इकिओ लाइटिंग आयपीओ अलाॅटमेंट स्टेटस चेक कसे करायचे?How to check IKIO lighting allotment status in Marathi

इकिओ लाइटिंग आयपीओ अलाॅटमेंट स्टेटस -How to check Ikio lighting allotment status in Marathi

ज्या गुंतवणूक दारांनी इकिओ लाइटिंग ह्या आयपीओ मध्ये आपले पैसे गुंतवले आहेत त्यांनी आपल्याला कंपनीचे खरेदी केलेले शेअर्स मिळाले आहे

किंवा नाही हे कसे चेक करायचे हेच आपण आजच्या लेखात जाणुन घेणार आहोत.

ज्या गुंतवणूक दारांनी इकिओ लाइटिंग ह्या आयपीओ मध्ये आपले पैसे गुंतवले होते अशा गुंतवणूक दारांच्या खात्यात १३ जुन २०२३ रोजीच शेअर्स आले आहेत.

हे आपल्या खात्यात आलेले स्टाॅक शेअर्स कसे चेक करायचे हे बहुतेक गुंतवणूक दारांना माहीत नसते म्हणून ही सर्व प्रक्रिया आपण थोडक्यात समजुन घेणार आहोत.

इकिओ लाइटिंग ह्या कंपनीचा आयपीओ बाजारात ६ जुन रोजी लाॅच करण्यात आला होता.हा ओपन गुंतवणूक दारांना ८ जुनपर्यत उपलब्ध करून देण्यात आला होता.याचे प्राईज बॅण्ड २७० ते २८५ इतके ठेवण्यात आले होते.

How to check IKIO lighting allotment status in Marathi
How to check IKIO lighting allotment status in Marathi

कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग १६ जुन २०२३ रोजी करण्यात येणार आहे.

ह्या कंपनीच्या आयपीओचे अलाॅटमेंट १३ जुन २०२३ रोजी करण्यात आले आहे.हा स्टाॅक आपल्या खात्यात आला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी गुंतवणूक दारांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

पहिला पर्याय आहे ज्यात गुंतवणूक दारांना बीएस ई च्या आॅफिशिअल वेबसाईटवर आपले आयपीओ अलाॅटमेंट स्टेटस चेक करता येईल तसेच गुंतवणूक दारांना डायरेक्ट लिंक दवारे देखील हे अलाॅटमेंट स्टेटस चेक करता येणार आहे.

ज्या गुंतवणूक दारांनी आयपीओ मध्ये बोली लावली आहे ते के फिनटेक ह्या वेबसाईटवर जाऊन आपले अलाॅटमेंट स्टेटस चेक करू शकतात.

किंवा आपले आयपीओ अलाॅटमेंट स्टेटस चेक करण्यासाठी गुंतवणूक दारांना kprism.kfintech.com/ipostatus ह्या लिंक वर देखील जाता येईल.

बीएस ई वेबसाईटवरून आयपीओ अलाॅटमेंट स्टेटस चेक कसे करायचे?

  1. सर्वप्रथम आपणास‌‌ https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx ह्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  2. यानंतर आपणास इक्विटी नावाचा एक पर्याय दिसुन येईल तिथे क्लिक करायचे आहे.
  3. यानंतर आपणास इशु हे नाव सिलेक्ट करून घ्यायचे आहे.अणि इकिओ लाइटिंग एलटीडी हे आॅप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
  4. यानंतर आपणास आपली अर्ज नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड मधील आवश्यक माहीती भरावी लागते.
  5. यानंतर आय अॅम नाॅट रोबोट वर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर आपली अलाॅटमेंट स्टेटस डिटेल येऊन लागेल.
See also  बाल शिवाजी चित्रपटात आकाश ठोसर साकारणार शिवाजी महाराजांची भुमिका - AKASH THOSAR TO PORTRAY BAL SHIVAJI