CDSL आणि NSDL म्हणजे काय ? यातील फरक – CDSL and NSDL Marathi information

CDSL आणि NSDL म्हणजे काय

गेल्या दोन वर्षात भारतातसर्वात जास्त demat account उघडण्यात आलेत . एकतर घरी बसून काम करावे लागले आणि ऑनलाइन पद्धतीने काही income करता येईल का याचे बरेच जन मार्ग शोधताना दिसत आहेत.

यात share trading वर बरेच जण प्रयत्न करतात आहेत . यात शेअर विकत घेणे आणि विकणे . मग ते इंटरा डे किंवा लोंगटर्म किंवा Swing ट्रेडिंग असो

यात आपण जर स्विंग ट्रेडिंग केली किंवा लोंग टर्म शेअर खरेदी केली तर ते शेअर कुणाकडे असतात ? आपले जे demat account आहे त्या कंपनी कडे असतात ? आणि असले आणि उद्या ती कंपनी बंद पडली तर ?  आपले शेअर आणि त्यांची देखभाल नेमकं कोण करते आणि कोण सांभाळते ?

सेन्ट्रल डिपॉजीटरी सर्व्हिस इंडिया (CDSL) आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉजीटरी (NSDL) ह्या दोन्ही सरकारमान्य शेअर डिपॉजीटरी आहेत.शेअर डिपॉजीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये शेअर होल्ड करतात.मागच्या काही वर्षांमध्ये शेअर ट्रेडिंग फक्त ऑफलाईन पद्धतीने होते,आणि शेअर पेपर सर्टिफिकेट द्वारे घेतले जायचे.पण आता डिजिटल युगामध्ये शेअर होल्ड करणे देखील डिजिटल झाले आहे.जसे बँक आपली डिपॉजीट डिजिटल ठेवायला मदत करते.तसेच शेअर डिपॉजीटरी शेअर डिजिटल ठेवायला मदत करतात.

थोडक्यात काय तर ?

बँका जसे आपले पैसे  सुरक्षितरीत्या सांभाळतात तसे हे आपले शेअर सांभाळतात

CDSL आणि NSDL म्हणजे काय ? – या शेअर डिपॉजीटरी आहेत जे की SEBI च्या नियंत्रणाखाली काम करतात.तुम्ही जे आपण शेअर,म्युच्युअल फँड खरेदी करता त्या सर्व डिपॉजीटरी एका स्टॉक एक्सचेंज ला लिंक असतात.

भारतामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत.N

  • SDL हे NSE चे डिपॉजीटरी आहे
  • CDSL हे BSE चे डिपॉजीटरी आहे.CDSL ची स्थापना वर्ष 1999 मध्ये झाली होती आणि NSDL ची स्थापना वर्ष 1996 मध्ये झाली होती.
See also  क्रेडिटेड अणि डेबीटेड म्हणजे काय? - Credited and debited meaning in Marathi

NSDL आणि CDSL मधील फरक काही मुद्यांवरुन तुम्हाला समजेल :

  • CDSL हे BSE चे डिपॉजीटरी आहे,तर NSDL हे NSE चे डिपॉजीटरी आहे.तुम्ही  शेअर मध्ये गुंतवणूक करताना एका वेळी एकाच स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूक करू शकता.
  • NSDL हे IDBI बँक च्या अधीन येते,तर CDSL हे BSE च्या अधीन येते.
  • CDSL ची स्थापना 1999 मध्ये झालेली तर NSDL ची स्थापना 1996 मध्ये झाली होती.
  • CDSL आणि NSDL च्या डिमॅट अकाउंट नंबर मध्ये फरक असतो.CDSL मध्ये डिमॅट अकाउंट नंबर 16 अंकी असतो,तर NSDL मध्ये डीमॅट अकाउंट नंबर 14 अंकी असतो.
  • CDSL मध्ये 599 डिपॉजीटरी पार्टीसिपंट आहे तर NSDL मध्ये 278 डिपॉजीटरी पार्टीसिपंट आहेत.
  • NSDL मध्ये 1.95 करोड लोकांनी गुंतवणूक केली आहे आणि CDSL मध्ये 2.11 करोड लोकांनी गुंतवणूक केली आहे.

डिपॉजीटरी कोणती कामे करतात ? -– CDSL and NSDL Marathi information

तुम्ही डिमॅट अकाउंट च्या मदतीने शेअर खरेदी आणि विक्री  करू शकता.मग तुम्ही म्हणाल ह्यात डिपॉजीटरी चे काम काय आहे ?खर तर तुमचे डिमॅट अकाउंट हे मध्यस्थी चे काम करते.तुमचे शेअर होल्ड करण्याचे काम डिपॉजीटरी करतात.जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडून शेअर खरेदी करता,तेव्हा तुमचे शेअर डिपॉजीटरी होल्ड करते.काही वर्षांपूर्वी तुम्हाला शेअर जर दुसऱ्याला विकायचे असतील तर तुमचे शेअर सर्टिफिकेट त्या घेणाऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करावे लागत होते.पण आता तुम्ही दोन डिमॅट अकाउंट मध्ये अकाउंट ट्रान्सफर करू शकता.

हे दोन्ही वेगळे डिपॉजीटरी असले तरी त्यांचे कामे सारखीच असतात,शेअर होल्ड करण्याचे.दोन्ही तुम्हाला सारखी सेवा पुरवतात आणि दोघांची नियमावली देखील  सारखी असते. डिपॉजीटरी पार्टीसिपंट ह्या आर्थिक संस्था असू शकतात किंवा agent ब्रोकर असू शकतात किंवा बॅंक देखील असू शकतात.तुम्ही तुमचे डिमॅट अकाउंट कोणत्याही डिपॉजीटरी पार्टीसिपंट च्या साह्याने उघडू शकता.तुमच्या डिमॅट अकाउंट ची सुरक्षितता ही डिपॉजीटरी च्या नियंत्रणाखाली असते.

See also  केवायसी फ्रॉड म्हणजे काय? | KYC fraud meaning in Marathi

कोणकोणती सेवा पुरवतात ?

  • डिमॅट अकाउंट देखभाल करणे , सुरक्षित ठेवणे .
  • ट्रेड सेटलमेंट सुरक्षित ठेवणे
  • शेअर ट्रान्सफर चा रेकॉर्ड ठेवणे
  • डिपॉजीटरी पार्टीसिपंट च्या मदतीने डिमॅट अकाउंट ओपन करणे
  • अकाउंट होल्डरच्या सांगण्यावरून अकाउंट डिटेल बदलणे

दोन्ही डिपॉजीटरी चे कार्य एकच असल्यामुळे दोन्हीही तितक्याच चांगल्या हेतूने आपापले काम करतात आणि दोन्ही डिपॉजीटरी  SEBI च्या देखरेखीखाली काम करतात.तुम्ही स्वतःहून डिपॉजीटरी निवडू शकत नाही तर तुम्ही ज्या डिपॉजीटरी पार्टीसिपंट कडून डिमॅट अकाउंट उघडले आहे,तोच ठरवतो की डिपॉजीटरी कोणती पाहिजे ती.स्टेट बँक ऑफ इंडिया ने डिपॉजीटरी पार्टीसिपंट म्हणून NSDL आणि CDSL दोन्हीकडे रजिस्टर केले आहे.

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE