सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक अणि मुख्य व्यवस्थापक पदाच्या २५० जागांसाठी भरती सुरू – Central bank of india recruitment 2023 in Marathi

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक अणि मुख्य व्यवस्थापक पदाच्या २५० जागांसाठी भरती सुरू central bank of india recruitment 2023 in Marathi

सेंट्रल बॅक आॅफ इंडिया तर्फे वरिष्ठ व्यवस्थापक अणि मुख्य व्यवस्थापक ह्या पदाच्या एकुण २५० रिक्त जागा भरल्या जात आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडुन अर्ज मागवायला सुरूवात देखील झाली आहे.

अर्ज करण्याची सुरूवात –

या भरतीसाठी २७ जानेवारी २०२३ रोजी अर्ज करावयास सुरुवात झाली होती.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

पात्र उमेदवारांना ह्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२३ ही देण्यात आली आहे.

भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी मिळु शकते.

पदाचे नाव –

१)मुख्य व्यवस्थापक -एकुण ५० जागा

एस सी ७ जागा

एसटी -३ जागा

ओबीसी -१३ जागा

ईडबलयुएस ५ जागा

जनरल -२२ जागा

मुख्य व्यवस्थापक एकुण जागा -५०

२) वरिष्ठ व्यवस्थापक – २०० जागा

एससी ३० जागा

एसटी १५ जागा

ओबीसी ५४ जागा

ईडबलयुएस -२० जागा

जनरल -८१ जागा

वरिष्ठ व्यवस्थापक एकुण जागा -२०० जागा

शैक्षणिक पात्रतेच्या अटी –

१) मुख्य व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराने कोणत्याही एका शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

तसेच ७ वर्ष इतका आपल्या कामाचा क्षेत्राचा अनुभव असायला हवा.

२) वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराने कोणत्याही एका शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

तसेच आपल्या क्षेत्रात कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

See also  कमी वेळात जास्त अभ्यास कसा करावा? (How To Study More In Less Time)

वयाची अट –

उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ ते ४० वर्ष इतके वय पुर्ण असणे आवश्यक आहे.

वयातील सुट –

एस सी तसेच एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे तर ओबीसी अणि इतर जनरल कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क –

जे उमेदवार जनरल तसेच ओबीसी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना ८५० रूपये फी+ जीएसटी भरावी लागणार आहे.

एस सी एस टी पीडबलयुडी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तसेच महिला उमेदवारांना कुठलीही परीक्षा फी भरण्याची आवश्यकता असणार नाहीये.

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड आँनलाईन लेखी परीक्षा अणि मुलाखत ह्या दोघांच्या आधारावर केली जाणार आहे.

वेतन –

जे उमेदवार मुख्य व्यवस्थापक अणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी निवडले जातील त्यांना ६३ हजार ८४० रूपये ते ८९ हजार ८९० रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

सर्व उमेदवारांची परीक्षा मार्च महिन्यात होणार आहे अणि मुलाखत देखील मार्च महिन्यातच घेतली जाणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आॅफिशिअल वेबसाईट –

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची आॅफिशिअल वेबसाईट centralbankofindia.co.in ही आहे.

आधिक माहिती  – Central_Bank_of_India_Recruitment_2023_for_250_Posts