शरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची? – How to increase iron levels quickly in Marathi

Table of Contents

शरीरातील लोहाची पातळी त्वरीत कशी वाढवायची How to increase iron levels quickly in Marathi

आपल्या शरीरात ज्या लाल रक्त पेशी असतात त्यांच्यात हिमोग्लोबिन असते.आणि हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला रक्तामधील आँक्सीजनचा पुरवठा होण्यासाठी फार गरजेचे असते.

आपल्या शरीरातील लोहालाच हेम असे म्हटले जाते आणि प्रथिनांना ग्लोबिन असे म्हणतात.

जेव्हा आपण म्हणतो की शरीरात हिमोग्लोबिन कमी झाला तेव्हा त्याचा अर्थ आपल्या रक्तामधील लोहाचे प्रमाण कमी झाले असा होत असतो.

जर आपल्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर आपणास अशक्तपणा जाणवू लागतो.

जर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण गरजेपेक्षा खुपच कमी झाले तर अशावेळी आपल्या शरीरामधील लाल रक्तपेशा कमी होऊ लागत असतात.

तसेच आपल्या शरीरातील जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील कमी होत असते.आणि आपणास विविध विकार जडु लागतात.

म्हणुनच आपण आपल्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी किंवा ते कमी झाले असल्यास ते वाढवण्यासाठी आयर्नचे नियमित सेवण करायला हवे.हे सेवण देखील आपल्या लिंग आणि वयानुसार असावे.आणि त्यानूसारच आपण लोहाचा शिफारस केलेला दैनिक भत्ता मिळवणे महत्वाचे आहे.

See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवस २०२३, थीम, पोस्टर, महत्त्व आणि इतिहास | World Food Safety Day 2023 In Marathi

आजच्या लेखात आपण शरीरातील लोहाची पातळी कमी झाली असल्यास ती त्वरीत कशी वाढवायची? त्यासाठी कशा आहाराचे सेवण करायचे?इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणून घेणार आहोत.

शरीरातील लोहाची पातळी कमी असल्यास  वाढवण्यासाठी कोणत्या लोहयुक्त पदार्थाचा समावेश करावा

1)आपल्या शरीरातील लोहाची पातळी कमी झाली असल्यास ती पुन्हा वाढवण्यासाठी आपण आहारात कोणकोणत्या लोहयुक्त पदार्थाचा समावेश करावा?

आपल्या शरीरातील लोहाची पातळी कमी झाली असल्यास ती पुन्हा वाढवण्यासाठी आपण आहारात पुढील काही लोहयुक्त घटक पदार्थाचा समावेश करायला हवा –

लोहयुक्त पदार्थाची यादी पुढीलप्रमाणे आहे –

● हिरव्या पालेभाज्या :पालक,मेथी

● बीट

● मटण तसेच चिकण

● टमाटा :

● अंडी :

● मासे :

● टोफु :

● सुका मेवा,मनुका,जरदाळु :

● लोहयुक्त इतर अन्न धान्य

● ब्रेड :

● खेकडा,कोळंबी,

● बिन्स तसेच मसुर :

● पिनट बटर :

● डाळिंब :

● सफरचंद :

● ब्रोकोलीची भाजी:

● बीट तसेच गाजर :

● केळी,द्राक्ष :

● गुळ

● दाळी

● घेवडा

● भोपळा

● बदाम

शरीरात लोह अधिक कार्यक्षमतेने शोषुन घेतले जावे- Importance of iron absorption

आपण हे लक्षात घ्यायला हवं की अतिशय सूक्ष्म प्रमाणात आयर्न शरीरात शोषल जातं, साधारण 3-35% , म्हणजे च आपण पुरेसे अन्न घेत असाल , चांगला आहार ही असेल किंवा काही टॅब्लेटस,सप्लिमेंट्स ही घेत असाल तरी आपलं शरीर ते शरीरात गेलेलं आयर्न शोषून घेतंय की नाही हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. या वर अधिक लक्ष दिलं पाहिजे.

शरीरातील आपल्या पचन संस्थेद्वारे (small intestine आयर्न च शोषण केले जाते, बाकी अवयव द्वारे अन्नाच विघटन करून आयर्न पुढे रक्तात मिसळलं जाते म्हणजेच हिमोग्लोबिन मध्ये वाढ होते. याच प्रक्रिये।ला IRON ABSORPTION असे म्हणतात. आणि ही प्रक्रिया मुख्यतः Enterocytes या cells द्वारे।पार पाडली जाते.

