चालू घडामोडी – 28 आणि 29 जानेवारी 2022 – Current Affairs Marathi January 2022

Table of Contents

चालू घडामोडी – 28 आणि 29 जानेवारी 2022 – Current Affairs Marathi January

जम्मु आणि काश्मीर पोलिसांनी जिंकली शौर्यासाठी 115 सर्वोच्च पदके :

जम्मु आणि काश्मीर पोलिसांनी यावर्षीची 189 पैकी 115 पदके जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही ह्या वर्षातील पोलिस दलातील शौर्यासाठी दिलेली गेलेली सर्वाच्च पदके आहेत.

* लोकसभा सचिवालयाकडुन लाँच करण्यात आले डिजीटल संसद अँप :

  • 27 जानेवारी 2022 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदेचे आँफिशिअल मोबाईल अँप लाँच केले आहे.ज्याचे नाव डिजीटल संसद असे आहे.
  • डिजीटल संसद अँपमुळे भारतातील नागरिकांस केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कामकाजामध्ये तसेच सभागृहाच्या कामकाजामध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.
  • डिजीटल संसद अँपचे फायदे :
  • ● डिजीटल संसद अँपचा वापर करून नागरीक संसदेतील इतर सभासद काय करू राहिले तसेच कोणत्या वादविवादात सहभागी होत आहे आणि त्याविषयावर काय बोलू राहिले याची चौकशी करू शकणार आहे.
  • ● डिजीटल संसद अँपचा वापर करून संसदेमधील सभासद हे आपली हजेरी डिजीटल देऊ शकतात.
  • ● डिजीटल संसद अँपमध्ये 1947 पासुनची सर्व अर्थसंकल्पीय भाषणे देखील आपणास पाहायला ऐकायला मिळणार आहे.
  • ● बारावी आणि सतराव्या लोकसभेपर्यत सभागृहात झालेल्या सर्व चर्चासत्राची माहीती प्राप्त करता येणार आहे.
  • ● 2022 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील डिजीटल संसद अँपवर आपणास पाहायला मिळणार आहे.याचसोबत संसदेच्या सर्व कामकाजाचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे.
See also  बांदीपुर टायगर रिझर्व म्हणजे काय?हे नाव सध्या एवढ्या चर्चेत का आहे? - Bandipur Tiger Reserve

28 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला डेटा प्रायवेसी डे :

  • संपुर्ण जगभरात 28 जानेवारी रोजी डेटा प्रायव्हेसी डे हा साजरा करण्यात येत असतो.हा दिवस साजरा करण्याचा हेतु हा जनतेस संवेदनशील बनवणे,गोपनीयता पदधती आणि तत्वांचा प्रसार करणे हा आहे.
  • प्रत्येकाला आपल्या गोपनीयतेच्या जबाबदारी स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे जेणेकरून गोपनीयतेची संस्कृती निर्माण होण्यास मदत होईल.याचसाठी ह्या वर्षीची थीम ही privacy matter ठेवण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते मराठी साहित्यिक,लेखक अनिल अवचट यांचा मृत्यु :

  • मराठी भाषेतील एक अत्यंत प्रसिदध लेखक तसेच साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन झाले आहे.
  • अनिल अवचट हे 1986 मध्ये पुण्यामधील एका व्यसन मुक्ती केंद्राचे संस्थापक होते.ज्याचे नाव मुक्तांगन पुनर्वसन केंद्र असे ठेवण्यात आले होते.
  • 1970 च्या कालावधीत अनिल अवचट यांनी साधना नावाच्या मराठी नियतकालिकाचे संपादन देखील केले होते.आणि ह्यात त्यांनी अनेक सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत झंझावाती शैलीत लेखन देखील केले होते.
  • याचसोबत अनिल अवचट यांनी दलितांवर केल्या जात असलेल्या अत्याचारावर अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत ज्यात 1985 मधील कोंडमारा तसेच 1989 मधील धार्मिक ह्या पुस्तकाचा देखील समावेश आहे.

भारतीय हाँकी संघाचे कप्तान चरणजित सिंग यांचा मृत्यु :

भारतीय हाँकी संघाचे कप्तान तसेच मिड फिल्डर चरणजित सिंग यांचा हार्ट अटँक येऊन मृत्यु झाला आहे.चरणजित सिंग यांचे वय हे 90 होते.

1964 मध्ये टोकियो येथील आँलम्पिक मँचमध्ये सुर्वणपदक जिंकलेल्या भारताच्या हांँकी टीमचे ते कप्तान होते.

