भारतातील तीर्थ स्थळांबद्दल माहिती (चारधाम, जोतिर्लिंग,सप्तपुरिया, नद्या .पर्वत सरोवर) – Bharat Mukhya Tirth Sthal

चार धाम –- Bharat Mukhya Tirth Sthal

भारतातील पवित्र नद्या –

  • गंगा –भारतात गंगा नदीला प्राचीन काळापासून आईचे स्थान दिले आहे.गंगा ही आपली एक आईच आहे.काशी जिल्यातील गंगोत्री शिखरवरील गोमुख हे गंगेचे उगमस्थान आहे.ऋषिकेश, हरिद्वार,प्रयाग,काशी,पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेली मुख्य शहरे आहेत.गोमुख पासून तर गंगासागर पर्यन्त गंगा नदीचे 1550 किलोमीटर चे अंतर आहे.
  • यमुना – यमनोत्री शिखर हे यमुना नदीचे उगमस्थान आहे.दिल्ली,मथुरा,वृंदावन, आग्रा ही यमुनेच्या काठी वसलेली मुख्य शहरे आहेत.यमुना नदी प्रयाग मध्ये गंगेत मिळून पुढे गंगासागर पर्यन्त जाते.
  • सिंधू – तिबेट मध्ये स्थित कैलाश मानसरोवर जवळ सिंधू नदीचा उगम होतो.तिबेट मध्ये 250 किमी,कश्मीर मध्ये 550 किमी आणि 2380 किमी पाकिस्तान मध्ये अशी मिळून सिंधू नदी 3180 किमी इतकी आहे.मोहन जोदडो आणि हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या काठीच वसली होती.
  • सरस्वती -सरस्वती नदीचा उगम हिमालायमध्ये होतो.हरियाणा,राज्यस्थान, गुजरात या मधून सिंधू नदी अरबी समुद्रात विलीन होते.
  • गंडकी – गंडकी नदीचा उगम नेपाळ मधील दामोदर कुंड मध्ये होतो.बिहार राज्यात गंडकी नदी गंगेला मिळते.
  • ब्रम्हपुत्रा – पवित्र मानसरोवर जवळ ब्रम्हपुत्रा नदीचे उगमस्थान आहे.ब्रम्हपुत्रा नदीच्या काठी टेजपुर,गुवाहाटी, डिब्रुग्ध, शिवसागर वसली आहेत ह्या नदी ची लांबी 2900 किमी इतकी आहे.
  • नर्मदा – अमरटंक मध्ये नर्मदा नदीचा उगम होतो.नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर, मानधाता,शुक्ल तीर्थ ,भेदघाट, जबलपूर, कपिलधारा ,इत्यादी वसले आहेत.ह्या नदीची लांबी 1300 किमी इतकी आहे.
  • गोदावरी – ब्रम्हगिरी मध्ये गोदावरी नदीचा उगम होतो.गोदावरी नदीच्या काठी पंचवटी, पैठण,राजमहेंद्री, भद्राचलम,नांदेड,कोटा ,पल्ली ,इत्यादी वसले आहेत.ह्या नदीची लांबी 1450 किमी इतकी आहे.
  • कृष्णा – कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे होतो.कृष्णा नदीच्या काठी सातारा,सांगली,रायपूर,विजयवाडा, नागार्जुन सागर वसले आहेत.ह्या नदीची लांबी 1380 किमी इतकी आहे.
  • कावेरी – कुर्ग जिल्ह्यात ह्या नदीचा उगम होतो.कावेरी नदीच्या काठी शिव समुद्रम,श्रीरंगम, तंजबूर, कुंभकोणम,त्रिचिरापल्ली,इत्यादी वसले आहेत.ह्या नदीची लांबी 800 किमी इतकी आहे.
  • महानदी – मध्यप्रदेश मधील सिंगावा पर्वत हे महानदी चे उगमस्थान आहे.महानदी च्या काठी रायपूर, बस्तर,बिलासपूर वसले आहेत.ह्या नदीची लांबी 860 किमी इतकी आहे.

पंच सरोवर- Bharat Mukhya Tirth Sthal –

हिंदू संस्कृती नुसार खालील 5 सरोवर पवित्र आहेत.

