काय होता मिठाचा सत्याग्रह?हा सत्याग्रह कोणी अणि का केला होता?
आज ६ एप्रिल आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांनी दांडी येथील समुद्रातील मिठाचा खडा उचलला अणि मिठाचा सत्याग्रह केला होता.
आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
समुद्र हा किनारयालगत वास्तव्यास असलेले लोक मिठागराचा व्यवसाय करीत होते पण ही गोष्ट ब्रिटीशांना मान्य नव्हती म्हणून त्यांनी मीठावर कर लागु करण्याचे ठरवले.
ब्रिटीशांनी आपल्या अधिकार अणि दबावतंत्राचा उपयोग करत भारतीय मीठ उत्पादन बेकायदेशीर ठरवले.
ब्रिटिश सरकारने मिठावर कर लागु केल्याने ह्या कराचा आर्थिक भार गरीब दीन जनतेवर येऊ लागला होता.हया वेळी महात्मा गांधी हे गुजरात मधील साबरमती आश्रमात निवास करीत होते.
ही बाब गांधीजींच्या कानी पडताच समुद्रामध्ये मीठ तयार करण्याचा भारतीय नागरिकांना संपुर्णत हक्क आहे.यावर कुठलीही पायाबंदी लागु करण्याचा अधिकार ब्रिटीश शासनाला नाही असे म्हणत महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमापासुन १२ मार्च १९३० रोजी पायी दांडी यात्रेला सुरुवात केली.
साबरमती आश्रमातील अनेक स्त्री पुरुष लोक ह्या पायी यात्रेमध्ये गांधीजींबरोबर होते.दांडी यात्रेस आरंभ करण्याच्या आधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यावेळच्या ब्रिटिश व्हाॅईस राॅयला याबाबत सुचित देखील केले होते.
पण ब्रिटीश शासनाला सुचित करून देखील त्यांनी याविरुद्ध कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही.कारण ब्रिटीश सरकारला असे वाटत होते की गांधीजींच्या ह्या पदयात्रेमुळे आपणास कुठलाही फरक पडणार नाही.
ब्रिटिश शासनाने काढलेला हा कायदा भारतीय जनतेवर अन्याय करणारा होता हा कायदा मोडून काढण्यासाठी याचाच निषेध करण्यासाठी गांधीजींनी हया दांडी यात्रेला सुरुवात केली होती.
महात्मा गांधी यांच्या पदयात्रेमुळे अनेक जणांना प्रेरणा प्राप्त झाली
आपल्या देशातील मिठावर आपणास कर आकारला जातो आहे हे चुकीचे आहे हे लक्षात येताच अनेक भारतीय लोकांनी यात गांधीजींना येऊन मिळत ह्या निषेध यात्रेत सहभाग नोंदविला.अणि पायी पदयात्रा करत करत शेवटी ५ एप्रिल १९३० रोजी महात्मा गांधी यांची यात्रा दांडी येथे पोहोचली.
सुमारे ३८८ किलोमीटर इतके अंतर पायी प्रवास करत गांधीजी दांडी येथे पोहोचले होते.अणि मग ६ एप्रिल रोजी सकाळी रोजची प्रार्थना वगैरे आटोपून महात्मा गांधी हे समुद्र किनारयाकडे वळाले.
६ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजुन तीस मिनिटांनी महात्मा गांधी यांनी समुद्राच्या पाण्यातील एक मिठाचा खडा उचलला,समुद्राचे पाणी पिऊन अणि इंग्रज सरकारने मिठावर कर लागु करण्याच्या कायद्याचे उल्लंघन केले.
यानंतर इंग्रजांच्या लक्षात ही बाब येताच इंग्रजांनी महात्मा गांधी अणि त्यांच्या हजारो सहकारींवर कारवाई करत त्यांना सर्वांना तुरूंगात टाकले.गांधीजींना अणि त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक भारतीयांना तुरूंगात टाकल्याने भारतातील जनतेत असंतोष निर्माण झाला अणि ह्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊ लागले.
ह्या आंदोलनात परदेशी वस्तुंचा त्याग करण्यात आला परदेशी वस्तुंची होळी करण्यात आली.अणि स्वदेशीचा प्रचार प्रसार करण्यात आला होता.अशी अनेक आंदोलन इंग्रज सत्तेविरुद्ध करण्यात आली.
गांधीजींना कैद केल्यानंतर होत असलेल्या देशातील क्रांतीकारक चळवळींना आळा घालण्यासाठी इंग्रज सरकारने लाॅड एडवर्ड यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या सोबत एक करार देखील केला मग मार्च १९३१ मध्ये गांधी अणि एडवर्ड यांच्या मधील झालेल्या करारानुसार सर्व कैदमुक्त करण्यात आले होते.
अणि मग भारतीय क्रांतिकारकांना देखील आपल्या चळवळी आंदोलने थांबविण्यास सांगितले गेले