Grammarly इंग्रजी लिखाण
आपण सोशल मीडिया वर करियर करू पाहत असाल जसे युट्यूब चॅनेल , Instagram ,फेसबुक किंवा ब्लोंगिंग.या सर्वात Youtube वर बोलण्याकरता एक उत्तम स्क्रिप्ट लिखाण आवश्यक असते.
फेसबुक वरआपण जाहिरात दाखवून मार्केटिंग करत असाल तर तिथे सुद्दा एक उत्तम लिखाण आवश्यक असते.ब्लॉगिंग करत असाल तर उत्तम वाचकांवर प्रभाव पाडणारे आपले लिखाण असणे गरजेचे आहे.
आपण आपल्या भाषेत मराठी किंवा कोणत्याही रिजनल भाषा असो मनातले विचार उत्तम रित्या कागदावर उतरवू शकतो. पण इंग्रजीत मात्र आपल्याला तितके प्रभावी रित्या ते मांडता येत नाहीत मग ते व्याकरण चुका असतात किंवा हवा तितकं शब्दभांडार नसतो किंवा वाक्य रचना असो किंवा समानार्थी शब्द माहीत नसणे किंवा ज्या लोकां करता लिहतो य तिथल्या लोकांचं भाषेसच पुरेसे ज्ञान आपल्या नसते.
यावर उपाय म्हणून एक प्रभावीसॉफ्टवेअर म्हणजे Grammarly – Grammarly review in Marathi
जे काही ब्लॉगर क्षेत्रात जुने आहेत, त्यातील बरीच जणे कन्टेन्ट मधील चुका सुधारण्यासाठी Grammarly चा वापर करतात.समजा तुम्हाला जर ब्लॉगर क्षेत्रात करिअर करायचे असेल,तर तुमच्यासाठी Grammarly हे चांगले टूल आहे.समजा तुम्ही जर इंग्लिश कन्टेन्ट लिहीत असाल आणि लिहिताना त्यात खूप चुका होत असतील,तुम्ही Grammarly च्या मदतीने तुमच्या चुका दुरुस्त करू शकता.ह्या लेखात आपण Grammelry बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत,जेणेकरून तुम्ही ह्या टूल चा वावर करून ब्लॉगर क्षेत्रात चांगले करिअर करू शकता.
Grammarly चा वापर कसा करतात ?
Grammarly टूल्स हे पेड आणि फ्री दोन्ही पद्धतीत असते.ह्याच्या फ्री व्हर्जन मध्ये थोडे कमी फीचर्स असतात,तर ह्याच्या पेड व्हर्जन मध्ये फ्री व्हर्जन पेक्षा अर्थातच जास्त फीचर्स असतात. इंग्लिश भाषेतील ग्रामर सुधारण्यासाठी ह्या सॉफ्टवेअर चा वापर करतात. Grammarly Inc कंपनीला 2009 मध्ये अमेरिकन टेख कंपनीने सुरू केले होते.जेव्हा तुम्ही इंग्लिश कन्टेन्ट लिहिता,तेव्हा त्या कन्टेन्ट मधील होणाऱ्या चुका जसे की , spelling, punctuation, Sentence मधील चुका हे सॉफ्टवेअर दुरुस्त करते आणि नवीन अचूक कन्टेन्ट स्क्रिन वरती दर्शवते.तुम्हाला जर Grammarly चा वापर करायचा असेल तर सुरवातीला तुम्ही त्याचे फ्री व्हर्जन वापरा आणि जसे जसे तुम्हाला त्यातील गोष्टी समजत जातील तसे पेड व्हर्जन आपण विकत घ्या.
Grammarly सॉफ्टवेअर डाउनलोड कसे करायचे ? – Grammarly review in Marathi
Grammarly डाउनलोड करण्याच्या दोन पद्धती आहेत.
पहिली पद्धत –
- सगळ्यात अगोदर गुगल क्रोम ला ओपन करा.
- त्यानंतर Extension store ओपन करा.
- Extension Store ओपन केल्यानंतर Grammarly सर्च करा.
- आता तुमच्या समोर Grammarly चे पेज येईल.
- Download बटणावर्ती क्लिक करा आणि Grammarly सॉफ्टवेअर डाउनलोड करा.
दुसरी पद्धत अशी आहे की,तुम्ही Grammarly च्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन Grammarly सॉफ्टवेअर डाउनलोड करा.
Grammarly कशा पद्धतीने काम करते ?
समजा तुम्ही जर गुगल क्रोम वरती वर्ड प्रेस, फेसबुक,ट्विटर,आणि इमेल वरती काहीतरी टाईप करत आहात आणि टाईप करताना तुमची जर काही चूक झाली तर Grammarly आपोआप त्या चुकलेल्या टेक्स्ट ना रेड कलर ने हायलाईट करते.समजा तुम्ही ब्लॉगर असाल आणि तुम्ही तुमची पोस्ट वर्ड प्रेस वर न लिहिता एम.एस वर्ड वरती लिहीत असाल आणि नंतर ती कॉपी करून वर्ड प्रेस वरती पेस्ट करत असाल,तरीही तुम्ही जेव्हा ते टेक्स्ट वर्ड प्रेस वरती पेस्ट करता तेव्हा Grammarly तुमच्या झालेल्या चुका दाखवते.जर तुमचे वाक्य लिहताना चुकले तर Grammarly तुम्हाला ते वाक्य बदलण्याचे सजेशन देते.
Grammarly फ्री व्हर्जन Vs Grammarly पेड व्हर्जन –
Grammarly तुम्हाला फ्री,पेड आणि व्यावसायिक व्हर्जन वापरण्यासाठी देते.Grammarly च्या पेड व्हर्जन ची किंमत 12 यु.एस डॉलर इतकी असते.Grammarly च्या पेड व्हर्जन मध्ये फ्री व्हर्जन पेक्ष्या जास्त फीचर्स ऍड केलेले असतात.पण तुम्हाला जर Grammarly चे पेड व्हर्जन वापरायचे असेल तर,अगोदर तुम्ही काही काळापर्यंत त्याचे फ्री व्हर्जन वापरा आणि नंतर पेड व्हर्जन विकत घ्या.
Grammarly पेड व्हर्जन मध्ये तुम्ही एम.एस वर्ड मध्ये ही ह्याचा वापर करून चुका दुरुस्त करू शकता.