भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या – Highest Paid Government Jobs In Marathi

भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या – Highest Paid Government Jobs In Marathi

आज आपल्या प्रत्येकालाच आवश्यक ते शिक्षण पुर्ण केल्यावर नोकरीची आवश्यकता असते.म्हणुन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आपण चटकन जा़ँबचा शोध घेऊ लागतो.

तसे पाहायला गेले तर तात्पुरता खासगी नोकरी ही आपणास कुठेही एखाद्या कंपनी वगैरे मध्ये सहज मिळुन जात असते.(Private Job)

पण त्यात आपणास कायमस्वरूपी तत्वावर जाँबसाठी ठेवले जात नसते.म्हणजेच प्रायव्हेट नोकरीमध्ये परमनंट असण्याची शाश्वती नसते.कधीही आपणास कामावरून काढले जाऊ शकत असते.

म्हणुन शिक्षण पुर्ण केल्यावर प्रत्येक जण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतो.कारण सरकारी नोकरीत परमनंट जाँबची हमी आपणास प्राप्त होत असते.शिवाय चांगले वेतन तसेच बंगला,कार तसेच इतर सोयी सुविधा देखील आपणास उपलब्ध होत असतात.

म्हणुनच आज प्रत्येक जण सरकारी नोकरीला अधिक आणि विशेष प्राधान्य देत असतो.आज मुलीवाले लग्नासाठी देखील आपल्या मुलीसाठी सरकारी नोकरी असलेलाच वर शोधत असतात.याला कारण यात आपणास प्राप्त होणारी जाँब सुरक्षिततेची हमी हे आहे.

आजच्या लेखात आपण अशाच काही भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्यां(Highest Paid Government Jobs) विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो अधिक वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत?- Highest Paid Government Jobs In Marathi

भारतातील सर्वाधिक पगार असलेल्या काही प्रमुख सरकारी नोकऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-

1)रेल्वे इंजिनिअर:

मित्रांनो दहावी तसेच बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व विदयार्थी तसेच विदयार्थीनी हे इंजिनिअरींग कडे अधिक वळत असतात.असे समजा की ही आपल्याकडची एक प्रथा परंपराच झाली आहे.

म्हणून आज कंप्युटर इंजिनिअरींग,सिव्हील इंजिनिअरींग,मँकेनिकल इंजिनिअरींग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग अशा विविध शाखांमध्ये लाखो विदयार्थी तसेच विदयार्थीनी डिप्लोमा तसेच इंजिनिअरींगसाठी अँडमिशन घेत असतात.

रेल्वे इंजिनिअरींग हा सुदधा इंजिनिअरींगमधील असाच एक सर्वाधिक पगाराचा जाँब आहे.

See also  परीक्षा पे चर्चा 2023 विषयी माहिती pariksha pe charcha 2023 information in Marathi

मित्रांनो रेल्वे इंजिनिअर ही एक अशी पोस्ट हवा ज्यात आपल्या देशात इतर सरकारी इंजिनिअर्सच्या तुलनेत सर्वाधिक वेतन दिले जाते.हे वेतन किमान 75 हजार ते दोन लाखापर्यत असु शकते.

याचसोबत रेल्वे इंजिनिअरला इतर सोयी सुविधा देखील पुरवल्या जात असतात.ज्यात त्याला राहायला घर दिले जाते.प्रवासाचा खर्च,भत्ता,मेडिकल सुविधा अशा अनेक सोयी सुविधा देखील रेल्वे इंजिनिअर्सला आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना प्राप्त होत असतात.

2) आयकर अधिकारी(Income Tax Officer) :

आज जगभरात जेवढेही व्यक्ती आपापल्या जाँब,बिझनेस मधुन कमाई करीत आहेत त्या सर्वाना आपल्या कमाईचा हिशोब आयकर अधिकारीजवळ द्यावा लागत असतो.

