केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर – CTET result 2023 in Marathi

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर – CTET result 2023 in Marathi

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीटेटचा २०२२ मधील परीक्षेचा निकाल नुकताच ३ मार्च २०२३ रोजी शुक्रवारच्या दिवशी जाहीर करण्यात आला आहे.

ज्या उमेदवारांनी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ह्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सहभाग घेऊन ही परीक्षा दिली असेल ते आपला निकाल सीटेटच्या आॅफिशिअल वेबसाईट ctet.in वर जाऊन आॅनलाईन पद्धतीने घरबसल्या चेक करू शकणार आहे.

२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ह्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये लाखो उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला होता.

सीटेट परीक्षा पेपर एक मध्ये तब्बल ५,७९,८४० इतके उमेदवार उत्तीर्ण झाले होते.अणि ह्या परीक्षेकरीता एकुण १७,०४,२८२ इतक्या उमेदवारांकडुन रेजिस्ट्रेशन करण्यात आले होते.

रेजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांमध्ये फक्त १४,२२,९५९ इतक्या उमेदवारांनीच परीक्षा दिली होती.

तसेच सीटेट परीक्षा पेपर दोन साठी १५,३९,४६० इतक्या उमेदवारांकडुन रेजिस्ट्रेशन करण्यात आले होते.ज्यात १२,७६,७१ इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते.अणि यातुन ३,७६,०२० इतक्या विद्यार्थ्यांना पात्र ठरण्यात यश प्राप्त झाले आहे.

सीटेट परीक्षा ही २८ डिसेंबर २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित केली गेली होती.

राष्ट्रीय पुत्र दिनाच्या शुभेच्छा २०२३ ग्रीटिंग्ज : WhatsApp संदेश, कोट्स | National Sons Day 2023

सीटेट निकाल २०२२ ऑनलाईन कसा चेक करायचा आहे?

सर्वप्रथम उमेदवारांना सीटेटच्या आॅफिशिअल वेबसाईट CTET.nic.in वर जायचे आहे.

सीटेटच्या आॅफिशिअल वेबसाईटवर गेल्यावर होम पेज वरील सीटेट डिसेंबर २०२२ निकाल ह्या लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्या समोर एक लाॅग इन पेज ओपन होईल तिथे आपली लाॅग इन डिटेल भरायची अणि खाली दिलेल्या सबमीट बटणावर ओके करायचे आहे.

click https://cbseresults.nic.in/ctet/CtetDec22.htm

CTET result 2023 in Marathi -check online
CTET result 2023 in Marathi -check online click here

यानंतर आपल्या समोर आपला सीटेट परीक्षा डिसेंबर २०२२ चा निकाल अणि निकालाची पीडीएफ फाईल स्क्रीनवर ओपन होऊन जाईन.हया निकालाच्या यादीमध्ये आपण आपला रोल नंबर चेक करायचा आहे.

हा रिझल्ट आपण आपल्या मोबाईल डिव्हाईस मध्ये डाऊनलोड पण करू शकतो.किंवा ह्या निकालाच्या गुणपत्रिकेची प्रिंट देखील काढु शकतो.

सीबीएसई सीटेट निकाल बघण्यासाठी लिंक –

CTET result 2023 in Marathi