ब्राह्मण भुषण पुरस्काराचे स्वरूप काय असते?हा पुरस्कार कोणाला दिला जातो?
मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांना नुकतेच ब्राम्हण भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यानिमित्त आपण ह्या ब्राह्मण भुषण ह्या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
ब्राह्मण भुषण पुरस्काराचे आयोजन कोण करते?
दरवर्षी ब्राह्मण भुषण ह्या पुरस्काराचे आयोजन आम्ही सारे ब्राह्मण संघटना अणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या दोघांकडुन ह्या पुरस्काराचे आयोजन केले जाते.
यंदाचा २०२३ मधील ब्राह्मण भुषण पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते नाट्यसृष्टीतील अभिनेते प्रशांत दामले यांना देण्यात येणार आहे.
अशी माहिती आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या संपादकांनी दिली आहे.
मागील तीन दशकांत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रशांत दामले यांनी सर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.प्रशांत दामले यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील नाट्यसृष्टीतील एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जाते.
प्रशांत दामले यांनी चित्रपट नाटक यासोबत अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
ब्राह्मण भुषण पुरस्काराचे स्वरूप कसे असते?
ब्राह्मण भुषण ह्या पुरस्काराचे स्वरूप एक मानपत्र एक पुणेरी पगडी आणि एक उपरणे असे असल्याचे सांगितले जात आहे.
ब्राह्मण भुषण पुरस्कार कोणाला दिला जातो?
ब्राह्मण भुषण हा पुरस्कार ब्राह्मण समाजातील उत्तम कामगिरी करणारया विशेष व्यक्तींना त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दिला जात असतो.
प्रशांत दामले यांना याआधी कोणते विशेष पुरस्कार मिळाले आहेत?
व्यावसायिक नाटकांचा बारा हजार पाचशे पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा देखील प्रशांत दामले यांनी पार केला आहे.
प्रशांत दामले यांना नुकतेच संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
टिळक महाराष्ट्र नावाच्या एका विद्यापीठाकडून त्यांना डिलीट ही मानाची पदवी देखील देण्यात आली आहे.हयाच पार्श्वभुमीवर प्रशांत दामले यांना ब्राह्माण भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कुठे अणि केव्हा पार पडेल हा पुरस्कार वितरण सोहळा?
६ मे २०२३ रोजी पुण्याच्या शिवाजीनगर येथील माॅडन सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
ब्राह्मण भुषण पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
आतापर्यंत ब्राह्मण भुषण पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना २०२२ मध्ये ब्राह्मण भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
२०१९ मध्ये प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.२०१८ मध्ये सद्गुरू गृपचे संस्थापक यशवंत कुलकर्णी,२०१७ मध्ये रविंद्र प्रभु देसाई,२०१६ मध्ये वसंतराव गाडगीळ,भुषण गोखले २०१५, गोविंद कुलकर्णी २०१४, अपर्णा ताई तीर्थंकर २०१३ यांना देण्यात आला आहे.