जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? हया दिवसाचे महत्त्व काय आहे – World Health Day

जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?हया दिवसाचे महत्त्व काय आहे

दरवर्षी ७ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात असतो.

दरवर्षी ७ एप्रिल ह्याच तारखेला जागतिक आरोग्य दिन का साजरा करतात?

कारण ७ एप्रिल हयाच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजेच WHO world health organization ची स्थापना करण्यात आली होती.हयाच दिवशी असे ठरवण्यात ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जावा

हयामुळे हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही ७ एप्रिल १९४८ रोजी करण्यात आली होती.पण जागतिक आरोग्य दिन हा ७ एप्रिल १९५० पासुन साजरा करण्यास सुरुवात झाली होती.

म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा दिवस साजरा करण्यास आरंभ केला गेला होता.

जागतिक आरोग्य दिनाचा मुख्य हेतु काय आहे?हा दिवस का साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू हा संपूर्ण जगभरातील लोकांमध्ये आपल्या आरोग्यविषयी स्वास्थ्या विषयी जागृकता निर्माण करणे हा आहे.

आपल्या आरोग्याला हानिकारक असलेले जंकफुड फास्टफुड असे बाहेरील उघडयावरचे अन्न पदार्थ खाऊ नये हे देखील ह्या दिवशी लोकांना सांगितले जाते.

आपण आपली पहिली प्राथमिकता आपल्या आरोग्याला द्यायला हवी.आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.आपले आरोग्य हीच खरी आपली प्राथमिक संपत्ती आहे हे जगाला समजावून सांगण्याचा हा दिवस आहे.

जागतिक आरोग्य दिन हा दरवर्षी एक थीम ठरवुन साजरा केला जातो दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम निवडली जाते.

See also  २०२३ मध्ये पीएम किसान योजनेत करण्यात आले खुप मोठे बदल आता सर्वांना योजनेचा लाभ प्राप्त होणार PM KISAN yojana new guidelines in Marathi

जागतिक पातळीवर निर्माण होत असलेल्या आरोग्य विषयक विविध समस्यांचा यादिवशी विचार केला जातो अणि त्यावर काय उपाययोजना करता येईल हे ठरवले जात असते.

यादिवशी आरोग्य विषयक सेवा सुविधांविषयी जागृकता पसरवली जाते.लोकांच्या मनात आरोग्य विषयक असलेले विविध गैरसमज गैरसमजुती दुर करण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध आरोग्य विषयक धोरणे तयार केली जातात त्यावर अंमलबजावणी देखील केली जाते.

कसा साजरा केला जातो हा जागतिक आरोग्य दिवस?

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी विविध आरोग्य विषयक संस्था संघटना आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करत असतात.

ह्या दिवशी मोफत आरोग्य विषयक तपासणीसाठी शिबिर आयोजित केले जाते.आरोग्या विषयी लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध नाटक आयोजित केले जातात.शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात.