मानहानी खटला म्हणजे काय? हा कधी अणि केव्हा दाखल केला जातो? What is a defamation suit? When and how is it filed?

मानहानी खटला म्हणजे काय? हा कधी अणि केव्हा दाखल केला जातो? What is a defamation suit? When and how is it filed?

  1. Defamation मराठी मध्ये मानहानी करणे चारित्र्याची बदनामी करणे अब्रू नुकसानी करणे असा याचा अर्थ होतो.
  2. भारतीय दंड संहिता कलम ४९९ मध्ये दिलेल्या अब्रू नुकसानीच्या व्याख्येत असे सांगितले आहे की
  3. आपल्या बोलण्यातुन लिहिण्यातुन किंवा कुठल्याही प्रकारचे दृश्य प्रदर्शनातुन वागणूकीतुन एखाद्या व्यक्तीच्या लौकिकास बाधा निर्माण होत असेल
  4. किंवा मला बाधा पोहचत आहे असे त्या व्यक्तीस वाटत असेल अशी भावना त्याच्या मनात निर्माण होत असेल
  5. आपल्या बोलण्यामुळे वागण्यामुळे किंवा लिहिण्यामुळे त्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात आहे असे जर त्या व्यक्तीला वाटत असेल तर यास मानहानी करणे त्या व्यक्तीची अब्रुनुकसानी करणे असे म्हटले जाते.

अशा वेळी ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकते.

राहुल गांधी यांच्यावर हा मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यात त्यांना आज दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली गेली आहे.

मानहानी खटला यात दोन वर्षे शिक्षा अणि दंड अशी शिक्षा सुनावली जात असते.हा एक अदखलपात्र तसेच जामीनपात्र गुन्हा आहे.यात गुन्हेगार हाय कोर्टात शिक्षेविरूदध अपील करू शकतो.ज्यासाठी काही कालावधी देखील त्याला दिला जातो.

पण यात दिवाणी खटला असेल तर नुकसानभरपाई व दंड अशी शिक्षा होते अणि फौजदारी खटला असेल तर जेल किंवा दंड दोघांपैकी एक किंवा दोघेही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात.

चला तर मग जाणुन घेऊया काय आहे हे नेमके प्रकरण.

पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची तारीख घोषित

राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला का दाखल करण्यात आला Rahul Gandhi defamation case in Marathi

राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या एका मानहानी करणार्या एका वक्तव्याबद्दल मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्यात दोन वर्षांसाठी शिक्षा सुनावली गेली आहे.

कर्नाटक मधील एका रॅलीत बोलत असताना राहुल गांधी यांनी असा प्रश्न केला होता तसेच राहुल गांधी असे म्हटले होते की

ह्या सर्व चोरांची नावे मोदी मोदी अशीच का असतात.ज्यात त्यांनी नीरव मोदी,ललित मोदी,नरेंद्र मोदी इत्यादी मोदींचा उल्लेख केला अणि म्हटले आणखी शोध घेतला तर अजुन असे भरपुर चोर मोदी आपणास सापडतील

असा सर्व मोंदी आडनाव असलेल्या लोकांचा अपमानास्पद उल्लेख राहुल गांधी यांनी केला होता.ज्यामुळे आता त्यांना दोन वर्षांची शिक्षा तर सुनावलीच गेली आहे शिवाय आता त्यांची खासदारकी देखील धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

२०१९ मधील हे सर्व प्रकरण आहे ज्याची शिक्षा राहुल गांधी यांना आज सुनावली गेली आहे.झाले असे की २०१९ मध्ये कर्नाटक मध्ये कोललारे गावात झालेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी हा प्रश्न केला होता.

सर्व चोरांचे आडनाव मोदी तसेच सर्व चोरांचे आडनाव मोदी असेच का असते असे अपमानास्पद भाष्य तसेच सवाल राहुल गांधी यांनी आपल्या कर्नाटकात झालेल्या भाषणात केला होता.

