महाराष्टातील दहा किल्यांची माहीती -10 forts information in Marathi

महाराष्टातील दहा किल्यांची माहीती 10 forts information in Marathi

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याला एक जुना ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला आहे म्हणजेच आज इथे शिवाजी महाराज यांच्या,मराठा साम्राज्याच्या काळातील ऐतिहासिक किल्ले आपणास पाहायला मिळतात.जे आपल्या महाराष्टाची अधिक शोभा वाढवतात.

आज आपण अशाच काही महाराष्टातील 10 अत्यंत प्रसिदध ऐतिहासिक किल्लयांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

1) रायगड –

रायगड ह्या किल्याविषयी आपल्यातील जवळजवळ सर्वानाच माहीत आहे.कारण हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीच्या काळातील राजधानीचा किल्ला म्हणुन ओळखला जातो.

रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासुन 2698 फुट इतक्या उंचीवर सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.
रायगड ह्या किल्ल्याला ऐतिहासिक दृष्टया फार महत्वाचा किल्ला मानले जाते.रायगड

कारण हाच तो किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला गेला होता.आणि इथेच शिवरायांनी आपला शेवटचा श्वास देखील घेतला.
आतापर्यत अनेक वेळेस इंग्रजांनी आक्रमण केले आहे तरीही इंग्रज ह्या किल्ल्यास भेदु शकले नव्हते.

ह्या किल्ल्याची अजुन एक खास बाब म्हणजे येथील आपल्या बाळापर्यत पोहचण्यासाठी आपल्या जिवाची देखील पर्वा न करणारी शुर माता हिरकणी हिची कथा देखील खुपच प्रचलित आहे.

इथे भेट देण्यास गेल्यावर आपण येथे बांधण्यात आलेला हिरकणी बुरूज आणि महादवार हे दोघे नक्की बघायला हवे.ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण सकाळी आठ ते संध्याकाळी सहा ह्या कालावधीत जाऊ शकतो.

2) शिवनेरी –

शिवनेरी हा तो किल्ला आहे जिथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता.म्हणुन ऐतिहासिक दृष्टया ह्या किल्ल्याला अधिक महत्व प्राप्त होते.

 

See also  बारसु रिफायनरी प्रकरण नेमकी काय आहे? ह्या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध का केला जात आहे? - Barsu refinery project controversy in Marathi

शिवनेरी

ह्या किल्ल्यामध्ये अनेक समाध्या मशिदी आणि तळ देखील असलेले आपणास दिसुन येईल.इथे एक मंदीर देखील आहे जे शिवाई देवींचे मंदिर म्हणुन ओळखले जाते.ह्या किल्लयाची बांधणी त्रिकोणी आकारात केली गेली आहे.ह्या किल्ल्याचे ठिकाण जुन्नर आहे.

3) सिंहगड –

सिंहगड हा किल्ला सुदधा महाराष्टातील एक अत्यंत प्रसिदध किल्ला म्हणुन ओळखला जातो.सिंहगड हा किल्ला विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेल्या पुणे ह्या शहरात आहे.

हा किल्ला जेव्हा मुगलांच्या ताब्यात होता तेव्हा याची सुटका तानाजी मालुसरे यांनी केली होती आणि हा किल्ला जिंकला होता.

या किल्लयात घोडयांना बांधण्यासाठी पागा म्हणजेच तबेला देखील आहे ज्यात जेथे मराठा सैन्य आपले घोडे ठेवायचे.याचशिवाय ह्या किल्लयात तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे.राजाराम छत्रपती यांची समाधी सुदधा इथेच आहे.

4) सिंधुदुर्ग –

सिंधुदुर्ग हा किल्ला मालवण येथील किनारपटटीवर वसलेला आहे.सिंधुदुर्ग किल्ला हा 45 एकर इतक्या अंतरावर पसरलेला आपणास दिसुन येतो.

सिंधदुर्ग हा किल्ला बांधायला तीन ते चार वर्ष लागले होते.ह्या किल्लयाच्या अवतीभोवती संरक्षणासाठी भव्य आणि मोठया भिंती आहेत.ज्या नदीचे पाणी,शत्रू या दोघांपासुन बचाव करण्याच्या हेतुने बांधल्या गेल्या आहेत.ह्या किल्लयाच्या आवारात हनुमान शंकरजी यांचे मंदिर देखील आहे.

