फ्लड वाॅच मोबाईल ऍप चे फायदे कोणकोणते आहेत?real time flood watch app benefits
देशातील नागरिकांना पुरस्थितीची रिअल टाईम माहिती प्राप्त व्हावी म्हणून सरकारने एक नवीन अॅप लाॅच केले आहे.
पुर आल्यावर जे लाखो करोडोचे नुकसान होते ते नुकसान टाळता यावे यासाठी शासनाने रिअल टाईम फ्लुड वाॅच अॅप सुरू केले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारतात पावसाने थैमान घातले आहे.कोणत्या ठिकाणी पाऊस वाढेल कोणत्या ठिकाणी कमी होईल याचा देखील आपणास अंदाजा लावता येत नाही.
अशातच अचानक एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने पुर आला तर पुरात अनेक लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच पुरात लोक वाहुन जाऊन त्यांचा जीव जाण्याची देखील संभावना असते.
अशी पुराची स्थिती उद्भवण्याच्या आधी लोकांना सुचित करता यावे अणि होणारी जिवित तसेच वित्त हानी टाळता यावी म्हणून हे रिअल टाईम फ्लुड वाॅच अॅप सुरू करण्यात आले आहे.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर पुरस्थितीपासुन लोकांचा बचाव व्हावा म्हणून हे तंत्रज्ञानावर चालणारे अॅप विकसित केले गेले आहे.
रिअल टाईम फ्लुड वाॅच अॅपच्या माध्यमातून आपणास पुराशी संबंधित कुठलीही महत्वाची प्राप्त करता येईल अणि ज्या भागात पुर येण्याची शक्यता आहे तेथील लोकांना सुचित करू शकता येईल.
ह्या अॅपच्या माध्यमातून आपणास पुर येण्याच्या सात ते आठ दिवस आधी अंदाज प्राप्त होईल जेणेकरून आपणास पुरामुळे होणारया नुकसानाला टाळता येईल.
हे अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले गेले आहे ते म्हणजे हे अॅप आपल्याला अगदी वेळेवर अणि अचुक माहिती देण्यास सक्षम आहे.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे अॅप वापरायला देखील अगदी सोपे आहे.त्यामुळे कुठलीही व्यक्ती अगदी पुरासंबंधित माहीती ह्या अॅपच्या माध्यमातून प्राप्त करू शकते.
रिअल टाईम फ्लुड वाॅच मोबाईल अॅप दवारे आपणास पुराची सुचना टेक्स्ट स्वरुपात संदेश पाठवून तसेच व्हिडीओ संदेश पाठवून दिली जाते.
सध्या हे अॅप आपल्यासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे.लवकरच इतर भाषेत देखील हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रिअल टाईम फ्लुड वाॅच मोबाईल अॅपचा वापर कसा करायचा?
सर्वप्रथम आपणास गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन रिअल टाईम फ्लुड वाॅच अॅप डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याकडे काही परमिशन मागल्या जातील त्या आपणास द्यायच्या आहेत.
यानंतर आपण राहत असलेल्या ठिकाणी कोणकोणत्या भागात पुर येऊ शकतो हे आपणास ह्या अॅपच्या माध्यमातून जाणुन घेता येईल.
रिअल टाईम फ्लुड वाॅच अॅपचे इतर फायदे –
ह्या अॅपच्या माध्यमातून देशभरातील पुरस्थितीवर नजर ठेवता येईल.