युपीएससी मार्फत ११०५ जागांसाठी मेगा भरती सुरू | Upsc civil service recruitment 2023 in Marathi

युपीएससी मार्फत ११०५ जागांसाठी मेगा भरती सुरू Upsc civil service recruitment 2023 in Marathi 

युपीएससी मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या एकुण ११०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडुन आँनलाईन पदधतीने अर्ज मागविले जात आहे.

भरती दरम्यान निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

 

पदाचे नाव

 

आय एस/आय पीएस/आय एफ एस११०५ जागा

 

शैक्षणिक पात्रता

 

युपीएससी मार्फत केल्या जात असलेल्या ह्या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त का केलेला असणे आवश्यक आहे.

आय ए एस पदासाठी उमेदवाराचे कोणत्याही एका शाखेतुन

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

आय एफ एस पदासाठी उमेदवाराने पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान,वनस्पतिशास्त्र,रसायनशास्त्र, भूविज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र आणि प्राणीशास्त्र, कृषी किंवा समतुल्य विषयांपैकी एक म्हणून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे

 

वयाची अट

 

उमेदवाराचे वय १ आॅगस्ट २०२३ रोजी २१ ते ३२ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

 

वयातील सुट

 

येथे भरतीमध्ये ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे अणि एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी वयात सुट देण्यात आली आहे.

 

अर्ज करण्याची फी

 

युपीएससी मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा भरतीसाठी अर्ज करायला जनरल तसेच ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना १०० रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

See also  डेटा एन्ट्री ऑपरेटर कसे बनावे?how to become data entry operator in Marathi

जे उमेदवार एस सी एस टी पीडबलयु कॅटॅगरी मधील आहेत त्यांना कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाहीये.महिला उमेदवारांना देखील फी भरावी लागणार नाहीये.

 

फाॅम भरण्याची शेवटची तारीख

 

युपीएससी मार्फत नागरी सेवा पुर्व परीक्षेच्या जागांसाठी अर्ज करणारया उमेदवारांना २१ फेब्रुवारी २०२३ ही फाॅम भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.

 

पुर्व परीक्षेची तारीख

 

पुर्व परीक्षा २८ मे २०२३ रोजी असणार आहे.

 

मुख्य परीक्षेची तारीख

 

मुख्य परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

 

युपीएससी आॅफिशिअल वेबसाईट

 

upsc.gov.in ही युपीएससी ची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

 

युपीएससी फाॅम भरण्याची आॅफिशिअल वेबसाईट

https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php ही आहे.

 

निवडप्रक्रिया

 

सर्वप्रथम उमेदवारांना प्राथमिक परिक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल नंतर त्यांची मुख्य परीक्षा घेतली जाते.त्यानंतर मुलाखत मेडिकल परीक्षा डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन देखील होईल.

 

पुर्व परीक्षेचे पॅटर्न

 

जनरल स्टडी मध्ये २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले जातील.परीक्षेचा कालावधी दोन तास असणार आहे.

 

सी सॅटमध्ये दोनशे गुणांसाठी दोनशे प्रश्न विचारले जातात परीक्षा कालावधी हा दोन तास इतकाच असणार आहे.

 

युपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा आहे?

 

सर्वप्रथम आपण युपीएससी सिव्हिल सर्व्हिस भरती २०२३ च्या आॅफिशिअल वेबसाईटवर जायचे आहे.

यानंतर रिक्रुटमेंट वर क्लिक करायचे आहे यानंतर आपणास यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस २०२३ भरतीचे ऑप्शन दिसेल.

अॅप्लाय वर क्लिक करायचे आहे सर्व विचारलेली आवश्यक माहीती फाॅममध्ये भरून घ्यायची आहे.सोबत महत्वाची कागदपत्रे अणि आपला फोटो सही देखील अपलोड करायची आहे.

अणि खाली दिलेल्या सबमीट बटणावर क्लिक करायचे आहे यानंतर आपण ओबीसी तसेच जनरल कॅटॅगरी मधील आहेत तर आपली अर्ज फी भरायची आहे.अणि एस सी एस टी पीडबलयुडी कॅटॅगरी मधील असाल तर आपणास फी भरावी लागणार नाहीये.

See also  प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०२२ विषयी माहीती - PMEGP Loan Scheme 2022 Information In Marathi

फाॅम भरून सबमिट केल्यावर आपल्याजवळ ठेवायला एक प्रत काढुन घ्यायची आहे.

आधिक माहिती – UPSC_Civil_Services_Recruitment_2023_Pre_for_1105_Posts