पीक विमा योजना अंतर्गत Crop Insurance -मोबाईल एप्स

पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सेवांचा लाभ घेता यावा यासाठी भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक अतिशय सोपे, शेतकऱ्यांना उपयुक्त आणि व्यापक असेमोबाईल अँप तयार केले आहे. या अँपद्वारे पीक नुकसानीची माहितीनोंदवण्याकरिता प्राधान्य देण्यात आलेले असून हे मुख्य स्त्रोत घोषित केले

आहे. पीक विमा योजना अँपद्रारे नोंदणी केल्यानंतर कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणारनाही. हे अँप तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा उपलब्ध आहेत.

पीक विमा योजना अँपद्रारे उपलब्ध सेवा

१, पीक नुकसान पूर्व सूचना

२. विमा हप्ता निश्‍चिती

३. शेतकऱ्यांचे योजनेसंबंधी प्रश्‍न आणि मदत केंद्र

पीक विमा योजना अँप कसे वापरावे

हे अँप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अप डाऊनलोड करण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर, उपलब्ध केलेल्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी अप उघडले जाऊ शकते. अप खालील लिंकचा वापर करून डाऊनलोड देखील करता येईल.

  पीक विमा योजना अँपद्वारे पीक नुकसानीची माहिती कशी द्यावी

वैयक्तिक शेतकरी खाली दिलेल्या सूचनांच्या आधारे पीक विमा अँपद्वारे विविध जोखिमेमुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती वापरू शकतात.

  1. शे तकरी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि (Password) ऑपवर लॉग इन करू शकतात किंवा ऑपच्या मुख्य पृष्ठावरील उपलब्ध ”लॉग इन शिवाय पुढे जा” टॅब निवडून लॉगीन शिवाय ही सुविधा घेऊ शकतात.
  2. पुढील पृष्ठामध्ये शेतकरी/वापरकर्त्याने पीक नुकसानीची माहिती हा टॅब निवडल्यानंतर ओ.टी.पी. मिळवण्यासाठी मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे.
  3. एकदा ओ.टी.पी. प्राप्त झाला आणि यशस्वीरीत्या नमूद केल्यानंतर शेतकऱ्यांना हंगाम-वर्ष-योजना- राज्य इत्यादी तपशील नमूद करणे आवश्यक आहे.
  4. पुढील पृष्ठामध्ये शेतकरी पुढे जाण्यासाठी अर्जाचा स्रोत आणि क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
  5. एकदा शेतकरी पुढील पृष्ठावर गेल्यानंतर, पॉलिसी तपशील तयार होतील व नुकसान भरपाई नोंद करण्यासाठी बाधीत पीक निवडणे आवश्यक आहे.
  6. पुढील पृष्ठामध्ये नुकसानीचा प्रकार, नुकसानीची तारीख, शेरा नमूद करणे आवश्यक आहे. बाधीत क्षेत्राचे फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा तपशील यशस्वीरीत्या नमूद केल्यानंतर शेतकरी प्रक्रियापूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  7. एकदा तपशील यशस्वीरीत्या सबमीट केल्यावर, यशस्वी सबमिशनचे पृष्टीकरण आणि भविष्यातील संदर्भासाठी एक डॉकेट नंबर स्क्रीनवर उपलब्ध होईल.
See also  युपी सरकारचा शिक्षण क्षेत्रातील मोठा निर्णय -UttarPradesh UPBoard CBSEBoard Education news

 कृपया लक्षात घ्या – जर शेतकऱ्याकडे अर्ज क्रमांक नसेल तर त्याने पॉलिसी तपशील पृष्ठावरील ‘“इतर पर्याय निवडा’” वर क्लिक करावे आणि आवश्यकतेनुसार वैयक्तिक, बँक, पीक आणि जमीन तपशील द्यावा.

  • पीक विमा मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन पद्धतीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
  • अँपवर पीक नुकसान माहिती /पूर्वसूचना नोंदवण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे.
  • पीक नुकसानीची पूर्वसूचना कागदपत्राशिवाय ऑनलाइन पद्धतीने तात्काळ नोंदविता येते.
  • पूर्वसूचना नोंदवण्याकरिता केंद्र शासनाने या पीक विमा मोबाईल अँपला प्रथम प्राधान्य दिलेले आहे.
  • अँपमुळे शेतकऱ्यांना पूर्वसूचना नोंदविताना कुठल्याही कागदपत्राची गरज भासणार नाही.
  • पूर्वसूचना मराठी भाषेतून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • झालेल्या पीक नुकसानीचा फोटो/व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • पूर्वसूचना नोंदविल्यानंतर पूर्वसूचना क्रमांक प्राप्त होतो.
  • अँपवर विमा प्रिमियमच्या गणनेबाबत सुविधा उपलब्ध आहे.
  • अँपवर शेतकऱ्यांना योजनेबाबतच्या अडीअडचणी बाबतची माहिती मिळून शंका-समाधान होण्याची सुविधा उपलब्ध आहे.