पत्नीला प्रभावित कसे करावे?- How to impress wife in Marathi

पत्नीला प्रभावित कसे करावे?How to impress wife in Marathi

सुखी संसाराचा मंत्र म्हणजे लग्नानंतर पतीपत्नीत दोघांत सुसंवाद असणे,प्रेम व सौख्य असणे, एकमेकांची काळजी घेणं , त्यात पुरुषांकरता पत्नीला खुश ठेवणे, तिला काय हवे काय नको हे पाहणे प्रत्येक पतीचे पहिल कर्तव्य नाही तर जबाबदारी ही असते.

म्हणुन खुप विवाहीत पुरूष आपल्या पत्नीला खूश ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असतात.आणि यासाठी इंटरनेटवर देखील हा प्रश्न बराच सर्च करत असतात की मी माझ्या पत्नी ला इंप्रेस कस करू?

किंवा तिला इंप्रेस करण्यासाठी ती माझ्यासाठी खुप स्पेशल आहे याची तिला जाणीव करून देण्यासाठी मी काय करायला पाहिजे?

पण इंटरनेटवर याबाबद पुरेशी माहीती उपलब्ध नसल्याने आपल्याला याबाबद कुठलीही चांगली आयडीया प्राप्त होत नसते.आणि आपण निराश होऊन बसत असतो.

तुम्ही देखील ह्यावर माहीती शोधत असाल आणि तुम्हाला आतापर्यत याबाबद काही समाधानकारक माहिती मिळाली नसेल तर आज तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

कारण आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर माहीती जाणुन घेणार आहोत की पुरूषांनी आपापल्या बायकोला इंप्रेस कसे करायचे?त्यासाठी आपण काय काय उपाय करायला हवे.

चला तर मग अधिक वेळ वाया न घालविता आपल्या मुख्य विषयाकडे वळुया.

पत्नीला प्रभावित कसे करावे?How to impress wife in Marathi

पत्नीला प्रभावित करण्यासाठी आपण पुढील काही उपाय करू शकतो –

1) डिनर प्लँन करणे :

आपल्याला जर आपल्या पत्नीस इंप्रेस करायचे असेल आणि ती आपल्यासाठी किती स्पेशल आहे हे तिला सांगायचे असेल तर आपण तिला रोजच्या कामातुन वेळ काढुन एखादा चांगल्या हाँटेलात डिनरला घेऊन जाऊ शकतो.

2) घरातील कामात मदत करणे –

कामाच्या व्यापामुळे पती नेहमी घरातल्या कामात आपल्या पत्नीला मदत करू शकत नही पण आठवडयातुन तसेच महिन्यातुन एकदा तिला घरच्या कामात मदत करायला हवी.

See also  गँस सिलेंडर लीक झाल्यास काय काळजी घ्यावी ? - LPG Gas cylinder leakage-Precautions & Safety Tips

पत्नीला प्रभावित कसे करावे?- How to impress wife in Marathiकारण रोज एकटी घराचे काम करून प्रत्येकाची पत्नी खुप थकुन आणि दमुन जात असते अशात तिला विश्रांती मिळावी यासाठी आपण अधुनमधुन घरातल्या छोटया मोठया कामात तिला मदत करायला हवी.

ज्याने तिला देखील थोडा आराम मिळेल आणि आपण तिची किती काळजी करतो ती आपल्यासाठी किती स्पेशल आणि महत्वाची आहे याची आपण आपल्या पत्नीला जाणीव करून देऊ शकतो.

आणि प्रत्येक पत्नीला आपला नवरा आपली काळजी करणारा,आपल्याला महत्व देणारा असावा हेच हवे असते.

3) अधुन मधुन एखादी भेटवस्तु देणे :

सण वार असल्यावर आपण प्रत्येक जण आपल्या पत्नीला साडी दागदागिने करीत असतो.पण

 

पत्नीला प्रभावित कसे करावे?- How to impress wife in Marathiकुठलाही सण नसताना देखील अधुनमधुन आपण एखादे गिफ्ट आपल्या पत्नीला देत राहायला हवे.

आणि गिफ्ट देणे हा पत्नीला खुश करण्याचा सर्वात उत्तम उपाय मानला जातो.