  • बिंदू सरोवर -दोन बिंदू सरोवर आहेत. भुवनेश्वर मधील बिंदू सरोवर वह्या मध्यभागी विशाल मंदिर आहे.सिद्धपुर मध्ये स्थित असलेल्या बिंदू सरोवराची मान्यता मातृ श्राद्ध ला जास्त आहे.
  • नारायण सरोवर -कच्छ च्या रणामध्ये असणाऱ्या पवित्र अशा नारायण सरोवर मध्ये गंगोत्री मधून पवित्र जल आणले आहे.कार्तिक पोर्णिमेवेळी येथे मोठी जत्रा भरते.सरोवर च्या जवळ गोवर्धन नाथ,नारायण मंदिर आहेत.
  • पंपा सरोवर -तुंगभद्र नदीच्या दक्षिणेकडे हा सरोवर स्थित आहे.दक्षिण भारतात जाण्यापूर्वी भगवान श्री राम यांनी या सरोवराजवळ विश्राम केला होता.ह्याचा जवळ शबरी गुफा आहे.
  • पुष्कर सरोवर – राज्यस्थान मध्ये स्थित पुष्कर झिल ला सर्वात पवित्र मानले जाते.असे म्हणतात की ब्रम्हाणे या सरोवराची स्थापना केली होती.अजूनही ह्या सरोवर जवळ ब्रह्मांची विशाल मंदिरं आहे.पुष्कर सरोवर जवळ लगभग 400 मंदिरे आहे,म्हणून या ठिकाणाला मंदिरांची नगरी देखील म्हणले जाते.
  • मानसरोवर -हे तिबत च्या पठारावर्ती स्थित सरोवर आहे.या सरोवराचे पाणी अगदी शुद्ध आहे.सरयु आणि ब्रम्हपुत्रा नदीचे उगमस्थान मानसरोवरालाच मानले जाते.ह्याच्याजवळच गोरी कुंड आहे.ह्याची मान्यता शक्ती पिठाच्या रुपात देखील आहे.
See also  आपले मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण काय करावे -Tips for mental health

सप्त पर्वत –

  • हिमालय पर्वत – हे जगातील सर्वात मोठे पर्वत आहे आणि येथे देवीदेवतांचा वास आहे.येथे खूप साऱ्या नद्यांचा उगम होतो.हिमालय पर्वतावर बद्रीनाथ,केदारनाथ, कैलाश,मानसरोवर,वैष्णो देवो,अमरनाथ,इत्यादी पवित्र स्थळे आहेत. भारतात हिमालय पर्वताची 2400 किमी लांबी आणि 400 किमी रुंदी आहे.
  • अरवली पर्वत – दिल्ली पासून सुरवात होऊन ही पर्वतमाला हरियाणा,राज्यस्थान व गुजरात मध्ये गेली आहे.हा ओरवंत महाराणा प्रतापांच्या शौर्याची गाथा सांगणारा पर्वत आहे आणि जगातील प्राचीन पर्वतांपैकी एक पर्वत आहे.
  • विंधचल पर्वत – मध्यवर्ती भागात गुजर्स पडून ते बिहार पर्यन्त हा पर्व पसरलेला आहे.हया पर्वताची लांबी 100 किमी इतकी आणि उंची 700 मी आहे.ह्या पर्वतामध्ये चंबल, वेतवा, केन,क्षिप्रा,बनास, सोन,इत्यादी नद्या उगम पावतात.महाकाल मंदिर ह्या पर्वतामध्ये स्थित आहे.
  • रेवतक पर्वत -गुजरात राज्यातील काठियावड जिल्ह्यात ही पर्वत माला स्थित आहे.भगवान शंकरांनी येथे निवास केला होता.जैन लोकांचे पवित्र स्थान असलेले शत्रूंजय येथेच स्थित आहे.
  • महेंद्र पर्वत – हा ओडिशा चा एज प्रमुख पर्वत आहे,जो की गजाम जिल्ह्यात आहे.समुद्र सपाटीपासून याची उंची 1500 मी इतकी आहे.ह्या पर्वतावरील गोकणेशवर मंदिर सर्वात प्रमुख मंदिर आहे.भगवान परशुराम ह्याच पर्वतावर राहतात.ह्या पर्वताचा उल्लेख महाभारतामध्ये केला आहे.
  • मलय पर्वत(निलगिरी पर्वत) – तमीनळाडू मध्ये हा पर्वत स्थित आहे.येथे चंदनाची खूप झाडे आहेत.खूप ऋषी येथे तपस्या करण्यासाठी येतात.या पर्वतावर खूप साऱ्या औषधी वनस्पतींची झाडे आहेत.
  • सह्याद्री पर्वत – महाराष्ट्र,कर्नाटक राज्यांमध्ये सह्याद्रि पर्वत पसरले आहे.गोदावरी,कृष्णा,कावेरी या नद्यांचा उगम या पर्वतावर झाला आहे.सह्याद्री पर्वत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगतो.ब्रम्हा ने सृष्टीच्या निर्माणापूर्वी येथे यज्ञ केला होता.

