क्रेडिटर अणि डेबिटर म्हणजे काय?तसेच या दोघांमधील फरक Creditor and debtor meaning and difference in Marathi
मित्रांनो अकाऊंटचा अभ्यास करत असलेल्या खुप विदयार्थ्यांच्या मनात एक डाऊट तसेच प्रश्न असतो की क्रेडिटर अणि डेबीटर म्हणजे काय असते?
क्रेडिटर अणि डेबीटर या दोघे संकल्पणा सारख्या असतात की वेगवेगळया असतात?क्रेडिटर अणि डेबीटर ह्या दोघे संकल्पणेत नेमका काय फरक असतो असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात.
म्हणुन आजच्या लेखात आपण क्रेडिटर अणि डेबीटर या दोघे संकल्पणेचा अर्थ अणि या दोघांमधला फरक जाणुन घेणार आहोत.
क्रेडिटर कोणाला म्हणतात?creditor meaning in Marathi
क्रेडिटर म्हणजे पैसे,कर्ज देणारा व्यक्ती,संस्था तसेच एखादा सावकार.उधारीत माल देणारा व्यक्ती.ज्याला भविष्यात उधार घेणारयाकडुन पैसे मिळणार असतात.
क्रेडिटरलाच अकाऊंट पेईबल असे सुदधा म्हटले जाते.
क्रेडिटर ह्या शब्दाचे पुढील काही अर्थ होत असतात.
● धनको
● सावकार
● कर्ज देणारा
● त्रणदाता
● कर्ज दाता
डेबीटर कोणाला म्हणतात?debtor meaning in Marathi
डेबीटर म्हणजे कर्ज म्हणुन पैसे घेणारा विशिष्ट व्यक्ती.ज्याला सावकाराला त्रणदात्याला उधार पैसे देणारयाला पैसे द्यायचे आहे त्याचे पैसे भविष्यात फेडायचे आहे तो व्यक्ती म्हणजे डेबीटर.डेबिटरला अकाऊंट पेईबल असे देखील म्हणतात.
डेबीटर ह्या शब्दाचे पुढील काही अर्थ होत असतात.
● देणेकरी
● त्रणी
● कर्ज घेणारा
● त्रण घेणारा
क्रेडिटर अणि डेबीटर संकल्पणेचे स्पष्टीकरण -Creditor and debtor concept –
क्रेडिटर अणि डेबीटर म्हणजे काय आपण हे एका उदाहरणासहित समजुन घेऊया.
दुकानदार हा एखाद्या सप्लायर कडुन विक्रीसाठी किराणा मालाची खरेदी करत असतो.अणि त्याच्या ग्राहकाला म्हणजेच कस्टमरला तो माल विकत असतो.
दुकानदार जेव्हा एखाद्या सप्लायरकडुन किराणा मालाची खरेदी करत असतो.तेव्हा दुकानदार हा सप्लायरला रोख पैसे देऊन त्याच्याकडुन किराणा घेऊन येत असतो.पण कधी कधी दुकानदार काही सप्लायर कडुन किराणा माल हा रोख पैसे न देता खरेदी करून आणत असतो.ज्याला क्रेडिट पर्चेसिंग असे म्हटले जाते.
याचपदधतीने काही असे ग्राहक असतात जे रोख पैसे देऊन दुकानदाराकडुन कुठलाही किराणा माल खरेदी करत असतात अणि काही असे देखील ग्राहक असतात जे दुकानदार कडुन किराणा माल उधारीत रोख पैसे न देता विकत घेत असतात.
वरील परिस्थितीत सप्लायर कडुन उधारीत माल घेणारा दुकानदार तसेच दुकानदाराकडुन उधारीत माल घेणारा ग्राहक या दोघांना आपण डेबिटर असे म्हणत असतो.
अणि तो सप्लायर ज्याने दूकानदाराला उधारीत माल दिला आहे त्याला अणि ग्राहकाला उधारीत माल देणारया दुकानदाराला आपण क्रेडिटर असे म्हणु शकतो.
म्हणजेच दुकानदाराला उधारीत किराणा माल देणारा सप्लायर क्रेडिटर असतो.तसेच ग्राहकाला उधारीत माल देणारा दूकानदार देखील एक क्रेडिटरच असतो.
अणि डेबीटर हा उधारीत माल घेणारा दुकानदार तसेच दुकानदाराकडुन उधारीत किराणा माल खरेदी करणारा ग्राहक ठरत असतो.म्हणजेच ज्या दूकानदाराकडुन सप्लायरला भविष्यात पैसे घ्यायचे असतात.ज्या ग्राहकाकडुन दूकानदाराला भविष्यात पैसे घ्यायचे असतात.
सप्लायर कोणाला म्हणतात?supplier meaning in Marathi
दुकानदार ज्याच्याकडुन मालाची खरेदी करतो त्याला सप्लायर म्हणजेच पुरवठादार असे म्हणतात.
क्रेडिट पर्चेस म्हणजे काय?Credit purchase meaning in Marathi
उधारीत किराणा माल खरेदी करणे ह्यास क्रेडिट पर्चेस असे म्हणतात.
कँश पर्चेस म्हणजे काय?Cash purchase meaning in Marathi
रोख पैसे देऊन किराणा मालाची खरेदी करणे याला कँश पर्चेस असे म्हणतात.
कँश सेल म्हणजे काय?Cash sales meaning in Marathi
रोख पैसे घेऊन किराणा माल विकणे याला कँश सेल म्हणतात.
क्रेडिट सेल म्हणजे काय?Credit sales meaning in Marathi
रोख पैसे न घेता ग्राहकाला उधारीत किराणा माल विकणे म्हणजे क्रेडिट सेल होय.