ह्या जाँब पोस्टमध्ये आपणास चांगले वेतन प्राप्त होत असते.येथे आपणास किमान 50 हजार ते एक लाखापर्यत वेतन प्राप्त होत असते.सोबत येण्याजाण्यासाठी सरकारी कार,राहण्यासाठी सरकारी बंगला,भत्ता इत्यादी सुविधा देखील आपणास प्राप्त होत असतात.

याशिवाय यात आपणास बढती प्राप्त करण्याची देखील संधी असते.ज्यात आपण इन्कम टँक्स आँफिसरपासुन इन्कम टँक्स कमिशनर देखील येथे बनू शकतो.

3) सरकारी डाँक्टर(Government Doctor) :

मित्रांनो डाँक्टरला आपण सर्व जण देवानंतरचा दर्जा देत असतो.कारण जेव्हा आपण मृत्युशी झुंजत असतो तेव्हा आपले प्राण वाचविण्याचे काम अत्यंत निष्ठेने एक डाँक्टरच करत असतो.

आणि त्यातच सरकारी डाँक्टरची आवश्यकता आज प्रत्येक ठिकाणी भासत असते.कारण सरकारी डाँक्टर हे अत्यंत कमी फी घेऊन आपल्यावर औषधोपचार करीत असतात.पण प्रायव्हेट डाँक्टरच्या तुलनेत सरकारी डाँक्टरला सर्वाधिक वेतन प्राप्त होत असते.

एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपण कोणत्या हाँस्पिटलमध्ये जाँब करतो यावर आपले आधारलेले असते.शासनाकडुन आज अशा डाँक्टरांना 30 ते 40 टक्के वेतन अधिक दिले जाते.जे शहरापासुन दुर अंतरावर खेडयापाडयातील गरीब आणि गरजू रूग्णांची सेवा करीत असतात.

भारतात आज एक सरकारी सिनिअर सर्जन महिन्याला किमान दीड ते दोन लाख इतके वेतन प्राप्त करताना दिसुन येतो.आणि जे डाँक्टर शिकाऊ म्हणजेच कमी अनुभवी आणि नवीनच डाँक्टर बनले आहेत त्यांना किमान 50 हजारापर्यत वेतन प्राप्त होत असते.

See also  शेतकरयांना फळबाग लागवडीसाठी शासन देते आहे १०० टक्के अनुदान -  Falbag Lagwad Anudan Yojana In Marathi

4) संशोधक,वैज्ञानिक(Scientist) :

आज देशासाठी वेगवेगळे शोध लावण्याचे काम वैज्ञानिक करीत असतात.

आज आपल्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जेवढेही प्रगती केली आहे त्या सर्व प्रगतीमागे आपल्या देशातील वैज्ञानिक,संशोधकांचा हात आहे.

आणि डीआर डीओ ही एक मोठी संशोधन संस्था आहे.ज्यात नोकरी प्राप्त झाल्यास आपणास उत्तम वेतन,राहणे,खाणे ह्या इतर विविध सोयीसुविधांपासुन नवनवीन गोष्टी शिकण्यापर्यत सर्वच सुविधा आपल्याला उपलब्ध होत असतात.

इथे आपणास सुरूवातीला 45 हजार 60 हजार एवढे वेतन दिले जात असते.आणि जसजशी आपल्या अनुभवात वाढ होते तसतशी बढती मिळत आपले वेतन देखील वाढत असते.

5) भारतीय नागरी सेवा:

भारतीय नागरी सेवेत उत्तीर्ण होऊन आपणास प्राप्त होत असलेल्या सरकारी नोकरीमध्ये आय ए एस आँफिसर,आयपीएस आँफिसर ह्या दोन प्रमुख आणि महत्वाच्या जाँब पोस्ट आहेत.

भारतात लाखो विदयार्थी विदयाथीनी आय एएस आय पी एस अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी दोन दोन तीन वर्षे करीत असतात.पण काही मोजकेच उमेदवार यात फायनली निवडले जात असतात.कारण ही एक अत्यंत अवघड आणि उच्च दर्जाची परीक्षा असते.जिचा अभ्यासक्रम देखील खुप अवघड मानण्यात येतो.

