G20 परिषद – दिल्ली घोषणापत्र काय आहे?मुख्य मुद्दे – DELHI DECLARATION

G20 परिषद DELHI DECLARATION

नुकतीच भारतात महत्वाची अशी जी20 (G20) परिषद यशस्वीपणे पार पडली, G20 जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा एक गट आहे.

G20 परिषद – दिल्ली घोषणापत्र – DELHI DECLARATION

जी 20 – G 20

या गटात जगातील 19 देश आणि युरोपियन युनियन यांचा समावेश होतो ,जी20 हा जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि मुख्य म्हणजे या गटातील देशांचा जागतिक जीडीपीमध्ये 85 टक्के इतका मोठ वाटा आहे.

जी20 हे जागोसमोर येणाऱ्या विविध आर्थिक समस्येवर चर्चा करण्यासाठी आणि त्या समस्या वर उपाययोजना करण्यासाठी एक महत्वपूर्ण मंच आहे. या गटातर्फे अनेक महत्त्वपूर्ण करार आणि घोषणापत्रे जारी करण्यात येत असतात.जी20 हा जागतिक समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि जगासमोर असलेलं मोठी आव्हाने सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका वेळोवेळी पार पाडत आलेला आहे.

दिल्ली घोषणापत्र DELHI DECLARATION

G20 परिषद DELHI DECLARATION
G20 परिषद DELHI DECLARATION

दिल्ली घोषाणापत्र काय आहे – ELHI DECLARATION

नवी दिल्लीतील जी -20 शिखर परिषदेत 9 सप्टेंबर 2023 रोजी जी -20 अंतर्गत विविध विषयवार चर्चा झाल्यानंतर सर्व देशांनी मिळून संयुक्तरित्या एक 37 पानांच घोषणापत्र जाहीर करण्यात आले यालाच दिल्ली घोषणापत्र किंवा DELHI DECLARATION असे संबोधले जाते. या घोषणपत्रात विविध विषयांचा समावेश आहे, ते खालील प्रमाणे:

1. युक्रेनमधील युद्धः

या घोषणेत युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरकाल शांतता स्थापण्यात यावी या करता प्रयत्नशील असावे अस ठरविण्यात आले. आणि सर्व संबंधित पक्षांना धमकी किंवा शक्तीचा वापर करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले गेलं. . तसेच सर्व राज्यांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याच्या महत्त्वा वर देखील भर दिला गेला.

2.हवामान बदल:

या घोषणेने पर्यावरण समतोल साधण्यासाठी कारवाईची गरज मांडण्यात आली आणि 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी सर्व वचनबद्ध असतील यावर भर देण्यात आला. तसेच पर्यावरण समतोल साठी वित्तपुरवठ्यात “क्वांटम जंप” करण्याची मागणी केली गेली असून विकसित देशांनी 2030 पूर्वीच्या काळात विकसनशील देशांना $ 5.8-5.9 ट्रिलियन वित्त पुरवल होतें.

See also  रामकृष्ण मिशनची स्थापणा कधी अणि का करण्यात आली होती? Ramkrishna Mission information in Marathi


3.अन्न सुरक्षा:

या घोषणेत युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेवर होणा गंभीर दुष्परिणामांविषयी चिंता व्यक्त केली गेली आणि या समस्येवर त्वरित पावलं उचलली गेली हवीत असे मागणी करण्यात आली. सर्वांसाठी परवडणारी आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करण्यास सर्व सहभागी देश वचनबद्ध असतील.


4.आरोग्य:

या घोषणेत जागतिक आरोग्य सुरक्षा मजबूत करणे आणि सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजला चालना मिळण्या साठी मागणी केली गेली. भविष्यातील साथीच्या रोगांना रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याचे वचन देखील दिले.

5.डिजिटलायझेशन:

या घोषणेने आर्थिक वाढ आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटलायझेशन च्या संभाव्यता मान्यता दिली. जागतिक दृष्टीने हे अधिक समावेशक आणि टिकाऊ डिजिटल भविष्य घडविण्यास वचनबद्धता मांडली गेली


इतर मुद्देः या घोषणेत दारिद्र्य, असमानता, दहशतवाद आणि स्थलांतर यासह इतर अनेक मुद्द्यांकडेही सर्व देशाचे लक्ष वेधले जाऊन योग्य ती पावलं उचलली जातील यावर भर देण्यात आला


दिल्लीची घोषणा ही भारतासाठी महत्त्वपूर्णअशी ऐतिहासिक कामगिरी आहे, भारताला डिसेंबर 2022 मध्ये जी -20 चे अध्यक्षपद मिळाले होते जी -20 शिखर परिषद भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली  आहे आणि या घोषणेत जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीयतेबद्दल भारताची वचनबद्धता दाखवण्यात भारत यशस्वी झाला असे समजण्या येत आहे.