घरच्या घरी गर्भसंस्कार कसे करावे? महत्व व गरज – How to do garbh sanskar at home in Marathi

घरच्या घरी गर्भसंस्कार कसे करावे? How to do garbh sanskar at home in Marathi

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्काराला विशेष महत्व दिले जाते.ज्यात एखादे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्यावर केले जाणारे संस्कार,जावळ काढणे इत्यादींचा समावेश होतो.

असे म्हटले जाते की बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा जर त्याच्यावर चांगले संस्कार केले तर ते बाद अधिक चाणाक्ष बुदधीचे आणि विदवान बनत असते.

याचकरीता आजच्या लेखात आपण गर्भसंस्कार याविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण गर्भसंस्कार कशाला म्हटले जाते?गर्भसंस्कार कसे केले जातात?त्याचे फायदे कोणकोणते असतात?इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत.

गर्भसंस्कार कशाला म्हणतात?

कुठलेही बाळ जन्माला येण्यागोदर आईच्या पोटात म्हणजेच तिच्या गर्भात असताना त्याच्यावर जे संस्कार केले जात असतात त्यालाच गर्भसंस्कार असे म्हटले जाते.

गर्भसंस्कार का केले जातात?गर्भसंस्काराचे महत्व काय आहे?

आपले जन्माला येणारे बाळ सर्वगुणसंसन्न सकारात्मक विचारांचे असावे यासाठी त्याच्यावर आईवडील ते बाळ आईच्या गर्भात असतानाच चांगले संस्कार करत असतात

कारण असे म्हणतात की जशी बाळाची आई त्याचे वडील विचार करतात,वर्तवणूक करतात तेच संस्कार जन्माला येत असलेल्या त्या बाळावर होत असतात.जर जन्माला येणारया बाळाचे आईवडील नकारात्मक,वाईट विचार करत असतील तर ते बाळही तसेच घडत असते.

याची अनेक उदाहरणे आपणास पाहायला मिळतात जिजाऊ ह्या शुर मातेच्या पोटी जन्मलेले त्यांचे शुर पुत्र शिवराय,जिजाऊ ह्या शिवबा त्यांच्या गर्भात असताना सुदधा घुडसवारी,तलवारबाजी करत होत्या.

परिणामी त्यांच्या पोटातुन देखील शुर योदधा ह्या पृथ्वीवरून जन्माला आला.आणि जेव्हा मोगल सत्तेमुळे भारत त्रस्त झाला होता तेव्हा जिजाऊंना जनतेची ही अवस्था पाहावली जात नव्हती म्हणुन त्या मनोमन नेहमी हीच ईच्छा बाळगायच्या की देशाचे संरक्षण करण्याकरीता माझ्या पोटी एक शुरवीर बालक जन्माला यावा.आणि तेव्हा शिवबा हे जिजाऊंच्या गर्भात होते.

See also  पसायदानाचा अर्थ - Pasaydan meaning in Marathi

शिवबा जन्माला आल्यावर आपल्या मातेचे हेच राष्टप्रेमाचे राष्टसंरक्षणाचे विचार भावना आणि शौर्याचे गुण शिवबांमध्ये देखील पाहायला मिळाले.

स्वामी विवेकानंद आपल्या आईच्या गर्भात असताना त्यांच्या माता ध्यानधारणा करीत होत्या.

अणि हेच ध्यानधारणेचे,वैचारिक संस्कार विवेकानंद यांच्यावर आईच्या पोटात असतानाच झाल्याने पुढे जाऊन जन्माला आल्यावर स्वामी विवेकानंदाच्या रूपात एक ध्यानयोगी सर्व जगाला लाभला.यावरून आपणास कळून येईल की प्राचीन काळापासुनच गर्भसंस्कार हे खुप महत्वाचे मानले जाते.

याचसोबत अजुन एक उदाहरण आपल्यासमोर आहे ते म्हणजे अभिमन्यू आणि सुभद्रा यांचे.जेव्हा सुभद्रेला अभिमन्यू तिच्या गर्भात असताना अतिशय तीव्र प्रसुती वेदना होत होत्या तेव्हा अजुर्नाने सुभद्रेचे लक्ष तिच्या वेदनेवरून हटवायला तिला चक्रव्युह मध्ये कसा प्रवेश करतात हे सांगितले होते.

म्हणुन आईच्या गर्भात असतानाच चक्रव्युह भेदनाची शिक्षा प्राप्त झाल्याने अभिमन्यु कौरव पांडव यांच्यात झालेल्या युदधात कौरवांने रचलेल्या चक्रव्युहचे भेदन करू शकला होता.

बाळावर गर्भसंस्कार करण्यास सुरूवात कधी करावी?केव्हा करावी?