चार धाम –

  • बद्रीनाथ – बद्रीनाथ धाम हे भारतातील सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.ह्याची ओळख सतयुगाय नारायणाने, त्रेतायुगात दत्तात्रेय यांनी आणि कलियुगात आदिशनकाराचार्य यांनी वाढवली.हिवाळ्यात बद्रीनाथ मंदिरातील प्रतिमा जोशींमठ येथे आणली जाते आणि इथेच तिची पूजा केली जाते.
  • रामेशवरम – तमिळनाडू राज्यात रामनाथापूरम जिल्ह्यामध्ये एका द्वीपवर हे पवित्र स्थळ स्थित आहे.ह्याची स्थापना प्रभू श्री रामांनी केली म्हणूनच याचे नाव रामेशवरम पडले.
  • दवारीका धाम – आदिशनकाराचार्य यांनी गुजरात मध्ये या धमची स्थापना केली.
  • जगन्नाथ पुरी – जगन्नाथ पुरी ओडिशा मधील गंगासागर च्या काठावर स्थित आहे.हे एक शक्तीपीठ ही आहे.येथे श्रीकृष्ण,बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्त्या स्थापित आहेत.जगन्नाथ पुरी पासून 18 किमी च्या अंतरावर साक्षी गोपाल मंदिर आहे.ह्या मंदिराच्या दर्शन च्या विना जगन्नाथ पुरीची यात्रा अधुरी आहे.
See also  सार्वजनिक सेवेचा अधिकार म्हणजे काय? - Right to public service meaning in Marathi

मोक्षदायिनी सप्तपुरिया –- Bharat Mukhya Tirth Sthal

  • अयोध्या – भगवान श्री रामाचा जन्म आयोध्यामध्ये झाला होता.सरयु नदीच्या काठावर वसलेले अयोध्या एक प्राचीन शहर आहे.ब्रम्ह ने याची यात्रा केली होती आणि ब्राह्मकुंड ची स्थापना देखील केली होती.येथे हनुमान गढी,कनक भवन,सीता रसोई,नाग्रेशवर मंदिर ,शिव मंदिर ,इत्यादी पवित्र स्थळे आहेत.रामघाट, स्वर्गदवार, जानकी घाट,लक्षण घाट यांसारखे घाट अयोध्येत सरयु नदीच्या काठी आहेत.
  • मथुरा -मथुरा यमुनेच्या किनारी वसलेली पवित्र नगरी आहे.ह्याची स्थापना भगवान श्री रामांच्या भावाने त्रेतायुगामध्ये लवणासुर ला मारून केली होती.श्री कृष्ण यांचा जन्म मथुरेत झाला होता, येथे विक्रमादित्य यांनी बांधलेले भव्य कृष्ण मंदिर देखील आहे.
  • हरिद्वार – हरिद्वारला मायापुरी किंवा गंगाद्वार असेही म्हंटले जाते.पवित्र गंगा येथूनच मैदानी भागामध्ये प्रवेश करते.हरिद्वारमध्ये कुंभ मेळा प्रत्येक 12 वर्षांनी भरतो.
  • काशी – हे पूर्व उत्तर प्रदेश मध्ये गंगा नदीच्या काठी आहे.हे एक शक्तीपीठ आहे.काशीला वाराणसी देखील म्हटले जाते.भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश येथे असलेल्या सारनाथ मध्ये दिला.येथे मणिकर्णिका घाट,केदारघाट, हनुमान घाट ,इत्यादी पवित्र घाट आहेत.
  • दवारीक पुरी – महाभारत,हरिवंश पुराण,वायूपुरान, भागवत मध्ये दवारीक पुरीचे वर्णन आहे.येथे भव्य मंदिर आहे ज्याला की द्वारकाधीश म्हणतात.
  • कांची पुरम – कांची पुरम तमिळनाडू राज्यात आहे.जगद्गुरू शंकराचार्य यांनी कामकोटी पीठाची स्थापना येथेच केली होती.
  • अवंतिका (उजेन) – अवंतिका हे मध्यप्रदेश मध्ये स्थित आहे.ह्याला आता उजेन असे म्हणतात.येथे महाकालेशवर जोतिर्लिंग मंदिर आहे.

