डोळ्याखाली काळे वर्तुळ – कारण व उपाय  – Dark circles under the eyes , causes and treatments Marathi

डोळ्याखाली काळे वर्तुळ – कारण व उपाय  – Dark circles under the eyes , causes and treatments Marathi

जेव्हा आपण खुप थकलेले असतो तेव्हा आपल्याला रात्री शांतपणे झोप लागत नसते.आणि रात्री लवकर झोप न लागल्याने आपली डोळयावरील झोप अर्धवटच राहत असते.

ज्यामुळे दुसरया दिवशी आपले कोणत्याच कामात मन लागत नसते.आणि आपल्याला दिवसभर अनफ्रेश वाटत असते.

एवढेच नाहीतर रात्री झोप पुर्ण न झाल्यामुळे आपल्या डोळयांखाली काळी वर्तुळ निर्माण होत असतात ज्याला आपण डार्क सर्कल असे देखील म्हणत असतो.

आणि डोळयांखाली काळे वर्तुळ तयार झाल्याने आपला चेहरा देखील खराब दिसत असतो.अशा वेळी आपण लगबगीने घरबसल्या डोळयांखालील डार्क सर्कल काढण्यासाठी काय करावे असे उपाय गुगल तसेच युटयुबसारख्या माध्यमांवर शोधत असतो.पण आपल्याला पाहिजे तो योग्य उपाय प्राप्त होत नसतो.

म्हणुन आजच्या लेखातुन आपण आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल का येतात?आणि ते घालवण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला ह्या समस्येपासुन कायमची सुटका प्राप्त करता येईल.

काळे वर्तुळ (डार्क सर्कल) म्हणजे काय?

जेव्हा आपल्या डोळयांखालील रक्तवाहिन्या अधिक तीव्र होत असतात.तेव्हा त्या आपल्या त्वचेद्वारे अधिक दृश्यमान होत असतात.ज्यामुळे आपल्या डोळयाच्या अवतीभोवती एक डार्क कलर तयार होत असतो ज्याला आपण डार्क सर्कल असे म्हणत असतो.

डोळयांच्या खाली डार्क सर्कल तयार होणे ही एक सामान्य बाब आहे.ज्यामुळे आपल्या डोळयाभोवतीची त्वचा फुगीर होत असते.आणि तिचा रंग देखील खराब होत असतो.

आणि हे सर्व रात्री झोप पुर्ण न झाल्याने होत असते किंवा वृदधाल्पकाळात देखील अशी समस्या आपल्याला उदभवत असते.आणि डोळयांखालच्या डार्क सर्कलमुळे आपण आपले जेवढे वय आहे त्यापेक्षा अधिक वयस्कर दिसायला लागत असतो.

See also  मंकीपॉक्स आजार - प्रमुख लक्षणे व उपचार - Monkey pox information in Marathi

 

Dark circles under the eyes , causes and treatments Marathi
किमत आणि अधिक माहिती अमेझोन साठी क्लिक करा

 

आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल का तयार होतात?

आपल्या डोयांखाली डार्क सर्कल तयार होण्यामागे अनेक कारणे असतात जी पुढीलप्रमाणे आहेत:

1)रात्री पुरेशी झोप न होणे :

2)अनुवांशिकता :

3)हार्मोनल्सचे असंतुलन :

4)व्हिटँमिनची कमतरता :

5)निर्जलीकरण :

1)रात्री पुरेशी झोप न होणे :

आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल तयार होण्याचे पहिले आणि प्रमुख कारण आहे रात्री उशिरा झोपणे हे आहे.आपण रात्री उशिरापर्यत अभ्यास करत बसतो,एखादे महत्वाचे काम करत बसतो किंवा टिव्ही बघत बसतो ज्यामुळे आपल्याला झोपायला उशिर होत असतो.

आणि सकाळी लवकर उठुन गेल्याने आपली पुरेशी झोप होत नाही ज्यामुळे आपल्या डोळयाभोवती दिवसा जी घाण साचत असते ती तशीच राहुन जात असते.ज्याचे परिणामस्वरूप आपल्या डोळयाखाली डार्क सर्कल तयार होत असतात.

