते.

निवृत्तीनाथ महाराज यांना देखील ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करत असतानाच योगीराज गहिनीनाथ यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता.ज्यातुन भागवत धर्माची स्थापणा झाली होती.

ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचे प्रकार कोणकोणते आहेत?

ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचे एकुन तीन प्रकार तसेच मार्ग आहेत-

1)हरी हर ब्रम्हगिरी प्रदक्षिणा

2) ब्रम्हगिरी प्रदक्षिणा

3) अंजनेरी पर्वत/इंद्रपर्वत प्रदक्षिणा -लहान/मोठी प्रदक्षिणा

 • पण तिघा प्रदक्षिणांमध्ये सर्वात छोटी प्रदक्षिणा ही अधिक प्रसिदध आहे.ही प्रदक्षिणा सुमारे 20 ते 22 किमी एवढे अंतर असलेली आहे.कारण ही अवघ्या सात ते आठ तासाच पुर्ण होत असते.
 • मोठी प्रदक्षिणा ही 35 ते 37 किमी एवढया अंतराची आहे.ह्या प्रदक्षिणेच्या मार्गास हरिहर ब्रम्हगिरी म्हणुन ओळखतात.
 • तिसरया मार्गाचे अंतर सुमारे 58 किमी इतके आहे.अणि हा अंजनेरी पर्वतास प्रदक्षिणा मारून पुढे येतो.
 • अंजनेरी पर्वत प्रदक्षिणेत ब्रम्हगिरी पर्वतास प्रदक्षिणा घातली जात असते.यात ब्रम्हगिरी पर्वतास फेरी मारणे साधले जाते.सुमारे वीस ते पंचवीस किमी इतक्या अंतराचा हा संपुर्ण मार्ग आहे.
 • ही प्रदक्षिणा मारायला पहाटे सुर्योदयापुर्वी उठावे लागते कुशावर्तावर स्नान करून अणि त्रयंबकेश्वराचे दर्शन करावे अणि मार्गक्रमणास आरंभ करावा.
 • म्हणजेच साधारणत सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान प्रदक्षिणेस सुरूवात करण्यात येते.
 • सुर्योदय होत असेल तेव्हा प्रयाग तिर्थास वळसा घालुन पेगलवाडी मार्गे सृष्टीच्या सौदर्याचा आस्वाद घेत,महादेवाच्या नावाचा जप करत सात्विक मनाने ही फेरी मारली जाते.
 • प्रदक्षिणेच्या मार्गामध्ये अनेक तीर्थ लागत असतात ज्यात प्रयाग तीर्थ,नागातीर्थ,रामतीर्थ,नरसिंह तीर्थ,सरस्वती तीर्थ,बाणगंगा धवलगंगा तीर्थ इत्यादी तिर्थाकडे भाविकांचे लक्ष वेधले जाते.जिथे भाविकांच्या सोबतीस असतात देखील मंदिरे नदया.
 • प्रदक्षिणेच्या दरम्यान गौतम टेकडी उतरून झाले की नमस्कार करण्याची जागा लागते.प्रथेनुसार पंचमुखी शिवस्वरूप ब्रम्हगिरीला पुर्वाभिमुख होऊन भाविकांकडुन येथे साष्टांग नमस्कार केला जात असतो.
 • सकाळपासुन प्रदक्षिणेला आरंभ करून झाल्यानंतर इथे भाविकांचा अर्धा प्रवास संपतो.येथुन भाविकांना ब्रम्हगिरीचे विलोभनीय दर्शन होत असते
 • श्रावण महिन्यास आरंभ होताच महिनाभर प्रदक्षिणा घालणारे भाविक ह्या मार्गावर मार्गक्रमण करीत असतात.

ब्रम्हगिरी पर्वतावरील निसर्गरम्य वातावरण –

ब्रम्हगिरी पर्वतावर श्रावण महिन्यात निसर्गाचा निरागस अणि पावन स्वच्छ चेहरा भाविकांना येथे पाहावयास मिळतो.

दोघे बाजुंनी असलेले डोंगर धुक्यांनी झाकलेले दिसुन येते.आपण उभे असताना पावसाचे आपल्या दिशेने येणे काही क्षणांत आपल्या अवती भोवती पाऊस पडत असल्याची अनुभुती होणे हा अनुभव आपणास ह्या प्रदक्षिणे दरम्यान प्राप्त होत असतो.

ब्रम्हगिरीची फेरी मारायला जाताना खाण्या पिण्यास सोबत काही घेऊन जावे का?

श्रावण सोमवारच्या दिवशी जर आपण ब्रम्हगिरी पर्वतास फेरी मारायला जाणार असु तर खाण्या पिण्याच्या वस्तु सोबत नेण्याची कुठलीही आवश्यकता नाही.

कारण सोमवारी येथे खुप गर्दी असल्याने चहाच्या टपरया जागोजागी येथील स्थानिक लोकांनी विक्रीसाठी लावलेल्या असतात येथे भाविकांसाठी खाण्यापिण्याची वस्तुंची विक्री देखील केली जात असते.

पाण्याच्या बाटल्या पण विकायला असतात.खाण्यासाठी भजी वडा पेयांमध्ये लिंबु सरबत ज्युस उसाचा रस हे सर्व काही उपलब्ध असते.

पण जर आपला बेत सोमवार सोडुन इतर दिवशी येथे जाण्याचा असेल तर खाण्यापिण्याची सोय करून जाणे कधीही उत्तम ठरेल.

जाताना कोणकोणत्या वस्तु घेऊन जाव्यात?

