मानवी मेंदु खाणारया अमिबा विषयी माहिती Brain eating amoeba information in Marathi

मानवी मेंदु खाणारया अमिबा विषयी माहिती Brain eating amoeba information in Marathi

नुकतेच केरळ मधील अलापुझझा नावाच्या जिल्ह्यातील एका १५ वर्षीय मुलाचा मानवी मेंदू खाणारया अमिबा मुळे मृत्यू झाला आहे ह्या अमिबाने ह्या १५ वर्षीय मुलाचा मेंदु खाऊन टाकल्याने ह्या मुलाचा मृत्यू झाला असे म्हटले जात आहे.

आरोग्य विभागाकडुन असे सांगितले जात आहे की प्रायमरी अमोइबिक मेनिंगोएनसेफॅलिटीस म्हणजेच मेंदु खाणारया अमिबाचा दुर्मिळ संसर्ग झाल्यामुळे ह्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

सदर केरळ राज्यातील अलापुझझा जिल्ह्यातील इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला गुरूदत्त नावाचा हा मुलगा तलावातील पाण्यात अंघोळ करायला गेला होता

आणि अंघोळी दरम्यान नाकावाटे अमिबाने ह्या मुलाच्या शरीरात प्रवेश करत त्या मुलाचा सर्व मेंदु खाऊन टाकल्याने ह्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

सुमारे एक आठवडयापासुन गुरूदत्त याच्यावर दवाखान्यात उपचार करणे सुरू होते.पण अखेरीस ह्या मुलाचा ह्या दुर्मिळ संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या गुरूदत्तला सतत झटके येत होते अणि ताप देखील येत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात भरती केले अणि तपासणी करत असताना डाॅक्टरांना गुरूदत्तच्या मेंदुला(प्रायमरी अमोइबिक मेनिंगोएनसेफॅलिटीस)मेंदु खाणारया अमिबाचा संसर्ग झाला आहे असे निदर्शनास आले.

यानंतर गुरूदत्त याच्यावर डाॅक्टरांकडुन उपचारास सुरूवात करण्यात आली पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हया हदयद्रावक घटनेनंतर राज्याच्या आरोग्य मंत्री यांनी येथील नागरीकांना दुषित पाण्यात अंघोळ करण्यास मनाई केली आहे.

एका झरयात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या गुरूदतला ह्या मेंदु खाणारया अमिबाचा संसर्ग झाला होता.

See also  रक्षाबंधन राखी बांधण्याचा विधी,- Raksha Bandhan Shubh Muhurat 2022 In Marathi
Brain eating amoeba information in Marathi
Brain eating amoeba information in Marathi

अमिबा म्हणजे काय?

अमिबा हा एकपेशीय जीव आहे हा जीव अत्यंत सुक्ष्म असतो.हा इतका सुक्ष्म असतो की याला पाहण्यासाठी आपणास सुक्ष्म दर्शकाचा वापर करावा लागतो.

काय आहे हा मेंदु खाणारा अमिबा हा अमिबा कशामुळे होतो?

मेंदु खाणारा अमिबा (PAM primary amoebic meningoencephalitis) हा एक मेंदु खाणारा अमिबा आहे जो नाएगलेरिया फाॅवलेरी नावाच्या अमिबाच्या एका प्रजाती मुळे आपणास होत असतो.

हा मेंदु खाणारा अमिबा पाण्यातुन नाकावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतो अणि मेंदुपर्यत पोहोचत आपल्या मेंदुमधील उतींना नुकसान पोहोचवत असतो त्यांना उध्वस्त करून इजा पोहोचवत असतो.

मेंदु खाणारा अमिबा ह्या संसर्गामुळे आपल्या मेंदुमधील उतींना नुकसान पोहोचते अणि मेंदुला सुज येऊन आपला मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

मेंदू खाणारा अमिबा कोठे आढळुन येतो?

मेंदु खाणारा हा अमिबा झरे, उबदार गोडे पाणी असलेल्या तलावात तसेच मातीत आढळुन येत असतो.

