मंगळ दोष म्हणजे काय? – Manglik Dosh

मंगळ दोष म्हणजे काय? – Manglik Dosh

जन्मपत्रिका मध्ये लग्न म्हणजे प्रथम,चतुर्थ,सप्तम किंवा अष्टमी स्थानी मंगळ येत असेल तर त्याला मंगळदोष असे म्हटले जाते.

मंगळाचा दोष असलेल्या व्यक्तीस आपण मांगलिक व्यक्ती असे सुद्धा म्हणतो.मंगळदोष असलेल्या व्यक्तींना गृहस्थाश्रमात अनेक कष्ट सहन करावे लागतात.

आज मांगळीक व्यक्ती विषयी अनेक गैरसमज निर्माण झालेले पाहावयास मिळतात जसे की एका मांगळीक व्यक्तीचे लग्न दुसरया व्यक्तीशी झाले तर वाईट परिणाम होत असतात.

पण खरे पाहायला गेले तर मंगळ हा एक उर्जा प्रदान करणारा ग्रह आहे.हा आपणास जीवनात शक्ती,साम्राज्य,शासन,आनंद काम पुत्र प्रदान करत असतो.

मंगळ दोष म्हणजे काय - Manglik Dosh
मंगळ दोष म्हणजे काय – Manglik Dosh

दितीय स्थानावरील मंगळ –

  • लग्न म्हणजे प्रथम स्थानात मंगळ असल्यामुळे ह्या व्यक्ती हट्टी अणि उग्र अशा स्वभावाच्या असतात.या स्थाना मध्ये उपस्थित मंगळाची चतुर्थ दृष्टी सुख स्थानी असल्याने ह्या व्यक्तींना गृहस्थ सुखास मुकावे लागते.
  • सातव्या स्थानावर असलेली दृष्टी ही जोडीदाराशी संबंध बिघडण्यासाठी कारणीभुत ठरत असते.तर आठव्या स्थानावर असलेली दृष्टी जोडीदारांकरीता अडचणी निर्माण करण्याचे काम करते.
  • दितीय स्थान हे धन अणि कुटुंबाचे स्थान असते.हा मंगळ नातेवाईक आणि आप्तेष्ठ यांच्यात वादविवाद निर्माण करत असतो.
  • याचाच नकारात्मक प्रभाव दांपत्य जीवनावर सुद्धा पडत असतो.हया स्थानातील मंगळ पाचव्या,आठव्या अणि नवव्या स्थानावर प्रभाव टाकत असतो.
  • याचा संततीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.यांना भाग्याची देखील साथ प्राप्त होत नसते.
  • चतुर्थ स्थानातील मंगळ हा सातव्या, दहाव्या अकराव्या स्थानावर परिणाम करतो.हा मंगळ आपणास स्थायी संपत्ती देतो पण जोडीदाराच्या अभावामुळे येणारे गृहस्थाश्रमातील क्लेश देखील यात येतात.
  • मंगळाची दृष्टी सातव्या स्थानी असल्याने जीवनात प्रेमाची कमतरता जाणवते वैचारिक मतभेद देखील होण्याची शक्यता असते.
  • ह्या मंगळामुळे घटस्फोट तसेच शारीरिक त्रास होत नाही पण वैवाहिक सुख कमी होत जाते.
  • जोडीदाराच्या सप्तम स्थानी असलेला मंगळ विवाह करण्यासाठी सर्वात हानीकारक आहे.हा मंगळ जोडीदाराच्या आरोग्यास मारक ठरतो.
  • ह्या मंगळाची प्रथम स्थान,धन स्थान अणि कर्मभावावर दृष्टी पडत असते.त्यामुळे करीअर मध्ये समस्या निर्माण होतात तसेच आर्थिक अडीअडचणी तसेच दुर्घटना देखील होऊ शकते.
  • ह्या स्थानात मंगळ असलेली विवाह बाह्य संबंध प्रस्थापित करते.याच्या अत्युच्च प्रभावाने पतीपत्नी मध्ये दुरावा वाढतो.
See also  महाराष्टातील दहा किल्यांची माहीती -10 forts information in Marathi

आठव्या स्थानातील मंगळ –

  • आठव्या स्थानाचा संबंध कष्ट भाव दुख संकटे व आयुर्मान यांच्याशी येतो.हा मंगळ मानसिक कष्ट त्रास देतो.याच्यामुळे वैवाहिक आनंद देखील नष्ट होत असतो.
  • शारीरिक व लैंगिक तक्रारी संभवत असतात.पण ह्या स्थानातील मंगळ जर वृषभ कन्या किंवा मकर राशीत असेल तर अशुभ फलाची तीव्रता कमी होते.
  • मकर राशीत असलेला मंगळ संतती संबंधी समस्या निर्माण करत असतो.

बाराव्या स्थानात मंगळ –

  • जन्मपत्रिका मध्ये बाराव्या स्थानाला व्यय स्थान असे देखील म्हटले जाते.हे निद्रेचे देखील आहे.हया स्थानात मंगळ असल्यामुळे दांपत्य सुखात बाधा येते.लैंगिक इच्छा प्रबळ होतात.
  • शुभ ग्रहांच्या अभावामुळे चारित्र्यावर डाग येऊ शकतो.असे व्यक्ती भावूक होऊन आपल्या जोडीदाराला त्रास देण्याची शक्यता असते.
  • धनाची कमतरता वैवाहिक संबंधावर प्रभाव करते.यांना गुप्तरोग तसेच रक्ताशी संबंधित एखादा आजार होऊ शकतो.