केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ – केंद्रीय कर्मचाऱ्यांना अणि पेंशनधारकांना मोदी सरकारने दिले गिफ्ट -Dearness Allowance Central Govt Employees

केंद्रीय कर्मचाऱ्यांना अणि पेंशनधारकांना मोदी सरकारने दिले गिफ्ट

मोदी सरकारने पेंशन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के इतकी वाढ केली आहे.याआधी पेंशन धारकांचा महागाई भत्ता हा ३८ टक्के होता जो आता ३८ वरून ४२ टक्के इतका करण्यात आला आहे.

सरकारच्या ह्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी अणि पेंशनर यांना चांगलाच लाभ प्राप्त होणार आहे.कालच केंद्रीय कॅबिनेट मध्ये एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.ह्या बैठकीचे अध्यक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते.

Dearness Allowance Central Govt Employees
Dearness Allowance Central Govt Employees

मोदी सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अणि पेंशन धारकांच्या पेंशनमध्ये देखील आपणास वाढ होताना दिसुन येईल.

असे देखील म्हटले जाते की लवकरच सरकार राज्य सरकारच्या कर्मचारी वर्गाच्या वेतनामध्ये अणि पेंशन मध्ये देखील सरकारकडून अधिक वाढ केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.यासाठी सरकारकडून हालचाली देखील सुरू करण्यात आल्या आहेत असे सांगितले जाते आहे.