कोलगेट स्काँलरशिप 2022 विषयी माहीती -Colgate scholarship information in Marathi

Table of Contents

कोलगेट स्काँलरशिप 2022 -Colgate scholarship information in Marathi

कोलगेट स्काँलरशिप काय आहे?

ही एक स्कीम आहे जिच्याअंतर्गत 2022 मध्ये दहावी तसेच बारावी पास झालेल्या विदयार्थीना शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे.

कोलगेट स्काँलरशिप स्कीम 2022 चा मुख्य हेतु काय आहे?

आपल्या देशात आर्थिक परिस्थिति कमकुवत असलेले अनेक गुणवंत हुशार अणि पात्र विदयार्थी आहेत ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची शिकण्याची ईच्छा आहे पण घरची आर्थिक परिस्थिति दुर्बल असल्याने त्यांची ईच्छा पुर्ण होत नसते.

अशा आर्थिक दृष्टया कमकुवत विदयार्थ्यांना आपल्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक दृष्टया पाठबळ मिळावे.त्यांना आपले शिक्षण पुर्ण करता यावे यासाठी ही कोलगेट स्काँलरशिप विदयाथ्यांना देण्यात येत आहे.

कोलगेट स्काँलरशिप कोणासाठी राबवण्यात येत आहे?

2022 मध्ये जे विदयार्थी दहावी बारावीची परीक्षा पास झालेले आहेत अशा विदयार्थ्यांकरीता खास ही स्काँलरशिप दिली जात आहे.

कोलगेट स्काँलरशिपचे वितरण कोणाकडुन केले जाणार आहे?

  • कोलगेट किप इंडिया स्माइलिंग फाऊंडेशन स्काँलरशिपच्या वतीने ह्या कोलगेट स्काँलरशिपचे वितरण केले जाणार आहे.
  • कोलगेट कंपनीच्या सीएस आर नुसार ही स्काँलरशिप देण्यात येत आहे.
  • म्हणजेच कोलगेट कंपनी काँर्पारेट सोशल रिस्पाँन्सिबिटी ह्या नात्याने समाजाप्रती आपली असलेली एक जबाबदारी तसेच दायित्व म्हणुन ही योजना मोहीम राबवते आहे.
  • अनेक खासगी कंपन्या सामाजिक जबाबदारी कर्तव्य म्हणून देशाचे उज्ज्वल भविष्य ठरणारया तरूण पिढीच्या म्हणजेच देशाच्या विकासात आपला छोटासा हातभार म्हणुन अशा स्कीम राबवत असतात.
See also  ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था गोवा नवीन भरती | CCARI Goa Bharti 2023 In Marathi

विदयार्थ्यांना कोलगेट स्काँलरशिप का देण्यात येत आहे?

  • तरूण विदयार्थी वर्गाला आपले पुढचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी ही स्काँलरशिप विदयार्थ्यांना देण्यात येत आहे.
  • ह्या स्काँलरशिप प्रोग्रँम मध्ये भाग घेऊन स्काँलरशिपसाठी अर्ज करू शकते?
  • फक्त दहावी बारावी पास उमेदवार ह्या स्कीमचा लाभ घेण्याकरीता अर्ज करू शकतात.
  • याचसोबत जे विदयार्थी तीन वर्ष कालावधी असलेला पदवीचा अणि चार वर्ष कालावधी असलेला व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण करू राहीले त्यांना देखील ह्या स्काँलरशिपचा लाभ घेता येणार आहे.
    उदा,इंजिनिअरींग,एमबी बीएस

स्काँलरशिपचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यांना परीक्षेत किती गुण असायला हवे?

स्काँलरशिपचा लाभ घेण्याकरीता दहावी पास उमेदवाराला 75 टक्के गुण असणे गरजेचे आहे अणि बारावी पास विदयार्थ्यांना किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

कोलगेट स्काँलरशिपचा साठी पात्रतेच्या अटी कायआहेत?

● योजनेसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे पाच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.कारण ही स्कीम फक्त आर्थिक दृष्टया दुर्बल व्यक्तींसाठी आहे.

● कोलगेट स्काँलरशिपसाठी फक्त भारताचे नागरीक अर्ज करू शकणार आहे.

● स्काँलरशिपसाठी पात्र विदयार्थ्यांची निवड करण्यात काही महिन्यांचा कालावधी लागु शकतो.ज्यांची यात निवड केली जाईल त्यांच्याशी कोलगेट कंपनीकडुन संपर्क साधला जाईल.

● उमेदवाराने स्काँलरशिपचा लाभ घेण्यासाठी खोटी माहीती देऊ नये.कंपनीच्या लक्षात हा प्रकार आल्यास त्या उमेदवाराची शिष्यवृत्ती वापस देखील घेतली जाईल.

कोलगेट स्काँलरशिप अंतर्गत विदयार्थ्यांना किती रक्कम दिली जाते?

ह्या स्काँलर शिप अंतर्गत आपणास जी रक्कम दिली जाणार आहे.ती रक्कम किती असेल हे आपल्या शिक्षणावरून ठरवले जाईल.

म्हणजे समजा आपण तीन वर्षाचा कालावधी असलेल्या अभ्यासक्रमासाठी जर प्रवेश घेतलेला असेल तर आपणास दरवर्षी 30 हजारापर्यतची स्काँलरशिप दिली जाते.

कोलगेट स्का़ँलरशिप साठी विदयार्थ्यांना कोणते महत्वाचे डाँक्युमेंट लागतील?

● आधार कार्ड

● वोटर आयडी कार्ड

See also  12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारी नोकरीच्या जागा- Government job vacancy for 12 th pass students November 2022 जागा -

● ड्राईव्हिंग लायसन

● पँन कार्ड

● उत्पन्न दाखला

● दहावी बारावीचे मार्कशीट

● बोनाफाईड सर्टिफिकेट

● जिथे पुढच्या शिक्षणासाठी अँडमिशन घेतो आहे त्या काँलेजमधील अँडमिशन घेतल्यावर मिळालेली पावती

● आपण जर अपंग असाल तर आपले अपंग असल्याचे प्रमाण म्हणजेच हँण्डिकँप सर्टिफिकेट लागेल.

कोलगेट स्काँलरशिपचा साठी कुठे अणि कशापदधतीने अर्ज करायचा?

कोलगेट स्काँलरशिप मिळवण्यासाठी आपणास buddy4study.com ह्या वेबसाइट वर जाऊन आँनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

आपण हा अर्ज स्वता आपल्या मोबाइल,कंप्यूटर लँपटाँप वरून करू शकतो किंवा हा अर्ज करायला आपण एखाद्या सायबर कँफे वर देखील जाऊ शकतो.

अर्ज भरण्यच्याआधी आपण स्काँलरशिपचे सर्व अटी नियम व्यवस्थित वाचुन घ्यावेत.

कोलगेट स्काँलरशिप 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

कोलगेट स्काँलरशिप 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 ही आहे.

कोलगेट स्काँलरशिपसाठी अर्ज करायला नोंदणी शुल्क किती लागेल?

कोलगेट स्काँलरशिपसाठी अर्ज करायला कुठलेही नोंदणी शुल्क तसेच चार्ज घेतला जात नही.