2) आपल्या शरीरात लोह अधिक कार्यक्षमतेने शोषुन घेतले जावे यासाठी व्हिटँमिन सी असलेल्या कोणकोणत्या अन्नपदार्थाचा आहारात समावेश करावा? –

व्हिटँमिन सी हे आपल्या शरीरात अन्नपदार्थातील लोहाला अधिक कार्यक्षमतेने शोषुन घेण्यास साहाय्य करत असते.म्हणुन आपण आपल्या आहारात व्हिटँमिन सीने युक्त असलेले अन्नपदार्थ लोहयुक्त पदार्थासोबत घ्यायला हवे.

See also  झोंबी व्हायरस विषयी माहीती - Zombie Virus Information In Marathi

व्हिटँमिन सी ने युक्त असलेले अन्नपदार्थ पुढीलप्रमाणे आहेत –

● द्राक्ष

● लिंबु

● संत्री

● डाळिंब

● पेरू

● खरबुज

● किवी फळ

● टोमँटो

● स्टाँबेरी

● भोपळी मिरची

● कँटालूप हाँनिडयु

शरीरातील लोहाची पातळी त्वरीत वाढण्यासाठी आपण आयर्न सप्लीमेंट कधी आणि केव्हा घ्यायला हवे?

आपल्या शरीरातील लोहाची पातळी वाढण्यासाठी आपण आयर्न सप्लीमेंट देखील घेऊ शकतो.पण हे आयर्न सप्लीमेंट आपणास तेव्हाच घेता येते जेव्हा डाँक्टरांनी आपल्याला आयर्न सप्लीमेंट घेण्यास सांगितलेले असेल.

कारण एखाद्यावेळी आपल्या शरीरातील लोहाच्या पातळीनूसार आयर्न सप्लीमेंट घेणे गरजेचे नसु शकते.किंवा डाँक्टर आपणास शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी एखादा पुरक आहार लिहुन देऊ शकतात.

आणि समजा जरी डाँक्टरांनी आयर्न सप्लीमेंट घेण्याचा सल्ला दिला तरी ते सप्लीमेंट कसे घ्यायचे किती प्रमाणात घ्यायचे?हे डाँक्टर आपणास सांगत असतात ज्याचे आपण काळजीपुर्वक पालन करायला हवे.

रोजचा कुठलाही डोस आपण प्रमाणापेक्षा जास्त घेता कामा नये किंवा डाँक्टरांचा सल्ला घेण्याआधी तो डोस घेणे बंद देखील करू नये.

आपल्या शरीरातील लोहाची पातळी सामान्य होण्यासाठी आपल्यास किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ सप्लीमेंट घेणे गरजेचे असते.

आपण रोज आपले आयर्न सप्लिमेंट घेताना एक ग्लास संत्र्याचा रस देखील प्यायला हवा कारण हे आपल्या शरीराला अधिक लोह शोषुन घेण्यास मदत करत असते.

 असे कोणते पदार्थ आहे जे शरीरात लोह शोषुन घेण्यात अडथळा निर्माण करत असतात?

जेव्हा आपण लोहयुक्त पदार्थाचे सेवण करतो तेव्हा आपण आपल्या आहारात कोणत्या पदार्थाचे सेवण करणे टाळावे आणि का टाळावे?

● चहा

● काँफी

● बिअर

● वाईन

● सोडा

लोहयुक्त पदार्थाचे सेवण करताना आपण आपल्या आहारात वरील काही अन्न पदार्थाचा समावेश करू नये कारण वरील पदार्थाचे सेवन केल्याने अन्नामधील जे लोह आहे ते आपल्या शरीरात शोषले जात नसते.

 

आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास आपण कँल्शिअमचे सेवण मर्यादित प्रमाणात का करायला हवे?

लोहयुक्त आणि कँल्शिअमयुक्त अन्न पदार्थाचे एकत्रितपणे सेवण का करू नये?

जर आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण खुपच कमी असेल तर अशावेळी आपण कँल्शिअम युक्त अन्न पदार्थाचे सेवण एकदम मर्यादित प्रमाणात करायला हवे.

See also  केटो डाएट म्हणजे काय ? केटो आहार - Keto Diet Plan Information In Marathi

तसेच लोहयुक्त अन्नपदार्थ आणि कँल्शिअमयुक्त अन्न पदार्थाचे सेवण एकाचवेळी एकत्रितपणे करू नये.दोघांच्या सेवणात थोडेफार अंतर ठेवायलाच हवे कारण कँल्शिअमुळे आपल्या शरीरातील लोह शोषुन घ्यायला अडचण निर्माण होत असते.

