गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी!१४ जुन २०२३ पासुन शेअर बाजारात येणार हे तीन महत्वाचे आयपीओ. – Three IPO offers this week

गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी!१४ जुन २०२३ पासुन शेअर बाजारात येणार हे तीन महत्वाचे आयपीओ

भारतीय शेअर बाजारात लवकरच धमाल होणार आहे.कारण ह्या आठवड्यात बाजारात तीन आयपीओ आणले जात आहे.

या तिन्ही आयपीओ दवारे गुंतवणूक दारांना कमाई करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

आपल्या मनात नक्कीच उत्सूकता निर्माण झाली असेल की ज्या तीन कंपनीचे आयपीओ बाजारात येणार आहे ह्या कंपनीचे नाव काय आहे आपल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

ह्या आठवड्यात शेअर बाजारात काॅसमिक सीआर एफ, भारतातील सेल पाॅईट अणि विलिन बाओ मेड ह्या तिन्ही कंपनीचे आयपीओ येणार आहे.

काॅसमिक सीआर एफ लिमिटेड-

काॅसमिक सीआर एफ ह्या कंपनीचा आयपीओ १४ जुन २०२३ रोजी सबस्क्रिप्शन करण्यासाठी उघडण्यात येणार आहे अणि दोन दिवसानंतर १६ जुन २०२३ रोजी हा आयपीओ बंद देखील केला जाणार आहे.

हा एक एसएमई आयपीओ आहे ज्याचे प्राईज बॅण्ड ३१४ रूपये ते ३३० रूपये प्रति शेअर असणार आहे.

असे सांगितले जाते आहे की ही कंपनी आयपीओ दवारे १८.२२ इक्विटी शेअर्सवर पब्लिक इशु दवारे ६० करोड रूपये जमवु इच्छित आहे.

काॅसमिक सीआर एफ लिमिटेड ही कंपनी आयपीओ दवारे जमा केलेला पैसा तसेच कंपनी IPO द्वारे जी काही केलेली रक्कम उभी करणार आहे.

ती सर्व सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी आणि उत्पादन युनिट्सची स्थापना करण्यासाठी,खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले जात आहे.

सेल पाॅईट इंडिया –

सेल पाॅईट इंडिया ही कंपनी आंध्र प्रदेश मध्ये ७५ रिटेलर स्टोअर्स चालवते.ही कंपनी मोबाईलशी संबंधित प्रोडक्ट सर्विस रिटेल मध्ये विकण्याचे काम करते.

See also  Budh Pradosh Vrat 2023 In Marathi : आज बुद्ध प्रदोष व्रत, पुजा मुहूर्त तुम्हाला हे सर्व माहित असणे आवश्यक
Three IPO offers this week

सेल पाॅईट इंडिया ह्या कंपनीचा आयपीओ १५ जुन २०२३ पासुन लाॅच केला जातो आहे.हा आयपीओ चार दिवसांसाठी चालणार असुन २० जुन २०२३ रोजी हा आयपीओ बंद केला जाईल.

सेल पाॅईट इंडियाची इशु प्राईस १०० रूपये प्रति शेअर इतकी निर्धारित करण्यात आली आहे.हे इशु करण्यात आलेले प्राईज फिक्स असणार आहे.

सेल पाॅईट इंडिया कंपनीला ह्या आयपीओ अंतर्गत ५० करोडची कमाई करायची आहे असे सांगितले जात आहे.

ह्या आयपीओ दवारे जमा केलेला सर्व पैसा कंपनी खेळत्या भांडवलाची गरज पुर्ण करण्यासाठी अणि कंपनीवर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अणि नवीन रिटेल आउटलेट सुरू करण्यासाठी जुन्या रिटेल आउटलेटसची दुरुस्ती करण्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगितले जात आहे.

विलिन बायो मेड –

विलिन बायो मेड ही एक फार्मास्युटिकल प्रोडक्ट बनवणारी कंपनी आहे ह्या कंपनीचा आयपीओ १६ जुन २०२३ रोजी उघडणार आहे अणि २१ जुन २०२३ रोजी बंद करण्यात येणार आहे.

विलिन बायो मेडची जारी किंमत ३० रूपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.ही कंपनी ४० लाख शेअर्स दवारे १२ करोडची कमाई ह्या आयपीओ दवारे करू इच्छित असल्याचे सांगितले जात आहे.

ह्या कंपनीच्या आयपीओ दवारे जमा केलेला पैसा सामान्य निधीसाठी भांडवलाची गरज पुर्ण करण्यासाठी केला जाणार आहे.