फेमस कथकली डान्सर तसेच पदमश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा मृत्यु :

फ्रान्स येथील फेमस कथकली डान्सर मिलेना सालविनी यांचा मृत्यु झाला आहे.

  • इटालियन वंशीय मिलेना साल्विनी ह्या नियमितपणे भारतात भेट देत राहायच्या.आणि भारतातीलच केरळ राज्यात त्यांनी कथकली हा डान्स शिकला होता.
  • तसेच पँरिस येथे त्यांनी भारतीय नृत्य शिकविण्याच्या शाळा देखील चालवल्या होत्या.याचसोबत performing art क्षेत्रात उत्तम योगदान देण्यासाठी भारत सरकारने 2019 मध्ये त्यांना पदमश्री पुरस्कार देखील दिला होता.
See also  चालू घडामोडी – जानेवारी 2022 – Current Affairs Marathi Weekly -17-23 January

मीनाकाशी लेखी यांचे Indias women unsung hero पुस्तक(comics) प्रकाशित :

  • केंद्रिय सांस्कृतिक राज्यमंत्री मीना काशी यांनी देशातील विस्मरणात आलेल्या वुमन फ्रिडम फायटर्सला श्रदधांजली अपर्ण करण्याकरीता Indias women unsung heros या पिक्चर काँमिकचे प्रकाशन केले आहे.
  • इंडियन काँमिक्स आणि ग्राफिक नोव्हेलचे इंडियन पब्लिशर अमर चित्र कथा यांच्या पार्टनरशिपमध्ये भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाकडुन हे पुस्तक तयार केले गेले आहे.
  • ह्या 15 आँगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे साजरी केली जाणार आहेत.म्हणुन ह्या पुस्तकातुन इंडियन वुमन्स फ्रिडम फायटर्सविषयी माहीती देऊन त्यांचे जीवणचरित्र सांगितले जाणार आहे.

सत्यमंगलम टायगर प्रोजेक्टला टीएक्स टु पुरस्कार झाला प्राप्त :

  • 2010 सालापासुन इरोड जिल्हा तामिळनाडु येथील वाघांच्या संख्येत अधिक वाढ झाली असल्यामुळे 80 पर्यत प्रतिष्ठीत अशा टी एक्स टु पुरस्कार देण्यात आला आहे.
  • याचसोबत नेपाळ मधील बरदिया नँशनल पार्कला देखील वन्य लोकसंख्येत दुप्पट वाढ करण्यासाठी यावर्षीचा टीएक्स टु पुरस्कार देण्यात आला आहे.

भारतीय मसाला बोर्डाकडुन स्पाईस एक्सचेंज पोर्टल करण्यात आले लाँच :

जानेवारी 2022 मध्ये भारतीय मसाला बोर्डाकडुन स्पाईस एक्सचेंज पोर्टल लाँच करण्यात आले आहे.

  • हे पोर्टल जागतिक पातळीवर भारतीय मसाला निर्यातदार आणि खरेदी करणारे यांच्यात एका मिटिंग पाँईटच्या स्वरूपात कार्य करणार आहे.हे प्लँटफाँर्म केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडुन लाँच करण्यात आले आहे.
  • ह्या पोर्टलमध्ये विक्रेता आणि खरेदीकर्ता एकमेकांशी जोडले जावे म्हणुन आर्टिफिशल इंटलिजन्सचा वापर करण्यात आला आहे.याने मसाल्याची निर्यात अधिक वाढणार आहे.

26 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला आंतरराष्टीय सीमा शुल्क दिवस :

  • दर वर्षी 26 जानेवारी रोजी आंतराष्टीय सीमा शुल्क दिन साजरा केला जात असतो.
  • आंतरराष्टीय सीमा शुल्क दिन साजरा करण्याचा मुख्य हेतु सीमा शूल्क डिजीटल परिवर्तनात वाढ करणे हा आहे.तसेच सीमा शुल्क अधिकारींची तसैच एजंसींची भुमिका ओळखण्यासाठी तसेच कामाची परिस्थिती,त्यातील अडचणींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देखील साजरा केला जात असतो.
  • 26 जानेवारी 1953 रोजी wco ची स्थापणा झाल्याचे आपणास स्मरण राहावे म्हणुन देखील हा दिवस साजरा केला जातो.
See also  मणिपूर मधील हिंसेचे जाळपोळीचे मुख्य कारण काय आहे?Manipur violence reasons in Marathi