2) आनुवांशिकता :काही जणांच्या डोळयाखाली डार्क सर्कल तयार होण्याचे प्रमुख कारण आनुवांशिकता हे असते.म्हणजे आई वडिलांच्या डोळयाखाली जसे डार्क सर्कल असतात तसेच डार्क सर्कल मुलांच्या डोळयाखाली देखील दिसुन येतात.पण याबाबत पुरेसा ठोस पुरावा प्राप्त झालेला नाहीये तसेच जास्त संशोधन देखील आत्तापर्यत करण्यात आलेले नाहीये.

 

3) हामोनल्सचे असंतुलन :

शरीरातील हार्मोनल्स असंतुलित झाल्यामुळे आपल्या डोळयाखाली डार्क सर्कल तयार होत असतात.आणि ही समस्या खासकरून गर्भवती समस्यांमध्ये अधिक पाहायला मिळते.

मासिक पाळीच्या वेळी गर्भवती स्त्रियांच्या डोळयांच्या अवती भोवती काही द्रव पदार्थ राहुन जात असतात त्यामुळे तसेच पुरेशी झोप न घेतल्याने देखील गर्भवती स्त्रियांंना डोळयाखाली डार्क सर्कल तयार होण्याची समस्या येत असते.

4) व्हिटँमिनची कमतरता :

जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटँमिनची ची कमतरता राहुन जात असते शरीराला पाहिजे तेवढे व्हिटँमिन मिळत नसतात तेव्हा देखील आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल तयार होत असतात.

जसे की व्हिटँमिन सी आपल्या डोळयांसाठी फायदेशीर असतात.ज्याने आपल्या डोळयांभोवतीचे रेटिनाँल तसेच इतर कलर पार्टीकल्स कमी करत असते.

5) निर्जलीकरण :

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे देखील डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरणामुळे आपल्या डोळयांच्या खाली डार्क सर्कल तयार होत असते.

See also  लहान मुलांची आरोग्यविषयक काळजी पालकांनी कशी घ्यावी ? - Kids Health tips by Dr. G.M Patil

डोळयांखाली डार्क सर्कल तयार होण्याची काही इतर कारणे  :

1)थकवा

2)आजारपण

3)डायबिटीस

आपले डोळे का फुगत असतात?त्यांना सुज का येत असते?

आपल्या डोळयांना सुज येण्यामागे तसेच ते फुगीर होण्यामागे अनेक कारणे असतात.

1)अँलर्जी :

2) सायनसची समस्या :

3) झोप न लागणे :

4) पाणी टिकुन राहणे :

1)अँलर्जी : अँलर्जीमुळे देखील आपल्या डोळयाखाली सुज येऊ शकते.कारण जेव्हा आपले शरीर अँलर्जिनमुळे हिस्टामाईन सोडत असते.तेव्हा आपल्या डोळयाच्या अवतीभोवती सुज तयार होत असते.

2) सायनसची समस्या : सायनसच्या समस्येमुळे देखील आपल्या डोळयांखाली फुगवटा तयार होत असतो.कारण जेव्हा चेहरयावर आणि डोक्यावर तणाव निर्माण होत असतो.त्यामुळे एक द्रव साचत असते.

ज्याचे परिणाम स्वरूप आपल्या रक्तवाहिन्यांच्या अवतीभोवती जळजळ होत असते.आणि याचमुळे आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल तयार होत असतात.

3) वाँटर रिटेंशन :

यामुळे देखील आपल्या डोळयाच्या आजुबाजुला फुगवटा निर्माण होत असतो.

डोळयांखालील डार्क सर्कल काढण्यासाठी आपण कोणते घरगुती नैसर्गिक उपाय करू शकतो?

आपल्या डोळया खालील डार्क सर्कल काढुन टाकण्यासाठी आपण कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी न जाता देखील घरगुती स्वरूपात दैनंदिन जीवणात वापरण्यात येत असलेल्या स्वयं पाकघरातील काही उपयोगी वस्तुंद्वारे,आयुर्वैदिक पदधतीने देखील डार्क सर्कलवर उपचार करू शकतो.