पण जर आपण हा अभ्यासक्रम लक्षात घेऊन वर्षभर मन लावून मेहनतीने अभ्यास करत ही कठिन परीक्षा उत्तीर्ण केली तर आपणास पुन्हा आयूष्यात कधीच मागे वळुन बघण्याची आवश्यकता नसते.

कारण यात आपणास उच्च वेतन,राहायला बंगला,प्रवास करण्यासाठी कार,बोनस सरकारी भत्ता अशा अनेक सुविधा शासनाकडुन प्राप्त होत असतात

तसेच समाजात नाव प्रतिष्ठा,प्रसिदधी देखील प्राप्त होत असते.आपल्या नावाचा एक रूबाब आणि दरारा समाजात राहत असतो.आपल्या स्वप्रातील ड्रीम लाईफ येथे आपणास जगता येत असते.

एक आय एएस तसेच आयपीएस अधिकारीचे महिन्याचे किमान वेतन हे किमान दोन ते लाख इतके असते.

6) पोस्टल भरती :

मित्रांनो पोस्ट आँफिसमध्ये केंद्र सरकारची एक छोटी मोठी का होईना नोकरी प्राप्त करण्यासाठी आज अनेक खेडयापाडयातील मुले मुली जीवाचे रान करून अभ्यास करत असतात.

See also  बी एड अणि डीएड मधील फरक _ Difference between BED and DED in Marathi

कारण इथे सुरूवातीला जरी आपणास भलेही कमी वेतन प्राप्त होत असले तरी हा एक केंद्र सरकारचा जाँब आहे ज्यात बढती मिळत गेल्यावर टप्याप्टप्याने आपले वेतन देखील वाढत असते.आणि यात आपल्याला परमनंट जाँबची हमी प्राप्त होत असते.शिवाय निवृतीनंतर पेशंनची सुविधा देखील प्राप्त होत असते.

यासाठी आपणास किमान दहावी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते.आपल्याला पोस्टाची भरती निघल्यावर ज्या पदासाठी आपणास अर्ज करायचा आहे त्याची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावे लागत असते.

नुकतीच काही दिवसांपुर्वी पोस्टाची एक भरती निघाली आहे आपण इच्छुक असाल तर आपण ट्राय करू शकता.

7) बँकिंग सेक्टर :

आज बँकिंग क्षेत्रामध्ये प्रोबेशनरी आँफिसर ही उत्तम आणि प्रसिदध पोस्ट मानली जाते.याशिवाय देखील अनेक पोस्टसाठी आपण बँकेत प्रयत्न करू शकतो.बँकेत नोकरी प्राप्त करण्याचा फायदा हा असतो की इथे आपल्याला प्रमोशन देखील लवकरात लवकर मिळत असते.

सोबत राहायला घर,मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडुन मदत म्हणुन खर्च इत्यादी सुविधा देखील आपणास प्राप्त होत असतात.

8) संरक्षण दल :

संरक्षण दलात आर्मी,नेव्ही,एअर फोर्स अशी अनेक क्षेत्रे समाविष्ट होतात.यापैकी कुठल्याही एका क्षेत्रात नोकरी करून आपण चांगले वेतन प्राप्त करू शकतो.सोबतच देशाची सेवा करण्याचे पुण्य देखील आर्मी नेव्ही तसेच एअर फोर्स मध्ये काम करून आपणास प्राप्त होत असते.

आर्मी नेव्ही एअरफोर्स भरतीसाठी वेगवेगळया परीक्षा घेतल्या जात असतात.ज्यात आपणास उत्तीर्ण व्हावे लागते.

यात आपणास किमान वेतन हे 60 हजार ते दीड लाख इतके प्राप्त होत असते.

1 thought on “भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या – Highest Paid Government Jobs In Marathi”

Comments are closed.