ह्या किल्लयाची अजुन एक विशेष बाब म्हणजे पावसाळयात इथे कोणालाच आत प्रवेश करू दिला जात नसतो.कारण पावसाळयामध्ये नदीचे पाणी किल्लयाच्या आत आलेले असते.

5) तोरणा किल्ला –

तोरणा किल्ला हा सुदधा महाराष्टातील एक अत्यंत प्रसिदध किल्ला आहे.ह्या किल्लयाला तोरणा किल्लयासोबत तोरणा गड देखील म्हटले जाते.हा किल्ला सुदधा विदयेचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेल्या पुणे ह्याच शहरात वसलेला आहे.

See also  आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सची Status कसा ट्रॅक करावा | How to track Status of Your ICICI Prudential Life Insurance In Marathi

याच किल्लयाच्या अवतीभोवती सिंहगड किल्ला,राजगड,पुरंदर इत्यादी प्रसिदध किल्ले देखील आहेत.

 

हा किल्ला शिवाजी महाराज यांनी मध्ये 1646 मध्ये फक्त सोळा वर्षाचे असताना जिंकण्यात यश प्राप्त केले.आणि इथेच मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली होती.

6) बाळापुर किल्ला –

बाळापुर हा किल्ला अकोला येथे स्थित आहे.1721 मध्ये औरंगजेबाचा मुलगा आँझम खान याने बांधायला सुरूवात केली.आणि ह्या किल्लयाच्या बांधणीचे काम ईस्माईल खान याने 1757 च्या सुमारास पुर्ण केले.

मान आणि महिषी या दोन्ही नद्यांचे संगम होते अशा एका लहान उंचवटयावर ह्या किल्लयाची बांधणी करण्यात आली आहे.

7) मुरूड जंजिरा किल्ला –

मुरूड जंजिरा किल्ला हा मुरूड येथील स्थित किल्ला आहे.ह्या किल्लयाची बांधणी समुद्राच्या एकदम मध्यभागी केली गेली आहे.

 

ह्या किल्लयाला एकुण 25 बुरूजे आणि दवार देखील आहेत.तसेच येथे एक मशीद सुदधा आहे जी आता उदधवस्त झाली आहे.

तसेच येथे पोहण्यासाठी तलाव देखील आहे पण हा तलाव आता तलावात पाणी नसल्याने कोरडा पडत चालला आहे.ह्या किल्लयाच्या आतील भागात अनेक मोठमोठे तोफखाने देखील असलेले आपणास पाहायला मिळते.

8) विजयदुर्ग किल्ला :

विजयदुर्ग हा एक फार जुना आणि मराठा राजवटीच्या काळातील अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणुन ओळखला जातो.165 वर्ष हा किल्ला मराठा राजवटीच्या अधिपत्यामध्ये होता.

विजयदुर्ग या किल्लयाला किमान वीस बुरूज असलेले पाहायला मिळतात.

See also  शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत | Good Morning Messages in Marathi

9) पन्हाळा किल्ला –

पन्हाळा हा पर्यटक व्यक्तिंसाठी फार उत्तम ठिकाण आहे.हाच तो किल्ला जेथे पावनखिंड लढवण्यात आली होती.ह्या किल्लयात अंबाबाईचे मंदीर देखील आहे.

10) प्रतापगड किल्ला –

हा किल्ल्याला देखील ऐतिहासिक वारसा आहे कारण इथेच शिवराय आणि अफझलखान यांच्यात घमासान युदध घडुन आले होते.हा किल्ला शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या अनेक किल्लयांपैकी एक मानला जातो.

ह्या किल्लयावर भवानी मातेचे मंदीर उभारण्यात आले आहे तसेच अफझलखान यांची समाधी देखील प्रतापगडावर तयार करण्यात आली आहे.हा किल्ला महाबळेश्वरपासुन वीस ते पंचवीस किमी इतक्या अंतरावर आहे.

Leave a Comment