एच ओ डी चा फुलफाँर्म काय होतो? – HOD full form in Marathi

एच ओ डी चा फुलफाँर्म काय होतो?HOD full form in Marathi

एच ओ डी चा फुलफाँर्म head of department असा होत असतो.

एच ओ डी म्हणजे काय?HOD meaning in Marathi

एच ओ डी म्हणजे विभागप्रमुख,विभाग अध्यक्ष,शाखाप्रमुख होय.

एखाद्या संस्था संघटनेमधील तसेच महाविद्यालयामधील कुठल्याही एका विशिष्ट शाखेचा विभागाचा जो प्रमुख असतो त्याला एच ओ डी असे म्हणतात.

एच ओ डी ची काही उदाहरणे HOD examples in Marathi

म्हणजे समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये आर्टस फँकल्टी आहे.अणि आर्टस फँकल्टीमध्ये मराठी,हिंदी इंग्रजी,भुगोल,इतिहास,अशा विविध स्पेशल विषयांची शाखा आहे तर या प्रत्येक शाखेचा विभागाचा नेमलेला जो एक प्रमुख व्यक्ती आहे त्याला त्या डिपार्टमेंटचा एच ओ डी विभागप्रमुख म्हटले जाईल.

किंवा एखादे इंजिनिअरींग काँलेज आहे जिथे कंप्यूटर,इलेक्ट्राँनिक,मँकेनिकल,इलेक्ट्रीकल,सिव्हील अशा विविध शाखा आहेत तर या प्रत्येक शाखेचा ब्राँचचा एक विभाग प्रमुख एच ओ डी नेमला जात असतो.जो त्या डिपार्टमेंटचा हेड म्हणजेच प्रमुख असतो.

एच ओ डी चे काम काय असते?

आपल्या विभागाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे,आपल्या विभागाचे सर्व कामकाज व्यवस्थित चालले आहे की नाही याकडे व्यवस्थित लक्ष देणे.

काँलेजमध्ये जे प्रत्येक डिपार्टमेंटचा एच ओडी असतो त्याचे काम आपल्या डिपार्टमेंटच्या विदयार्थी तसेच शिक्षकांना काय हवे काय नको आहे हे पाहणे तसेच त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडवणे हे असते.

म्हणजे समजा विदयार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शैक्षणिक साहित्यांचा सोयसुविधेचा तुटवडा कमतरता जाणवत असेल तर ती सोय सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे.वेळेवर त्यांची परीक्षा घेतली जाणे.सर्व विदयाथ्यांची परीक्षा फी वेळेवर जमा करणे.

विदयार्थ्यांचा अभ्यासक्रम ठरलेल्या ठाराविक कालावधीतच पुर्ण करून घेणे.डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित केल्या जाणारया कार्यक्रमांचे उपक्रमांचे संचालन करणे.विदयाथ्यांना देखील त्यात समाविष्ट करून घेणे.

याचसोबत प्रत्येक शाखेचे एच ओ डी आपापल्या डिपार्टमधील विदयार्थ्यांना असा एक स्पेशल विषय फक्त शिकवत असतात ज्यात ते एक्सपर्ट आहेत.

See also  ऑनलाईन पद्धतीने ईपीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?How to check epf balance online in Marathi

अणि जो विषय त्या डिपार्टमधील विदयार्थींसाठी त्यांच्या करिअरच्या दृष्टीने फिल्डच्या दृष्टीने खुप महत्वपूर्ण आहे.

म्हणजे समजा कंप्यूटरचा एच ओ डी असेल तर तो एच ओ डी कंप्यूटर ब्रांचच्या विदयार्थ्यांना कंप्यूटर नेटवर्क किंवा साँफ्टवेअर डेव्हलपमेंटशी प्रोग्रामिंगशी निगडीत एखादा विषय महत्वाचा स्पेशल विषय शिकवेल.

एखाद्या महाविद्यालयात साधारणत किती एच ओ डी असतात?

एखाद्या महाविद्यालयामध्ये साधारणत जेवढया ब्रांच शाखा असतात तेवढे एच ओ डी असतात.

म्हणजे एखाद्या काँलेजात एकुण सहा ब्रांच आहेत तर तिथे एकुण एच ओ डी देखील सहा असतात जे आपापल्या विभागाचे कामकाज कसे चालले आहे हे बघण्याचे काम करतात.

म्हणजेच डिपार्टमेंटच्या कामकाजाची सर्व जबाबदारी एच ओ डी कडे असते.

एच ओ डी बनण्यासाठी आपल्यामध्ये काय पात्रता असणे आवश्यक असते?

आपण ज्या शाखेचे एच ओ डी बनतो आहे त्या शाखेत काम करण्याचा आपणास कित्येक वर्षाचा म्हणजेच किमान दहा बारा वर्षाचा प्रात्यक्षिक अनुभव असायला हवा.

त्या शाखेचे आपल्याला उत्तम नाँलेज हवे.आपण त्या शाखेत पारंगत असणे गरजेचे आहे.आपल्या ज्ञानाची पातळी उच्च असायला हवी.

जेणेकरून आपण आपल्या डिपार्टमेंट मधील विदयार्थ्यांना शिक्षकांना विभागाच्या शैक्षणिक बाबतीत अध्ययनाच्या बाबतीत चांगल्या पदधतीने मार्गदर्शन करू शकतो.

एच ओ डी का फुलफाँर्म क्या होता है HOD full form in Hindi

एच ओ डी का फुलफाँर्म head of department ऐसा होता है

एच ओ डी का मतलब क्या होता है HOD meaning in Hindi

किसी भी संस्था तथा विश्वविद्यालय की एक विशिष्ट शाखा का जो प्रमुख होता है उसे एच ओ डी मतलब विभाग अध्यक्ष के नाम से जाना जाता है