पण दुषित पाणी असलेल्या तलाव आणि जलाशयात अंघोळ करत असताना याचा संसर्ग झाल्याची लक्षणे आतापर्यंत अधिक समोर आली आहेत.

हा मुक्त जिवंत मेंदू खाणारा अमिबा असलेल्या दुषित पाणी मध्ये तसेच तलाव जलाशयात पाण्याचे तापमान ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असल्यास

एखाद्या व्यक्तीने तलाव जलाशयात अंघोळ केल्याने याची लागण त्याला होऊ शकते कारण हा अमिबा अशा पाण्यात अधिकतम प्रमाणात आढळून येतो.

हा मेंदु खाणारा अमिबा गरम पाण्याचे तापमान असलेल्या ठिकाणी याची उत्पत्ती तसेच भरभराट होते.

हा अमिबा एका व्यक्तीदवारे दुसरया व्यक्तीला जडत नाही.

हा अमिबा साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिना ह्या कालावधी दरम्यान आढळून येत असतो.

२०१३ ते २०२२ ह्या कालावधीत याच्या अमेरिका ह्या देशात जवळपास २९ केसेस पाहावयास मिळाल्या आहेत.हा अमिबा साचलेल्या पाण्यात आढळतो.

मेंदु खाणारा अमिबाची लक्षणे कोणकोणती आहेत?

मेंदू खाणारा अमिबाचा संसर्ग झाल्यास याची प्राथमिक लक्षणे एक ते दोन हप्त्यांत दिसु लागतात.हा कुठल्याही विशिष्ट वयोगटातील व्यक्तींना जडणारा संसर्ग नाहीये याचा संसर्ग कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.

See also  सुर्यग्रहण म्हणजे काय?सुर्यग्रहण कधी कसे अणि का घडुन येते? -What is a solar eclipse?

मेंदू खाणारा अमिबाची प्राथमिक लक्षणे ही एकदम सर्वसामान्य आजारासारखीच आहेत.

  • मेंदु खाणारा अमिबाची प्राथमिक लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-
  • सुरूवातीला डोके दुखणे
  • ताप येणे
  • मळमळ होणे
  • उलट्या होणे
  • मेंदू खाणारा अमिबा पासुन बचावासाठी उपाय –

याच्यावर सध्या संशोधन सुरू असल्याने यावर अद्याप कुठल्याही प्रकारचे विशिष्ट औषध निर्माण करण्यात आले नाहीये.याच्यावर उपचारासाठी आपण काही अॅनटी फंगल औषधांचा वापर करू शकतो.

यावर वेळ असताच उपचार केल्यास रूग्णाच्या वाचण्याची शक्यता अधिक असते पण हा संसर्ग अधिक वाढल्यास रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

तरी आपण हा संसर्ग आपणास जडु नये म्हणून पुढील विशेष काळजी घ्यायला हवी –

स्विमिंग पूल,तलाव झरा जलाशयात अंघोळ करण्यासाठी पोहण्यासाठी जाताना नाक दाबुन ठेवणे कारण हा अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करत असतो अणि आपल्या मेंदुमधील उतींचे नुकसान करत असतो.

स्विमिंग पूल तलाव जलाशय्,तलाव इत्यादी ठिकाणी स्वच्छता करायला हवी कारण हा मेंदू खाणारा अमिबा दुषित पाण्यात आढळुन येत असतो.

दुषित पाणी असलेल्या तलावात जलाशयात स्विमिंग पुल मध्ये अंघोळ करणे पोहणे टाळायला हवे.अंघोळ करण्याआधी तो तलाव जलाशय जिथे आपण अंघोळ करतो आहे पोहतो आहे तो स्वच्छ आहे किंवा नाही याची तपासणी करून घ्यावी.मगच त्या तलावात जलाशयात स्विमिंग पुल मध्ये अंघोळ करावी तसेच पोहण्यासाठी उतरावे अन्यथा नाही.

Leave a Comment