रिलेशनशिप मॅनेजर कसे बनावे? प्रकार व कामे- How to become relationship manager

रिलेशनशिप मॅनेजर कसे बनावे? how to become relationship manager

जर आपणास ह्या स्पर्धेच्या युगात टिकुन राहायचे असेल तसेच आपल्या कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये अधिकाधिक प्रगती करायची असेल तर आपल्याला कस्टमरला चांगली सर्विस देण्यासोबत आपल्या कस्टमर सोबत असलेले रिलेशन मॅनेज करणे देखील खुप गरजेचे आहे.

त्याचमुळे विविध बॅका वित्तीय संस्था आपल्या कस्टमरशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर विशेष भर देत असतात त्यासाठी ते रिलेशनशिप मॅनेजरची विशेषतः नेमणुक करत असतात.

रिलेशनशिप मॅनेजर हा देखील सेल्स टीम मधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.कारण त्याला देखील इतर सेल्स पर्सन प्रमाणे सेल्स करावा लागतो.अनेक वित्तीय संस्था बॅकेत रिलेशनशिप सल्लागार म्हणून काम करतात.

रिलेशनशिप मॅनेजर हा कस्टमर सोबत असलेले कंपनीचे, बॅकेचे संबंध चांगले ठेवण्याचे काम करतो.म्हणजेच ग्राहक अणि कंपनी संस्था यांच्यामधील संबंध व्यवस्थापनाचे कार्य रिलेशनशिप मॅनेजर करीत असतात.

बॅकेशी वित्तीय संस्थेशी कस्टमरचे असलेले चांगले मैत्रीचे सलोख्याचे संबंध नेहमी जपणे तसेच कस्टमरच्या प्रत्येक अडीअडचणी समस्या वेळेत दुर करण्यात रिलेशनशिप मॅनेजरची महत्वाची भुमिका असते.

आज कुठलाही पुरूष तसेच महिला देखील ह्या पदावर काम करून आपले करीअर करू शकते.फक्त आपल्या अंगी उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक असते.

आजच्या लेखात आपण रिलेशनशिप मॅनेजर कसे बनावे यासाठी आपणास काय करावे लागेल हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

रिलेशनशिप मॅनेजर बनण्यासाठी कोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?

आपल्या अंगी उत्तम संवाद तसेच संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.

See also  तलाठी भरती 2023 साठी टीसीएस पॅटर्नची काही महत्वाची पुस्तके TCS pattern talathi bharti 2023 book list in Marathi

आपण एक चांगला श्रोता तसेच वक्ता असणे आवश्यक आहे.

सादरीकरणाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

कंपनीच्या प्रोडक्ट सर्विस विषयी उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

नेटवर्किंगचे बॅकिंग सिस्टीमचे चांगले ज्ञान हवे.

कस्टमरच्या समस्या सोडविण्याची क्षमता हवी त्यांच्या प्रश्नांचे समाधान कारक उत्तर देण्याचे कौशल्य हवे.

रिलेशनशिप मॅनेजरचे काम काय असते?

रिलेशनशिप मॅनेजर हा तो जिथे काम करतो आहे त्या बॅकेच्या तसेच कंपनीच्या कस्टमर सोबत तसेच बिझनेस पार्टनर सोबत संवाद साधत असतो.

कंपनीचे तसेच बॅकेचे कुठलेही देवाणघेवाणीचे काम केल्यावर किंवा इतर कुठलेही व्यावसायिक काम केल्यावर त्याविषयी कंपनीच्या सीईओ कडे हा अहवाल देण्याचे काम रिलेशनशिप मॅनेजर करीत असतो.

याचसोबत रिलेशनशिप मॅनेजर हा आपल्या कंपनीच्या कस्टमरशी संपर्क साधत असतो त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या दूर करीत असतो.अणि कंपनी बॅक यांच्यातील संबंध अधिक मजबूत बनवण्याचे कार्य करतो.

कंपनीच्या सोशल नेटवर्किंग मध्ये वाढ होण्यासाठी कंपनीचा डेटा हाताळतो.कंपनीसोबत पार्टनर शीप मध्ये बिझनेस करत असलेल्या पार्टनर सोबत संवाद साधत असतो.