12 जोतिर्लिंग –

  • केदारनाथ जोतिर्लिंग – केदारनाथ जोतिर्लिंग गढवाल येथे समुद्रसपाटीपासून 6940 मी च्या उंचीवर आहे.येथे सदैव बर्फ असतो.केदारनाथच्या जवळून मंदाकिनी नदी वाहते,जी की पुढे जाऊन भागीरथी ल मिळून गंगा बनते.येथे जवळच गोरी कुंड आहे जिथे की देवी पार्वती ने स्नान केलेले.
  • काशी विश्वनाथ जोतिर्लिंग – विश्वनाथ जोतिर्लिंग काशी (उत्तर प्रदेश) मध्ये स्थित आहे.भगवान शंकरांना काशी खूप प्रिय आहे आणि हे प्राचीन तीर्थ क्षेत्र आहे.काशी नगरी चे वर्णन खूप साऱ्या पवित्र ग्रंथामध्ये केलेले आहे.
  • सोमनाथ जोतिर्लिंग – सकमनाथ जोतिर्लिंग काठियावड मध्ये स्थित आहे.ऋग्वेद,स्कंद पुराण, श्रीमद भागवत,शिव पुराण, महाभारत,इत्यादी पवित्र ग्रंथामध्ये या जोतिर्लिंग चे वर्णन आहे.गुजरात च्या महाराजा भीम यांनी याचा पुनर्वसन केले.हे जोतिर्लिंग खूप वेळा तोडण्यात आले आणि खूप वेळा त्याचे पुनर्वसन केले.
  • मल्लिकार्जुन जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग श्रीशैल्य पर्वतावर स्थित आहे.येथे पार्वतीला मल्लिका आणि शंकराला अर्जुन असे नाव दिले होते.महाभारत ,शिव पुराण मध्ये या जोतिर्लिंग चे वर्णन आहे.
  • महाकालेश्वर जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग क्षिप्रा नदीचह काठी स्थित आहे.भगवान शंकरांनी त्रिपुरासुर चा वध येथेच केला होता.
  • ओंकारेशवर जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग नर्मदा नदीच्या काठावर स्थित आहे.प्रतापी पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला होता.
  • त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग गोदावरी नदीच्या काठी स्थित आहे.नाशिक हे त्र्यंबकेश्वर पासून 10 किमी दूर आहे.हा जोतिर्लिंग सर्व इच्छा पूर्ण करणारा म्हणून ओळखला जातो.ह्याच्या जवळ गंगा मंदिर,परशुराम मंदिर,गायत्री मंदिर आहेत.
  • वैद्यनाथ जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग झारखंड मधील देवघर मध्ये स्थित आहे.मुख्य मंदिर 27 फूट उंच आणि ह्याबरोबर येथे 22 अन्य मंदिरे आहेत.हे मंदिर भगवान विश्वकर्मा यांनी बनवले आहे,अशी मान्यता आहे.ह्याजवळ छोटे शिवकुंड नावाचे सरोवर आहे.
  • नागेश्वर जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग तीन स्थानावर स्थित आहे.द्वारका जवळ,महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेश मध्ये हे जोतिर्लिंग स्थित आहे.ह्याजवळ वेणीनाग,कालिया सारख्या नागांची ठिकाणे असल्यामुळे याला नागेश्वर असे म्हंटले जाते.
  • भीमाशंकर जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग महाराष्ट्रात स्थित आहे.
  • रामेश्वरम जोतिर्लिंग – ह्या जोतिर्लिंग ची स्थापना प्रभू श्री रामांनी केली होती,म्हणून हैस जोतिर्लिंगाचे नाव रामेश्वरम आहे.
  • घुशमेश्वर जोतिर्लिंग – हे जोतिर्लिंग दोलताबाद मधील वेरूल गावात स्थित आहे.महाराणी अहिल्याबाई यांनी येथे भव्य मंदिर निर्माण केले.श्रावण पौर्णिमा आणि महाशिवरात्री मध्ये येथे जत्रा भरते.
See also  मनाची एकाग्रता  - आनंदी जीवन आणि यशाची गुरुकिल्ली - 9 सोप्या टिप्स  - Manachi Ekagrata


SIP KNOWLEDGE