मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत तब्बल 60 जागांसाठी भरती केली जात आहे.सदर फेलो भरतीसाठी अर्ज मागवायला सुरूवात देखील झाली आहे.
सर्व इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज आँनलाईन पदधतीने सादर करायचा आहे.
ज्या योग्य आणि पात्र उमेदवारांची ह्या फेलोशिप दरम्यान निवड केली जाईल त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.
अर्ज करण्याची सुरूवात –
सदर फेलोशिपसाठी अर्ज करायला 7 फेब्रुवारी 2023 पासुन सुरूवात झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी 2 मार्च 2023 च्या आत आपले अर्ज सदर भरतीसाठी आॅनलाईन पदधतीने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची पद्धत –
- सर्व उमेदवारांनी फेलोशिपसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव -फेलोशिप
- भरती केल्या जात असलेली एकुण पदसंख्या -60
शैक्षणिक पात्रतेची अट –
- फेलोशिपसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवाराचे कोणत्याही एका शाखेतुन 60 टक्के गुण मिळवून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- कंप्युटरचे बेसिक नाॅलेज असणे आवश्यक आहे तसेच पुर्णवेळ इंटर्नशिप अप्ररेंटिसशिप आर्टिकलशिप केले असल्याचा किमान एक वर्ष इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा अट-
सदर फेलोशिपसाठी अर्ज करणारया उमेदवाराचे 2 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्ष इतके वय पुर्ण असणे आवश्यक आहे.
फेलोशिप नियुक्तीचा कालावधी –
फेलोशिप नियुक्तीचा कालावधी बारा महिने इतका असणार आहे.
अर्ज फी/परीक्षा शुल्क तसेच फी –
सर्व उमेदवारांना 500 रूपये इतके परीक्षा शुल्क फेलोशिप साठी अर्ज करायला भरावे लागणार आहे.
आॅनलाईन परीक्षा कालावधी –
सर्व उमेदवारांची परीक्षा 4 अणि 5 मार्च 2023 रोजी घेतली जाणार आहे.
माॅक टेस्ट कालावधी –
सर्व उमेदवारांची माॅक टेस्ट 3 मार्च ते 5 मार्च 2023 दरम्यान घेतली जाणार आहे.
वेतन – फेलोशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या ठरवलेल्या नियमानुसार वेतन दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप आॅफिशिअल वेबसाईट –
फेलोशिप कार्यक्रम विषयी माहीती –