सायक्लाॅन मोचा म्हणजे काय? Cyclone mocha in Marathi

सायक्लाॅन मोचा म्हणजे काय? Cyclone mocha in Marathi

७ मे पासुन ९ मे २०२३ दरम्यान बंगालच्या उपसागरातुन मोचा नावाचे चक्रीवादळ सक्रीय होऊ शकते अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोचा चक्रीवादळामुळे काय परिणाम होईल?

Cyclone mocha
सायक्लाॅन मोचा म्हणजे काय?Cyclone mocha in Marathi

९ मे २०२३ दरम्यान बंगालच्या उपसागरात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात असलेल्या ह्या मोचा चक्री वादळामुळे देशाच्या पुर्व भागात पाऊस पडणार आहे.

ह्या दिवसाच्या दरम्यान पुर्व उत्तर प्रदेश,छत्तीसगड,मध्य प्रदेश,झारखंड ओडिशा,बिहार इत्यादी ठिकाणी देखील हवामानात परिवर्तन पाहावयास मिळु शकते असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

सध्याच्या हवामानाचा आढावा घेत हवामान खात्याने मासेमारी व्यवसाय करणारया कोळी बांधवांंना पुढील काही पाच सहा दिवस समुद्र किनारी न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यात पुढील चार पाच दिवसात गारपीट होऊन मुसळधार पाऊस पडु शकतो अशी शक्यता देखील हवामान खात्याकडुन वर्तवण्यात आली आहे.

मोचा चक्रीवादळाचा परिणाम समुद्र किनारपटीच्या भागात अधिक अणि इतर राज्यांत कमी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो.

मोचा चक्रीवादळाला मोचा हे नाव कसे पडले?

आतापर्यंत जेवढ्याही चक्रीवादळांना नाव ठेवण्यात आले आहे.त्याला देण्यात आलेल्या नावामागे कुठले न कुठले कारण कथा आहे आज आपण मोचा चक्रीवादळाचे नाव मोचा कसे पडले याची कथा जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जागतिक हवामान संघटना,युनायटेड नेशन इकोनाॅमिक्स अॅड सोशल कमिशन फाॅर आशिया अॅड दी पेसिफिक च्या सभासदांकडून एक संघाची यादी तयार करण्यात आली आहे.

ह्या तयार करण्यात आलेल्या संघाच्या यादीत विविध देशांची नावे समाविष्ट आहेत प्रत्येक देशाकडुन कुठल्याही एका चक्रीवादळाला नाव दिले जात असते.तसेच नाव सुचवले जाऊ शकते.

See also  मदर्स डे की शुभकामनाए और कोटस - Mothers Day quotes and wishes in Hindi

हया यादीत आपल्या भारत देशाचा देखील समावेश होतो.

पण महत्वाची बाब म्हणजे ह्या नवीन मोचा चक्रीवादळाचे नामकरण आपल्या भारत देशाकडुन करण्यात आले नसुन ह्या चक्रीवादळासाठी भारत देशाने नाव देखील सुचवले नाहीये.

मग आपणास प्रश्न हा पडतो की भारताने ह्या चक्रीवादळाचे नाव नाही ठरवले सुचवले मग हे नाव कोणी ठरवले आहे.

तर ह्या वेळेचे चक्री वादळाला देण्यात आलेले नाव भारत देशाने नव्हे तर येमेन ह्या देशाने सुचवले आहे.असे सांगितले जाते आहे की येमेन ह्या देशाने मोचा नावाचे बंदर जे लाल समुद्राच्या किनारी आहे ह्या बंदराच्या नावावरून सध्याच्या येणारया चक्रीवादळासाठी सुचवले आहे.