दिनविशेष 6 मे 2033- Dinvishesh 6 May 2023

६ मे २०२३ रोजीचे महत्वाचे दिनविशेष – Dinvishesh 3May 2023

६ मे १९५५ रोजी भारतीय दिग्दर्शक,निर्माते पटकथालेखक एके लोहिदास यांचा जन्म झाला होता.

६ मे १९४३ रोजी लेखिका विणा चंद्रकांत गवाणकर यांचा जन्म झाला होता.

६ मे १९५१ रोजी नृत्यदिग्दर्शिका भरतनाट्यम नर्तिका लीला सॅमसन यांचा जन्म झाला होता.

६ मे १९५३ रोजी ब्रिटनचे पंतप्रधान अणि मजदुर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर यांचा जन्म झाला होता.

६ मे १८६१ रोजी भारतीय राजकारणी मोतीलाल गंगाधर नेहरू यांचा जन्म झाला होता.

६ मे १८५६ रोजी आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्राईड यांचा जन्म झाला होता.

६ मे १९४० रोजी प्रसिद्ध महिला तबलावादक गायिका अबन मिस्त्री यांचा जन्म झाला होता.

६ मे १९०४ रोजी थायलंड देशाच्या संसदेत निवडुन आलेली प्रथम महिला ओरापिन चैयाकिन यांचा जन्म झाला होता.

६ मे २००२ रोजी भुपेंदरनाथ किरपाल यांनी भारताच्या ३१ व्या सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळला होता.

६ मे १९९७ रोजी बॅक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता दिली गेली होती.

६ मे २००१ रोजी पोप जॉन पॉल यांनी सिरीया मधील एका मशिदीस भेट दिली होती.मशिदीला भेट देणारे हे पहिले पोप होते.

६ मे २०१५ रोजी भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली दोषी ठरवत पाच वर्षे इतका कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती.तसेच कोर्टात अपील केल्यावर जामीनावर सलमान खान याला सोडण्यात आले होते.

६ मे १९९९ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांकरिता तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता.

६ मे १९८३ रोजी जर्मनीचा क्रुर बादशहा अॅडालफ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा करण्यात आला होता.

६ मे १९५४ रोजी रोजर बेरिस्टर हे चार मिनिटात एक मैल धावणारे पहिले व्यक्ती ठरले होते.

See also  १००% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क ठरलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य

६ मे १९४९ रोजी ईडीएस एसी पहिले डिजीटल इलेक्ट्रॉनिक संगणक संचलित साॅफ्टवेअर सुरू करण्यात आले होते.

६ मे १८८९ मध्ये आयफेल टाॅवरचे उद्घाटन करण्यात आले होते.

६ मे १८४० रोजी जगातील पहिले टपाल तिकीट पेनी ब्लँक प्रसारीत करण्यात आले होते.

६ मे १८१८ रोजी राजधानी लढवताना वाराणशीबाई हया अखेरच्या बाजीरावाची पत्नी हिचा इंग्रजांकडुन पराभव करण्यात आला होता.

६ मे १९६२ रोजी शहाजहान आणि आदिलशहाने शहाजीला पराभुत करण्यासाठी आपापसात तह केला होता.

६ मे १५४२ रोजी सेंट फ्रान्सिस झेवहीअर हा तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा इथे पोहोचला होता.

६ मे २०२२ राजकारणी तसेच आमदार बौजला कृष्णा रेडी यांचे निधन झाले होते.

६ मे २००१ रोजी विख्यात कादंबरीकार लेखिका मालतीबाई बेडेकर पुणे यांचे निधन झाले होते.

६ मे १९९५ रोजी प्रवचनकार तसेच हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आचार्य गोविंदराव गोसावी यांचे निधन झाले होते.

६ मे १९९९ रोजी पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातील प्रथम ग्रंथपाल संस्थापक सदस्य कृष्णाजी शंकर हिंगवे यांचे निधन झाले होते.

६ मे १८६२ रोजी अमेरिकन विचारवंत हेनरी थोरो यांचे निधन झाले होते.

६ मे १९४६ रोजी भारतीय राजकारणी भुलाभाई देसाई यांचे निधन झाले होते.

६ मे १९५२ रोजी इटालियन डाॅक्टर शिक्षणतज्ज्ञ मारिया मोनटेसरी हिचे निधन झाले होते.