आहारामधील लोहाचे शरीरामध्ये व्यवस्थित शोषण – Proper Iron Absorption

आहारामधील लोहाचे शरीरामध्ये व्यवस्थित शोषण व्हावे यासाठी आपण आहारात कोणते जीवनसत्व असलेल्या पदार्थाचा अधिक समावेश करावा?

आहारामधील लोहाचे शरीरामध्ये व्यवस्थित शोषण व्हावे यासाठी आपण आहारात क जीवनसत्व असलेल्या पदार्थाचा आणि व्हीटँमिन सीयुक्त अन्नपदार्थाचा अधिक समावेश करायला हवा.
उदा, लिंबु,संत्रे

शरीरात आयर्नची कमतरता असल्यास कसला धोका संभवतो?

आपल्या शरीरात आयर्नची म्हणजेच लोहाची कमतरता असल्यास आपणास अँनिमिया होण्याची दाट शक्यता असते.

अँनिमिया होण्याची कारणे कोणकोणती आहेत?

● शरीरात लोहाची कमतरता हे अँनिमिया होण्याचे प्रमुख कारण आहे.

● शरीरात आवश्यक जीवणसत्वांची कमतरता असणे

● बालकांमध्ये असलेला जंताचा प्रादुर्भाव कुपोषण,चुकीचा आहार घेणे ही देखील अँनिमियाचीच कारणे आहेत.

● लाल पेशींशी संबंधित काही अनुवांशिक विकार

● महिलांना प्रसुतीच्या काळात अतिरीक्त रक्तस्राव झाल्याने अँनिमिया जडत असतो.

 

अँनिमियाची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत?

● डोके दूखी

● थकवा येणे

● चक्कर येणे

● चेहरा एकदम फिकट दिसु लागणे

● हदयाची धडधड होणे

● वारंवार धाप लागणे

आणि अँनिमिया दिर्घकाळापासुन जडेल असल्यास पाय तसेच सर्व शरीराला देखील सुज येते.आणि बोटाची नखे देखील ठिसुळ दिसु लागतात.

अँनिमियाचे आपल्या शरीरावर होणारे वाईट परिणाम –

जर अँनिमिया ह्या आजारावर आपण वेळ असताच उपचार नाही केला तर आपल्या शरीराचे बरेच नुकसान होत असते.

● आपल्या हदय आणि फुफ्फुसे यांवर अतिरीक्त ताण पडत असतो जिज्ने ते निकामी होण्याचा धोका संभवत असतो.

● वारंवार थकवा येत असल्याने आपल्या शरीराची कोणतेही कार्य करण्याची क्षमता कमी कमी होत जाते.

● शरीरातील प्रतिकारशक्ती देखील कमी होत जाते.

● गर्भवती स्त्रीला अँनिमिया झाल्यास तिच्या बाळाची वाढ पुर्णपणे होत नसते.नाहीतर कमी वजन असलेले बाळ देखील जन्माला येते अशा अनेक प्रेगनेन्सी संबंधित समस्या निर्माण होत असतात.

अँनिमियावर करावयाचे निदान तसेच उपचार –

अँनिमिया झाल्यास किंवा तशी लक्षणे आपल्यात आढळून आल्यास ब्लड चेक अप करून आपण अँनिमियाचे निदान करू शकतो.

हिमोग्राम केल्यास आपणास अँनिमिया आहे का?तो कोणत्या टाईपचा आहे त्याच्या तीव्रतेचे प्रमाण किती आहे?या गोष्टी समजु शकतात.

अँनिमिया ह्या आजारावर उपचार करताना डाँक्टर रूग्णास आयर्न वाढीच्या तसेच जीवणसत्व वाढीच्या गोळया देत असतात.

अणि रुग्णाचा अँनिमिया जर तीव्र स्वरुपाचा असेल तर डाँक्टर त्याला लोहाचे इंजेक्शन देतात.तसेच इतर अनेक उपचार आहेत जे डाँक्टर करत असतात.

अँनिमिया होणे टाळण्यासाठी आपण काय उपाय करायला हवे?

● नेहमी आपल्या आहारामध्ये असे अन्नपदार्थ समाविष्ट करावे जे लोहयुक्त असतील.

● स्वयंपाक करताना लोहाचे भांडे वापरावे याने शरीराला लोह प्राप्त होण्यास मदत होते.

● नेहमी स्वच्छतेचे पालन करायला हवे,आपल्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा.कारण लहान मुलांंना अस्वच्छतेमुळेच अँनिमियाची लागण होत असते.

● गर्भवती महिला यांना अँनिमियाची लागण येऊ नये याकरीता लोहाच्या गोळया देण्यात याव्यात.आणि मुलांना जंतनाशक औषध दिले जावे.

 

Vitamin Foods list in Marathi – B12 जीवनसत्वे फायदे