येथे जाताना रस्त्यात पावसाचे थेंब लागणारच आहे म्हणुन एखादा हलकासा रेनकोट जवळ ठेवायचा.मोबाईल पाण्यात भिजु नये म्हणुन मोबाईलसाठी एक कव्हर जवळ ठेवायचे.

एखादी बँग जवळ ठेवली तरी चालेल पण चालताना तिचे वजन आपणास पेलवणार नाही इतकी ती भरून घेऊ नये.

किंवा आपल्याजवळ रेनकोट नसल्यास आपण फेरीला आरंभ करण्याआधी त्रयंबकेश्वर येथील मंदिरातुन एखादी घोंगडयासारखी प्लास्टिकची पिशवी विकत घेऊन घ्यावी.

वयोवृदध व्यक्तींना चालायला त्रास होऊ नये म्हणून ते सोबत आधार म्हणुन एखादी लाकडाची काठी दुकानातुन विकत घेऊ शकतात.

भाविकांनी काय करू नये?

फेरीत दारू वगैरे पिऊन धांगडधिंगा घालु नये खुप तरूणांकडुन कारण असे प्रकार येथे घडताना दिसून आले आहे.अणि असे तरूण आढळुन आले तरी भाविकांनी त्यांच्याकडे लक्ष देत आपली फेरी अर्धवट सोडु नये.

भाविकांनी आपल्याकडुन निसर्गाला कुठलीही बाधा पोहचणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कुठेही रस्त्यावर बाटली प्लँस्टिक पिशवी तसेच इतर कचरा टाकु नये.

रस्त्यावरील झाडे झुडपे तोडु नये.कुठल्याही गरीब शेतकरयाचे पीक आपल्या पायदळी तुडवले जाणार नाही त्याचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

स्थानिक ठिकाणची लहान मुले पैशांची मागणी करत असतील तर पाच दहा रूपये आपल्या कुवतीनुसार त्यांना श्रदधेने देऊन टाकायला हवे कारण असे म्हणतात देवाच्या दारी कोणाला दुखवू नये.अणि लहान मुले तर देवाघरची फुले असतात मग त्यांना दूखवून कसे चालेल तसेच त्यांच्याशी गैरवर्तन देखील भाविकांनी करू नये.

बाहेरगावाहुन प्रवास करून येणारयांनी काय करावे?

अशा भाविकांनी सर्वप्रथम नाशिकरोड येथील रेल्वे स्थानकावर उतरावे.

मग तिथुन बस किंवा रिक्षा करून सीबीएसपर्यत यावे.

सीबीएसवरच आपणास फेरी साठी येणारया भाविकांसाठीच्या नेमलेल्या बसेस मिळुन जातील.

ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा भाविकांकडुन तिसरया सोमवारीच का विशेषकरून घातली जाते?

मित्रांनो असे म्हटले जाते की ब्रम्हगिरी प्रदक्षिणा ही श्रावणी सोमवारच्या तिसरया दिवशी केल्यास अधिक फलदायी ठरते.

तिसरया सोमवारी ह्या प्रदक्षिणेस संध्याकाळी आरंभ होतो.

आधी पहिल्या दोन श्रावण महिन्यातील सोमवारी त्रयंबकैश्वर येथे भाविकांची खुपच गर्दी असायची.अणि श्रावण उतरणीला लागल्यावर तिसरया सोमवारच्या दिवशी फेरीस विशेष प्राधान्य दिले जात होते.

नाशिक तसेच औरंगाबाद येथील भाविक ह्याच तिसरया सोमवारी फेरीसाठी अधिक करून यायचे.यानंतर हळुहळु तिसरया सोमवारचे महत्व उदयास येऊ लागले.

अणि मग 1996 नंतर लाखोच्या संख्येत तिसरया सोमवारी भाविक फेरीसाठी येऊ लागले.तेव्हापासुन दरवर्षी श्रावण महिन्यात तिसरया सोमवारी प्रचंड संख्येत भाविक येथे फेरीसाठी जाण्याची प्रथा सुरू झाली.

ब्रम्हगिरी ह्या पर्वतास ब्रम्हगिरी असे नाव का पडले?

आपणा सर्वानाच माहीत आहे की ब्रम्हगिरी हा पर्वत शिवस्वरूप आहे.हा ब्रम्हगिरी पर्वत स्वयंभु पंचमुखी शिवलिंगी आहे.

आधी हा पर्वत शिवगिरी ह्या नावाने ओळखला जायचा पण असे म्हणतात की ब्रम्हाने ह्या पर्वतावर तपश्चर्या केली अणि महादेवास प्रसन्न केले.

तेव्हा ब्रम्हाच्या तपस्चर्येने प्रसन्न झालेल्या महादेवाने ब्रम्हाला असे वरदान दिले की तुमचे नाव धारण करूनच मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन तेव्हापासुन ह्या पर्वताचे नाव ब्रम्हगिरी पर्वत असे पडले.

ह्या पर्वताला एकुण पाच शिखरे आहेत.ज्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते.

ब्रम्हगिरीचे महात्मय –

जर आपण अंतकरणपुर्वक ब्रम्हगिरीचे दर्शन घेतले तर आपणास मृत्युनंतर मोक्ष प्राप्त होत असतो.ह्या ब्रम्हगिरी पर्वताचा महिमा संत नामदेव यांनी त्यांच्या अभंगात देखील वर्णिलेला आहे.

अशा ह्या पवित्र अणि शिवस्वरूप ब्रम्हगिरी पर्वताची परीक्रमा करायला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आपले तीर्थरूप विठठलपंत,मातोश्री रूक्मिनी,त्यांची बहिण मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज,ह्या सर्वासोबत ह्या ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा मारायला आले होते.

Leave a Comment