पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची तारीख घोषित – Maharashtra police bharti written exam date 2023 in Marathi

पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची तारीख घोषित | Maharashtra police bharti written exam date 2023 in Marathi

महाराष्ट्रातील १५ लाख पेक्षा अधिक उमेदवारांनी ज्या पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई या पदाच्या भरतीसाठी अर्ज केले होते आहे.अशा उमेदवारांसाठी एक महत्वाचे अपडेट आहे.

ज्या उमेदवारांनी पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई या पदाच्या भरतीसाठी अर्ज केला होता अणि त्यांची मैदानी चाचणी पुर्ण झाली आहे किंवा बाकी आहे.

अशा उमेदवारांना कळविण्यात येते की २०२३ मधील पोलिस भरती लेखी परीक्षा जी पोलिस शिपाई चालक अणि पोलीस शिपाई पदासाठी घेतली जाणार होती त्याची तारीख घोषित करण्यात आली आहे.

 Maharashtra police bharti written exam date 2023 in Marathi
Maharashtra police bharti written exam date 2023 in Marathi

ज्या उमेदवारांनी पोलिस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केला होता त्यांची लेखी परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी घेतली जाणार आहे.

तर ज्या उमेदवारांनी पोलिस शिपाई या पदासाठी अर्ज केला होता त्यांची लेखी परीक्षा ही २ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

या बाबद अधिकृत जीआर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.ज्यात असे दिले आहे की

सन २०२१ मधील पोलिस शिपाई चालक लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकाच वेळी घेतली जाणार आहे.

२६ मार्च २०२३ रोजी पोलिस शिपाई चालक या पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.अणि २ एप्रिल २०२३ ह्या तारखेला पोलिस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा आयोजित केली जाऊ शकते.तसा विचार चालू आहे.

सदर दोन तारखांना लेखी दोन्ही पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.समजा काही घटकांत स्थानिक स्वरुपाची अडचण येत असेल किंवा त्या घटकांना नमुद केलेल्या तारखेला नमुद केलेल्या दिवशी परीक्षा घेण्यास आक्षेप असेल तर त्यांनी लवकरात लवकर म्हणजे लेखी परीक्षा आयोजित केलेल्या ठाराविक तारखेच्या अगोदरच कार्यालयास आपला आक्षेप कळवायचा आहे.

See also  ट्रान्स्क्रीप्ट म्हणजे काय? | What is Transcript?

२६/३/२०२३ रोजी पोलिस शिपाई चालक पदासाठी सकाळी साडे आठ वाजता परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलिस शिपाई चालक तसेच पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा मध्ये पात्र ठरलेल्या विविध घटकातील उमेदवारांनी आपल्या लेखी परीक्षेचे सर्टिफिकेट महाआयटी विभागामार्फत आॅनलाईन डाऊनलोड करायचे आहे.

हाॅलतिकिट डाऊनलोड करण्यासाठी देखील उमेदवारांना महाआयटी ह्या वेबसाईटवर जायचे आहे.

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

२६ मार्च रोजी परीक्षा केंद्रावर उमेदवारांना दोन तास अगोदर पोहचायचे आहे.म्हणजे साडे आठ वाजता सकाळी पेपर आहे तर सर्व उमेदवारांनी साडे सहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे.

परीक्षेला जाताना आपले हाॅलतिकिट देखील सोबत न्यायचे आहे.परीक्षेला जाताना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आयडी कार्ड इत्यादी कागदपत्र ओळखपत्र म्हणून जवळ असणे आवश्यक आहे.

परीक्षा देण्यासाठी परीक्षेला येताना काळा शाईचा पेन सोबत आणायचा आहे.


•नायगांव-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी मैदानी चाचणी (महिला) वेळापत्रक दिनांक २७_०३_२०२३ ते ३१_०३_२०२३ वेळापत्रक

•नायगांव-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी_मैदानी चाचणी वेळापत्रक दिनांक 20_03_2023 ते 25_03_2023 वेळापत्रक
•कालीना-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी_मैदानी चाचणी वेळापत्रक दिनांक 20_03_2023 ते 25_03_2023 वेळापत्रक
•मरोळ-मुंबई पोलीस भरती शारिरीक चाचणी_मैदानी चाचणी वेळापत्रक दिनांक 20_03_2023 ते 25_03_2023 वेळापत्रक
• सन – 2021 पोलीस शिपाई भरती-गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीकरीता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांकरीता सूचना