त्यांच्याशी देखील कंपनीचे संबंध मैत्री सलोख्याचे म्हणजेच उत्तम ठेवण्याचे प्रयत्न करत असतो.कंपनीकडुन प्रोडक्ट तसेच सर्विसेस कस्टमरला वेळेवर देण्यात येत आहे किंवा नाही याची देखील खात्री करून घेत असतात.

रिलेशनशिप मॅनेजरची इतर कामे –

बॅकेतील रिलेशनशिप मॅनेजर हा सेविंग अकाऊंट तसेच लोनसच्या फाईल तपासण्याचे अणि त्यांना पुढे पाठवण्याचे फाॅरवर्ड करण्याचे काम करतो.

क्रेडिट टीमच्या फाईलस्ची ग्रोथ चेक करणे,सिबिलचे रेटिंग चेक करणे,इत्यादी कामे देखील रिलेशनशिप मॅनेजरच करीत असतो.

रिलेशनशिप मॅनेजरचे प्रमुख प्रकार –

रिलेशनशिप मॅनेजरचे दोन मुख्य प्रकार आहेत

१) बिझनेस रिलेशनशिप मॅनेजर –

आपल्या कंपनीचे कस्टमरशी तसेच बिझनेस पार्टनरशी असलेले व्यावसायिक संबंध जपण्याचे काम बिझनेस रिलेशनशिप मॅनेजर करतो.

बिझनेस रिलेशनशिप मॅनेजर कंपनीतील अशा टीमकडे विशेष लक्ष देत असतात ज्या फायनान्स गुंतवणूक बजेट इत्यादी संबंधित कामे बघतात.

See also  45 Career and Job Terms That You Need To Know - नोकरी अर्जाकरता आवश्यक अशा  -इंग्रजी शब्दांची यादी  मराठीत अर्थासहित

२) कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर –

कस्टमरचे बॅकेशी वित्तीय संस्थेशी असलेले संबंध राखणे नेहमी कस्टमरच्या संपर्कात राहणे त्यांना काही अडीअडचणी समस्या असल्यास त्वरित त्या सोडवणे इत्यादी महत्वाची कामे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर करीत असतो.

रिलेशनशिप मॅनेजर बनण्यासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

रिलेशनशिप मॅनेजर पदावर काम करण्यासाठी आपले किमान बीबीए किंवा एम बीए इन बिझनेस मॅनेजमेंट झालेले असणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त आपण एखादा रिलेशनशिप मॅनेजर चा कोर्स देखील करू शकतो.

रिलेशनशिप मॅनेजर बनल्यावर आपणास सरकारी तसेच खासगी बॅकेत किंवा एखाद्या खाजगी कंपनीत देखील रिलेशनशिप मॅनेजर पदावर नोकरी प्राप्त होऊ शकते.

रिलेशनशिप मॅनेजरचे वेतन काय असते?

रिलेशनशिप मॅनेजर बनल्यावर सुरूवातीला आपणास महिन्याला ३० हजार पर्यंत वेतन प्राप्त होते.आपल्या अनुभव अणि स्कील नुसार यांत अधिक वाढ होत असते.

रिलेशनशिप मॅनेजर बनण्यासाठी कोणता कोर्स आपण करू शकतो?

रिलेशनशिप मॅनेजर बनण्यासाठी आपले बीबीए तसेच एम बीए झालेले असणे आवश्यक असते.याचसोबत आपण रिलेशनशिप मॅनेजरचा कोर्स देखील करू शकतो.

खाली काही महत्वाची कोर्सेसची नावे दिली आहेत जी आपण बॅकिंग फायनान्स क्षेत्रात रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरी करण्यासाठी करू शकतो.

1)bba in banking & finance

2) bcom in banking & finance

3) PG diploma in advanced financial planning and wealth management

4) मास्टर डिग्री इन बॅकिंग अॅण्ड फायनान्स

रिलेशनशिप मॅनेजरचा कोर्स उपलब्ध करून देणारया भारतातील संस्था –

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद कोलकाता

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅकिंग अॅण्ड फायनान्स नवी दिल्ली

सिंबाॅसिस आंतरराष्ट्रीय युनिव्हसिर्टी मुंबई महाराष्ट्र