चालु घडामोडी मराठी २ मे २०२३ – Current affairs in Marathi

२ मे २०२३ महत्वाच्या चालु घडामोडी important current affairs in Marathi

1)बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 मध्ये मेन्स डबल्स मध्ये पहिले सुवर्णपदक चिराग शेटटी अणि सात्विक साईराज या दोघांनी जिंकलेले आहे.

ही बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप दुबई येथे झाली होती.

यात मेन्स सिंगल इंडोनेशियातील अॅथनी गितिंग याने जिंकलेले आहे.वुमन सिंगलसचे चषक तैवान येथील तै झु इंग हिने जिंकलेले आहे.

2) जागतिक विकास अहवाल 2023 डबलयु बी world bank कडुन जाहीर करण्यात आला आहे.2023 चा जागतिक विकास अहवाल जागतिक बॅकेकडुन सादर करण्यात आला आहे.

हया अहवालाचे नाव migrants refugees and society असे आहे.या अंतर्गत स्थलांतराच्या बाबतीत चाळीस टक्के वाढीच्या तुलनेत कामासाठी दुसरया देशात स्थलांतर करणारया भारतीयांसाठी120 टक्के उत्पन्न वाढीचा अंदाज या अहवालात आहे.

जागतिक बँकेच्या मते परदेशातुन वार्षिक दहा अब्ज डॉलर्स ओलांडणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.जागतिक बॅकेची स्थापणा जुलै1944 मध्ये झाली होती.याचे मुख्यालय वाॅशिंगटन डिसी इथे आहे.हया जागतिक बॅकेचे एकूण १८९ सभासद देश आहेत.

3) रिफाईंड इंधनाचा युरोप मधील सर्वात मोठा पुरवठादार देश बनण्याचा मान भारत देशाने पटकावला आहे.रिफाईंड इंधनाचा युरोप मधील सर्वात मोठा पुरवठादार असलेला देश भारत बनला आहे अणि भारतानंतर दुसरया क्रमांकावर यात सौदी अरेबिया हा देश आहे.

४) जागतिक अस्थमा दिवस २०२३ हा हया वर्षी २ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे.दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी हा जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जातो.मे महिन्यात पहिला मंगळवार २ मे २०२३ रोजी येत असल्याने हा जागतिक अस्थमा दिवस २ मेला साजरा करण्यात येणार आहे.

ह्या वर्षीची जागतिक अस्थमा दिवसाची थीम asthma care for all अशी ठेवण्यात आली आहे.

५) जम्मु काश्मीर ह्या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मिशन यूथला इनोव्हेशन राज्य श्रेणी अंतर्गत उत्कृष्ठतेसाठी पंतप्रधान ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

See also  हिमाचल प्रदेशातील कांगडा चहाला युरोपियन GI टॅग | युरोपियन कमिशन काय आहे?

मिशन युथ हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे.ज्याचा उद्देश जम्मू काश्मीर मधील तरूणांच्या सहभागासाठी सक्षमीकरणासाठी एक दोलायमान माध्यम प्रदान करणे हा आहे.

जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा ३१ आॅक्टोंबर २०१९ रोजी देण्यात आला होता.जम्मु काश्मिरची राजधानी श्रीनगर अणि जम्मु आहे.

६) a girl from kathua a sacrificial victim of ghazwa e hind ह्या पुस्तकाचे लेखक मधु पौर्णिमा किशवर हे आहेत.

७) भारतीय सैन्याने पाच महिला अधिकारींना रेजिमेंट आॅफ आर्टिलरी मध्ये नियुक्त केले आहे हया पाच महिलांचे नाव लेफ्टनंट मेहक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट आदीती यादव, लेफ्टनंट पवित्र मुदगील, लेफ्टनंट आकांक्षा असे आहे.

भारतीय सैन्य दिवस हा १५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो.याचे कमांडर इन चीफ भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आहेत.

८) रजनीश कर्नाटक यांची बॅक ऑफ इंडियाचे नवीन एमडी अणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.बॅक आॅफ इंडियाची स्थापणा १९०६ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

९) एस पिरेज याने २०२३ मधील अझरबैजान ग्रँड प्रिक्स जिंकलेला आहे.

१०) प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीत उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावर आहे.

११) नुकताच आयपीएल मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी कर्णधार डेव्हिड वॉर्नर बनलेला आहे.

१२) अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे उद्घाटन केले आहे.