डोळयांखालील डार्क सर्कल काढण्यासाठी आपण खालील घरगुती नैसर्गिक उपाय करू शकतो :

1)टमाटा

2) काकडी :

3) लिंबाचा रस :

4) ग्रीन टी :

5)खोबरेल तेल :

6) चंदन :

7) गुलाबाचे पाणी :

8) बदामाचे तेल :

1) टमाटा : टमाटा हे डार्क सर्कलवरील एक खुप सोपे उपचाराचे माध्यम आहे.आणि टमाट्यात व्हिटँमिन सी असते याने आपली त्वचा उजळत असते.

याचसोबत टमाटयामध्ये लायकोपीन असते जे आपल्या डोळयांसाठी खुप पोषक असते.याने आपल्या डोळयांखाली असलेली सुज कमी होत असते.यासाठी रोज दहा मिनिटे टमाटयाचा तुकडा आपल्या डोळयांवर ठेवावा.

2) काकडी :

काकडीमध्ये सिलिका नावाचा घटक असतो जो आपल्या डोळयाखालचे डार्क सर्कल काढुन टाकत असतो.याने आपल्या डोळयांची सुज देखील कमी होत असते.आपण काकडी कापुन घ्यावी.आणि तिचे तुकडे 10 मिनिट आपल्या डोळयांच्या पापण्यांवर ठेवावे.

See also  सुर्यनमस्कार म्हणजे काय?सुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत? - 20 Benefits of Surya Namaskar

 

3) लिंबाचा रस :

लिंबाच्या रसामुळे आपल्या चेहरयावर असलेल्या नुकसानदायक पिशव्या काढुन टाकत असते.कारण यात आंबटपणा हा गुणधर्म असतो.जो आपल्या कातडीच्या खाली असलेल्या फँटी डिपाँझिटसचे विघटन देखील करण्याचे काम करतो.ज्यामुळे आपल्या डोळयांच्या खालील पापणीच्या उतींच्या पातळ थरास रंग येताना आपणास दिसुन येतो.

4) ग्रीन टी :

ग्रीन टी मध्ये कँफिन नावाचे एक अँण्टीआँक्सीडंट असते.ज्यामुळे आपला चेहरा उजळण्यास अधिक मदत असते.याने त्वचेची जळजळ देखील कमी होत असते.

5) खोबरेल तेल :

नारळ हा एक असा पदार्थ आहे ज्याच्या आय क्रीममध्ये असे काही फँटस असतात जे आपल्या डोळयांच्या आजुबाजुच्या पेशींची उलाढाल करण्यास साहाय्य करत असते.याने डोळयांखालील सुज कमी होत असते.

याचा उपयोग माँश्चराईजिंग एजंट,अँटी एजिंग म्हणुन डार्क सर्कल कमी करण्यासाठी केला जात असतो.

6)चंदन :

चंदनच्या पावडरमुळे आपल्या त्वचेची जळजळ कमी होत असते.आणि यामधील अँण्टी बँक्टेरिअल आपल्या चेहरयावरील मुरुम आणि डागांना दुर करते.याने आपल्या चेहरयावरील तेल शोषले जात असते आणि डार्क सर्कल निघून जात असतात.

चंदनाची पावडर जर आपण दुधाच्या मलाईत किंवा खोबरेल तेलात मिक्स करून लावल्याने आपल्या चेहरयावरील डार्क सर्कल निघुन जात असतात.

7) गुलाबाचे पाणी :

आज गुलाबाचे पाणी शतकानु शतकांपासुन डोळयांखालच्या डार्क सर्कलवर उपचार करण्यासाठी केला जातो.

रात्री झोपण्याच्या आधी थंड आणि कोमट पाण्यामध्ये बुडवून गुलाब जलाचे थेंब डोळयाच्या पापण्यांभोवती लावावे.यामुळे आपल्या डोळयांखालची सुज कमी होत असते.

8) बदामाचे तेल :

बदामाच्या तेलामुळे देखील आपल्या डोळया खालचे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होत असते.याने आपली त्वचा चांगली होण्यास अधिक साहाय्य होते.

रात्री झोपण्याआधी आपण आपल्या डोळयाच्या पापण्यांभोवती बदामाचा थर लावणे अधिक फायदेशीर ठरते.