यावर गुजरातचे आमदार तसेच माजी मंत्री पुरणेश मोदी यांनी १३ एप्रिल २०१९ या तारखेला राहुल गांधी यांच्यावर एक तक्रार दाखल केली.

ज्यात मोदी आडनावावर राहुल गांधी यांनी टिका टिप्पणी केली आहे असा आरोप पुरणेश मोदी यांनी केला होता.

२०२१ मध्ये आॅक्टोंबर महिन्यात सुरत जिल्हा न्यायालयात मध्ये हे प्रकरण दाखल झाले.

भारतीय दंड संहिता कलम ४९९ अणि कलम ५०० अंतर्गत पुरणेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला होता ज्यात राहुल गांधी यांनी आमच्या समाजाला आमच्या समाजातील मोदी आडनाव असलेल्या लोकांना चोर म्हटले म्हणुन आमच्या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

थोडक्यात मोदी आडनाव असलेल्या लोकांचा अपमान केल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला होता.

पण राहुल गांधी यांच्या वकिलानी असा युक्तिवाद केला की पुरणेश मोदी हे या प्रकरणात पिडित पक्षकार म्हणून तक्रारदार असु शकत नाही.कारण राहुल गांधी यांनी आपल्या कित्येक भाषणात पुरणेश मोदी यांना नव्हे तर नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून हे उदगार केले होते.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा राहुल गांधी यांनी सुरत कोर्टाच्या चक्करा मारल्या आहेत.यात आॅक्टोंबर २०२१ मधील शेवटच्या एका हजेरीत राहुल गांधी मी निर्दोष आहे स्वताहुन असे कोर्टाला सांगितले देखील होते.

यानंतर हया केसचा निकाल लवकरात लवकर लावला जावा दोषीला शिक्षा व्हावी म्हणून पुरणेश मोदी यांनी ही केस सुरत जिल्हा न्यायालयातुन‌ उच्च न्यायालयात नेली.

मग गुजरात उच्च न्यायालयाकडुन सूरज जिल्हा न्यायालयास केसची सुनावणी लवकरात लवकर केली जावी असे आदेश दिले.तेव्हापासुन सदर खटल्यावर सुनावणी करण्यासाठी वेगाने काम सुरू झाले.

अणि २०२३ मध्ये १७ मार्च ह्या तारखेला या प्रकरणातील‌ सर्व युक्तीवाद न्याय दंडाधिकारी एस एच वर्मा यांनी व्यवस्थित ऐकून अणि समजुन घेतले.अणि ह्या खटल्यावरील निकाल घोषित न करता राखुन ठेवला होता.

पण आज २३ मार्च २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत सुरत कोर्टाने अखेरीस राहुल गांधी यांना कलम ५०० अंतर्गत दोषी घोषित केले अणि दोन वर्षे इतक्या कालावधीची शिक्षा देखील सुनावली.अणि काही ठाराविक दंड देखील ठोठावला आहे.

ज्यावर प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांचे वकिल म्हणाले की सदर प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा नुकसान पोहचलेले नाही म्हणून आम्ही कुठलीही दयायाचिका दाखल करणार नाही.

राहुल गांधी देखील असे म्हटले आहे की मला कुठल्याही समाजाला दुखवणे हा हेतु नव्हता मी फक्त एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशुन असे बोललो होतो.

म्हणजे चार ते पाच वर्षांपासून राहुल गांधी यांच्यावर हा खटला सुरू होता.ज्यात त्यांना आज २३ मार्च २०२३ रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.

याचसोबत भिवंडी कोर्टात देखील एका आर एस एस संघटनेच्या व्यक्तीकडुन राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला गेला आहे.

महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आर एस एस चा हात होता असे एका भाषणात राहुल गांधी म्हणाले होते.ज्यामुळ आर एस एस च्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण झाली म्हणून आर एस एस मधील एक कार्यकर्ता यांनी त्यांच्यावर २०१४ दरम्यान अब्रुनुकसानीचा मानहानीचा खटला दाखल केला होता.यावर देखील अंतिम सुनावणी करून निकाल अजुन घोषित झालेला नाही.