तुमचे दहा वर्षे जुने आधार कार्ड आजच फ्री मध्ये अपडेट करून घ्या अन्यथा १५ जुनपासुन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० रूपये चार्ज भरावा लागेल – Is your Aadhaar card 10 years old

तुमचे दहा वर्षे जुने आधार कार्ड – अपडेट करण्यासाठी ५० रूपये चार्ज भरावा लागेल

ज्या भारतीय नागरिकांचे आधार कार्ड दहा वर्षे जुने झाले आहे अणि नागरीकांनी ते अद्याप अपडेट केले नाहीये अशा नागरीकांनी १४ जुन २०२३ पर्यंत फ्री मध्ये आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे.

जे भारतीय नागरिक १४ जुन २०२३ नंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जातील त्यांना फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करून मिळणार नाहीये.

Is your Aadhaar card 10 years old

अशा १४ जुननंतर उशिरा आधार कार्ड अपडेट करत असलेल्या नागरीकांना ५० रूपये इतका चार्ज भरावा लागणार आहे.

ज्या भारतीय नागरिकांनी आपले दहा वर्षे जुने झालेले आधार कार्ड अजुनही अपडेट केले नाहीये अशा नागरीकांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे.

कारण आता केंद्र सरकारने १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे सर्व नागरिकांसाठी बंधनकारक केले आहे.

आज १४ जुन २०२३ म्हणजे आधार कार्ड फ्री अपडेट करण्याची शेवटची तारीख आहे आज १४ जून २०२३ पर्यंत ज्या नागरीकांनी आपले आधार कार्ड अपडेट केले नाहीये अशा नागरीकांना उद्यापासून म्हणजे १५ जुन २०२३ पासुन आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० रूपये इतका चार्ज भरावा लागणार आहे.

ज्यांना आधार कार्ड घरी बसुन अपडेट करायचे आहे ते आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन पद्धतीने आपले आधार कार्ड अपडेट करू शकतात.

आधार कार्ड अपडेट मध्ये आपण आपला फोटो पत्ता आयडी इत्यादी गोष्टी अपडेट करू शकणार आहे.

Is your Aadhaar card 10 years old

घरबसल्या आधार अपडेट कसे करायचे?

  1. सर्वप्रथम आपणास‌‌ आपले आयडी अणि अॅड्रेस प्रूफ की
    अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टल लिंकवर जायचे आहे.
  2. माय आधार पोर्टल वर गेल्यावर आपणास लाॅग इन वर क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास enter aadhar मध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  3. यानंतर दिलेला कॅपच्या जसाच्या तसा भरून घ्यायचा आहे अणि खाली दिलेल्या सेंड ओटीपी ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.
  4. यानंतर आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल तो पाठवलेला ओटीपी आपणास इंटर ओटीपी मध्ये भरायचा आहे.अणि खाली दिलेल्या लाॅग इन बटणावर क्लिक करायचे आहे.
  5. यानंतर आपल्यासमोर माय आधार पोर्टल ओपन होईल.तिथे सर्विसेस मध्ये आपणास स्क्रोल करून थोडे खाली गेल्यावर document update असे नाव दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  6. यानंतर next बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्यासमोर आपले नाव,लिंग,जन्मतारीख अणि आपला पत्ता येईल.आपला दिलेला हा सर्व डेटा बरोबर भरलेला असल्यास खाली दिलेल्या बाॅक्स मध्ये i verify that above details is correct वर टिक करायचे आहे.अणि next बटणावर क्लिक करायचे आहे.
  7. यानंतर आपल्यासमोर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही गाईडलाईनस येतील.हया गाईडलाईनस प्रमाणे आपणास कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  8. अपलोड करत असलेल्या कागदपत्राची साईज दोन एमबी पेक्षा कमी असायला हवी अणि कागदपत्रे जेपीईजी पीएनजी किंवा पीडीएफ फाॅरमॅट मध्ये असणे आवश्यक आहे.
  9. कागदपत्रांमध्ये आपणास आयडेंटिटी प्रूफ अणि अॅड्रेस प्रूफ करीता डाॅक्युमेंट अपलोड करायचे आहे.
  10. आयडेंटिटी प्रूफ करीता भरपुर पर्याय आपल्यासमोर येतील त्यातील कोणताही एक डाॅक्युमेंट पर्याय जो आपल्याकडे उपलब्ध असेल आपण निवडून घ्यायचा आहे.अणि डाॅकयुमेंट अॅडवायजरी मध्ये ओके वर क्लिक करायचे आहे.
  11. यानंतर आयडेंटिटी प्रूफ खाली दिलेल्या view details and upload documents वर क्लिक करायचे आहे.
  12. डाॅक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपण कॅमेरा वर क्लिक करून आपल्या डाॅकयु मेंटचा एक लाईव्ह फोटो काढुन आपला फोटो अपलोड करू शकतो.
  13. किंवा आपल्या मोबाईल मध्ये आयडेंटिटी प्रूफ करीता पीडीएफ फाईल मध्ये डाॅकयुमेंटचा फोटो काढुन ठेवला आहे तर फाईल वर क्लिक करून फाईल मधुन देखील आयडेंटिटी प्रूफ डाॅकयुमेंट आपण अपलोड करू शकतो.
  14. यानंतर आपणास आपल्या अॅड्रेस प्रूफ करीता कुठलेही एक उपलब्ध डाॅकयुमेंट सिलेक्ट करायचे आहे.यानंतर view details and upload documents वर क्लिक करून कंटिनयु वर क्लिक करायचे आहे.
  15. इथे देखील आपण डाॅकयुमेंटचा फोटो काढुन अपलोड करू शकतात किंवा फाईल मध्ये असल्यास तिथुन अपलोड करू शकतात.
See also  आंतरराष्ट्रीय यंग इको हिरो पुरस्कार विषयी माहिती - भारतातील पाच तरुण - International Young Eco Hero Award information in Marathi

दोन्ही डाॅकयुमेंट अपलोड करून झाल्यावर खाली दिलेल्या बाॅक्स वर टिक करायचे आहे.अणि खाली दिलेल्या next बटणावर क्लिक करायचे आहे.

अणि पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी ओके करायचे आहे.१४ जुन अगोदर अपडेट केल्यास आपणास फ्री मध्ये अपडेट करता येईल त्यानंतर ५० रूपये चार्ज भरावा लागणार आहे.

खाली दिलेल्या सबमिट वर क्लिक केल्यावर आपली आधार अपडेट प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होऊन जाईल.डाऊनलोड वर क्लिक केल्यावर आपणास आपल्या डाॅक्युमेंटला पीडीएफ फाॅरमॅट मध्ये आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड देखील करता येईल.

खाली दिलेल्या go to dashboard वर क्लिक केल्यावर आपण पुन्हा सर्विसेस हया पेजवर येऊ स्क्रोल करून खाली आल्यावर आपणास request आॅप्शन दिसुन येईल.

त्यात आपल्या किती स्टेज पुर्ण झाल्या आहेत किती स्टेज बाकी आहे आपण बघु शकता.