श्री गणेशाची मूर्ती स्थापना करताना या गोष्टींची काळजी घ्या

श्री गणेशाची मूर्ती स्थापना करताना या गोष्टींची काळजी घ्या

सगळ्याचा लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची वेळ आता काही दिवसांवर आली आहे तेव्हा आपण काही खास गोष्टींची काळजी घेणार आहोत. आज आपण श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार काही नियम जाणून घेणार आहोत चला तर मग…..

श्री गणेशाची मूर्ती स्थापना करताना या गोष्टींची काळजी घ्या

गणेश चतुर्थी मुहूर्त

या वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २:०९ वाजता सुरू होत आहे. १९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३.१३ वाजता संपेल. १९ सप्टेंबर रोजी उदय तिथीवर आधारित गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.

यंदा १९ सप्टेंबरला गणेश चुर्तर्थीपासून गणेशोत्साला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे हे तर आपल्या सर्वाना माहित आहे. खुप सा-या लोकानीतर आपल्या बप्पाची मुर्ती ही पसंद करुन ठेवली आहे. चला तर मग यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्याची ते पाहूया

  • गणपतीची मूर्ती खरेदी करताना डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीली वामुखी गणपती म्हणतात. वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते. डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं, असं म्हटलं जातं. मात्र, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.

  • सिंहासनावर बसलेल्या गणपतीची घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते, सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं, म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करा.

  • गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते. त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • पांढर्‍या मदार मूळ किंवा मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते. पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर कोणत्याही सामग्रीची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा प्रयत्न करा.
See also  बँक आँफ बडोदा पर्सनल लोन विषयी माहीती - Bank Of Baroda Personal Loan Information In Marathi

  • वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये गणेशाची मूर्तींची संख्या कधीही ३, ५, ७ किंवा ९ अशी असू नये. त्याऐवजी, तुम्ही २, ४ किंवा ६ यासारख्या सम संख्येत गणपतीच्या मूर्ती घरात ठेवू शकता.

तुम्हीला आजुन काही माहिती आसलेल्या आश्या गोष्टी आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही त्या यामध्ये नक्की अ‍ॅड करु.

।।गणपती बाप्पा मोरया।। ।।मंगलमूर्ती मोरया।।