4) आपल्या पत्नीच्या आईवडीलांचा घरच्यांचा नेहमी आदर करणे :

आपण आपल्या पत्नीच्या आईवडीलांचा आदर करायला हवा तिच्या आईवडीलांना आपल्या आईवडीलांचा दर्जा द्यायला हवे

कारण प्रत्येक पत्नीची ईच्छा असते की माझ्या नवरयाने माझ्या आईवडीलांचा माझ्या माहेरच्या लोकांचा आदर करावा.ती जसे तिच्या नवरयाच्या आईवडीलांना आपले आईवडील मानते तसे तिच्या नवरयानेही तिच्या आईवडीलांना आपल्या आईवडीलांचा दर्जा द्यावा.तिच्या कुटुंबाला आपले कुटुंब मानावे.

5)तिच्यासोबत वेळ व्यतित करणे :

आपण आपल्या पत्नी सोबत पुरेसा वेळ व्यतीत करायला हवा.कारण प्रत्येक पत्नीची मनोमन ही ईच्छा असते की तिच्या पतीने तिला पाहिजे तेवढा वेळ द्यायला हवा.तिच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे,तिच्यासोबत प्रेमाचे क्षण व्यतीत करावे.

6) लग्नाच्या वाढदिवसाला तिला एखादे चांगले सरप्राईज देणे-

असे म्हणतात की जे पती आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवतात लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला एखादे चांगले सरप्राईज गिफ्ट देता त्यांची पत्नी त्यांच्यावर तितके अधिक प्रेम करते.

कारण याने पत्नीला ती आपल्यासाठी किती स्पेशल आहे हे आपण सांगु शकत असतो.याची तिला जाणीव होत असते.म्हणुन पतीने आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी विसरू नये.

See also  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरयांना आता वर्षाला ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये मिळणार - NAMO shetakari mahasanman nidhi yojana

7) आपल्या मुलांसोबत वेळ व्यतीत करणे –

रोज एकटी मुलांकडे लक्ष देऊन पत्नी सुदधा रोज थकुन जात असते.यात आपण देखील मुलांकडे थोडे लक्ष दिले त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केला तर आपल्या पत्नीच्या डोक्यावरचा कामाचा भार थोडा का होईना कमी होत असतो.

8) पत्नीच्या मित्र मैत्रिणींसोबत मैत्री करावी –

आपण आपल्या पत्नीच्या जवळच्या मित्र मैत्रीणी यांच्यासोबत देखील मैत्री करायला हवी.याने आपल्याला तिच्या आवडी निवडी अधिक योग्यपणे जाणुन घेता येईल.आणि तिला खुश ठेवता येईल.

9) पत्नी आणि मुलांना घेऊन बाहेर फिरायला,पिकनिकला पिक्चरला जाणे –

आपण आठवडयातून किंवा महिन्यातुन एकदा तरी आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन बाहेर फिरायला तसेच पिकनिकसाठी जायचा प्लँन करायला हवा.

याचसोबत अधून मधून आपण तिला मुव्ही बघायला घेऊन जावे.

10) आपल्या पत्नीशी प्रेमाने बोलणे,तिच्या आवडीनिवडींची काळजी घेणे तिच्या ईच्छा निर्णयाचा नेहमी आदर करणे –

प्रत्येक पतीने नेहमी आपल्या पत्नीशी प्रेमाने बोलायला हवे.तिला काय हवे काय नको हे बघायला हवे.तिच्या आवडीनिवडींची नेहमी काळजी घ्यायला हवी.तिच्या प्रत्येक ईच्छेचा घेतलेल्या निर्णयाचा आपण नेहमी आदर करायला हवा.

11) आपल्या पत्नीला नेहमी आपल्या बरोबरीचे स्थान देणे –

आपल्या पत्नीला कधीही दुय्यम दर्जाची वागणुक देऊ नये.तिला नेहमी आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या बरोबरीने निर्णय घेण्याचा अधिकार द्यायला हवा.

12) कधीही तिच्यावर चिडु नये –

समजा आपल्या पत्नीकडुन काही चुक झाली तर आपण तिच्यावर लगेच ओरडु नये.तिला प्रेमाने तिची चुक समजावून सांगावी आणि पुन्हा असे करू नये असे समजावून सांगावे.