जेव्हा आपण बाळाला जन्म देण्याचा विचार करत असतो तेव्हापासुनच माता पित्याने आपल्या बाळावर गर्भसंस्कार करणे सुरू करून द्यावयास हवे.

गर्भसंस्कार करण्याचे फायदे कोणकोणते असतात?गर्भसंस्काराचे महत्व काय आहे

● बाळ आईच्या पोटात असताना त्याची आई जसे विचार करते जशी भावना मनात बाळगते जशी वागते बोलते,तिच्या आजुबाजुचे वातावरण असते तसेच तिचे जन्माला येणारे बाळ तिच्या पोटात असताना शिकत असते आणि त्याचे अनुकरण देखील आपल्या भावी जीवनात करत असते.म्हणुन बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्यावर वाईट आणि चुकीचे संस्कार होणार नाहीत याची प्रत्येक माता पित्याने काळजी घ्यायला हवी.

● आईच्या गर्भात असताना बाळावर जे संस्कार घडत असतात तसेच ते बाळ भविष्यात बनत,घडत असते.म्हणजेच समजा एखादी महिला गर्भवती असेल आणि तिला तिच्या सासरमध्ये त्या काळात छळले जात असेल ज्यामुळे तिचा स्वभाव एकदम बंडखोर स्वरूपाचा झाला असेल तर तिचे जन्माला येणारे बाळ देखील असेच लढाऊ आणि बंडखोर जन्माला येत असते.आणि याचठिकाणी आईने जर बाळ तिच्या गर्भात वाढत असताना सकारात्मक विचार ठेवले,चांगली सकारात्मक विचारांची धार्मिक अध्यात्मिक पुस्तके वाचली तर तिचे जन्माला येणारे बाळ देखील सकारात्मक विचार असणार,धार्मिक अध्यात्मिक प्रवृत्तीचे बनत असते.

See also  रोबोटिक्स म्हणजे काय? Robotics basic information Marathi

● बाळ आईच्या पोटात असताना गर्भसंस्काराला आरंभ केल्यामुळे सकारात्मक विचार ऐकल्यामुळे वाचल्यामुळे बाळाच्या आईच्या व्यक्तीमत्वात आणि स्वभावशैलीत जीवणविषयक दृष्टीकोनात वागणुकीत देखील बदल घडुन येत असतो.कारण गर्भसंस्काराचे महत्व काय आहे हे त्या बाळाच्या आईला पटलेले असते.त्याचे महत्व काय आणि किती आहे हे तिला कळालेले असते.

बाळावर गर्भसंस्कार कसे केले जातात?

● कुठलेही बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या मातेने पित्याने नेहमी सकारात्मक विचार करायला हवे,सकारात्मक विचारांचे पठण करायला हवे,सकारात्मक विचारांची अध्यात्मिक धार्मिक पुस्तके वाचायला हवीत आणि त्यातील विचार आत्मसात करायला हवे.बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या भविष्याविषयी माता पित्याने चांगले आणि सकारात्मक विचार करायला हवा.मनात कुठलीही नकारात्मक भावना विचार येऊ देऊ नये कारण याचा दुष्परिणाम भविष्यात जन्मणारया बाळावर होत असतो.

● गर्भवती स्त्रीने आपल्या गर्भात असलेल्या बाळाला पोषक ठरेल अशाच आहाराचे सेवण करायला हवे.

● बाळ गर्भात असताना कुठल्याही अंमली पदार्थाचे सेवण करू नये.

● बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या मातेने मेडिटेशन केल्यास तिचे जन्माला येणारे बाळ देखील शांत स्वभावाचे आणि ध्यानी योगी असे जन्माला येत असते.

● अध्यात्मिक संगीताचे श्रवण करावे.गायत्री मंत्र,श्लोक,महामृत्युंजय अशा मंत्राचा जप करावा.भजन किर्तन देवध्यान करावे.

● मातेने गर्भवती असताना कुठलाही शारीरिक मानसिक ताणतणाव घेऊ नये.नैराश्यववादी विचार करू नये.

● बाळ आईच्या पोटात असताना आईने पित्याने तसेच इतर कुटुंबियांनी त्याच्याशी संवाद साधावा.बोलत राहायला हवे त्याला सकारात्मक विचार असलेल्या सुचना देत राहाव्यात कारण आईच्या गर्भात असताना बाळ आईने सांगितलेले आजुबाजुचे लोक बोलत असतात ते सर्व काही ऐकत असते.याने जन्माला येणारे बाळ त्याची माता पिता कुटुंबातील इतर सभासद यांच्यात एक चांगली बाँडींग तयार होत असते.

बाळावर गर्भसंस्कार करण्यासाठी काही उत्तम पुस्तके –

1)गर्भसंस्कार -लेखक बालाजी तांबे