12 वी नंतर करता येतील अशा सरकारी नोकरी – Government Jobs After 12th In Marathi

12 वी नंतर करता येतील अशा सरकारी नोकरी – Government Jobs After 12th In Marathi

खुप विदयार्थी असे असतात ज्यांची उच्च शिक्षण घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसते.त्यामुळे ते बारावीनंतर एखादी चांगल्या पदाची चांगले वेतन असलेली सरकारी नोकरी शोधत असतात.

पण बारावीनंतर आपण कोणत्या परीक्षेचा फाँर्म भरावा?कोणती नोकरी करावी?याबाबत योग्य ते मार्गदर्शन त्यांना प्राप्त होत नसते.

अशाच 12 वी नंतर सरकारी नोकरी करण्याची ईच्छा असलेल्या गरजू विदयार्थ्यांकरीता आज आपण काही अशा सरकारी नोकरींविषयी जाणुन घेणार.ज्यात ते बारावी पुर्ण झाल्यानंतर परीक्षा फाँर्म भरून,ती परीक्षा पास होऊन एक चांगली सरकारी नोकरी प्राप्त करू शकता.

चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता जाणुन घेऊया ह्या सरकारी नोकरींविषयी अधिक सविस्तरपणे.

12 वी नंतर करता येतील अशा सरकारी नोकरी किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत?(Government Jobs After 12th In Marathi)

12 वी नंतर करता येतील अशा सरकारी नोकरयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

1)स्टाफ सिलेक्शन कमिशन एकत्रित उच्च माध्यमिक स्तर(Ssc Combined Higher Secondary Level):

2) राज्य पोलिस (State Police):

3)भारतीय संरक्षण दल( Indian Defense Services) :

4) रेल्वे भरती(Railway Recruitment) :

5) पोस्टल भरती(Postal Recruitment) :

6) स्टेनोग्राफर

1)स्टाफ सिलेक्शन कमिशन एकत्रित उच्च माध्यमिक स्तर(Ssc Combined Higher Secondary Level):

स्टाफ सिलेक्शन कमिशन तसेच इतरत्र पदांची भरती करण्याच्या हेतुने एक संयुक्त उच्च माध्यमिक स्तरीय परीक्षा आयोजित करण्यात येत असते.

ज्यात DEO(Data Entry Operator,Postal Assistant/Sorting Assistant,Junior Secretarial Assistant,Low Division Clerk अशा अनेक पदांचा समावेश होत असतो.

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी त्याची परीक्षा देण्यासाठी यात आपणास वयाची अट ही किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्ष इतकी असते.

वरील पैकी कुठल्याही एका पदासाठी आपली निवड झाल्यास आपणास सुरूवातीला किमान 18 हजार इतके वेतन प्राप्त होत असते.

2) राज्य पोलिस (State Police):

बारावीनंतर आपण पोलिस भरतीकडे वळु शकतो.यात आपण अनेक विविध पदांसाठी अर्ज करू शकतो.
उदा,Constable, Sub Police Inspector,

जर आपण दिल्ली पोलिस काँनस्टेबलचे आणि मुंब पोलिस काँन्सटेबलचे वेतन जाणुन घ्यावयास गेले तर ते
आपणास जवळजवळ 20 ते 25 हजार इतके असल्याचे दिसुन येते.

3) भारतीय संरक्षण दल( Indian Defense Services) :

भारतीय संरक्षण दलामध्ये आर्मी,नेव्ही,एअर अशा एकून तीन ठिकाणी नोकरीसाठी अर्ज भरू शकतो.

फक्त यात काही अटी असतात जसे की नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी 10+12 मध्ये आपण फिजीक्स आणि मँथ घेतलेले असणे अनिवार्य आहे.आणि त्यात किमान 35 गुण असणे आवश्यक आहे.

नौदलाअंतर्गत जी भरती होत असते ती CADED,SSR,CRSF Head Constable,Upsc NDA,NA च्या माध्यमातुन केली जात असते.

इथे आपणास सुरूवातीला 18 ते 20 हजार इतके वेतन प्राप्त होत असते.आणि इथे सातवे वेतन आयोग(7th Th Pay Commision) नुसार आपणास इथे वेतन दिले जात असते.

4) रेल्वे भरती(Railway Recruitment) :

आज रेल्वे भरती केंद्राकडुन रेल्वेमध्ये दरवर्षी किंवा वर्ष दोन वर्षातुन वेगवेगळया छोटया तसेच मोठया पदांसाठी भरती होताना आपणास दिसुन येते.

आणि ही भरती खास दहावी बारावी पास उमेदवारांसाठी आयोजित केली जात असते.या भरतीत रेल्वेमध्ये टीसी पासुन ते स्टेशन मास्टर अशा पदांसाठी भरती केली जात असते.

इथे परीक्षा फाँर्म भरण्यासाठी आपले शिक्षण फक्त दहावी किंवा बारावी उत्तीर्ण इतकेच असावे लागते.लोको पायलट आणि टेक्नीशियन या दोन पदांसाठी अर्ज करायला आपले वय किमान 18 आणि कमाल 30 असावे लागते.

टीसी आणि स्टेशन मास्टरची परीक्षा ही दोन टप्प्यात असते आधी पुर्वपरीक्षा(Preliminary Exam) आणि मुख्य परीक्षा(Mains Exam)

ह्यात टीसी पासुन ते स्टेशन मास्टर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आपणास 40 ते 45 हजार इतके वेतन प्राप्त होत असते.तसेच सोबत इतर सरकारी सुविधांचा लाभ देखील उठवता येत असतो.

तिकिट क्लार्क तसेच टायपीस्ट पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास आपणास सुरूवातीला किमान 7 हजार इतके वेतन मिळत असते जे पुढे जाऊन 15 ते 20 पर्यत देखील जात असते.

5) पोस्टल भरती(Postal Recruitment) :

डाक खात्यामध्ये देखील दहावी बारावी उत्तीर्ण विदयार्थ्यांसाठी पोस्टमन,मेल गार्ड,क्लार्क,पोस्टल असिस्टंट अशा विविध पदांसाठी भरती केली जात असते.

यात आपणास सुरूवातीला पोस्टमनमध्ये 8 ते 10 हजारापर्यत वेतन दिले जात असते.आणि मग जसजशी नोकरीत पदाची बढती होत जाते आपण हेड पोस्टमन पासुन सिनिअर क्लार्क पर्यतच्या पदापर्यत आपण पोहचु शकतो.आणि सगळयात महत्वाचे म्हणजे परीक्षा पास करून पोस्टात लागलेल्या उमेदवारांना इथे कायमस्वरूपी नोकरीची हमी प्राप्त होत असते.

शिवाय पोस्टातील इतर परीक्षांसाठी फाँर्म भरत राहुन आणि त्यात पास होऊन पोस्टात एखाद्या चांगल्या पोस्टवर देखील आपण कायमस्वरूपी नोकरी प्राप्त करू शकतो.

शिवाय निवृतीनंतर आपल्याला पेंशंनची सुविधा देखील प्राप्त होत असते.

6) स्टेनोग्राफर :

ही एक राष्टीर स्तरावरची परीक्षा आहे जी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडुन आयोजित केली जात असते.

ह्या परीक्षेला बसण्यासाठी आँनलाईन अर्ज भरायला आपण किमान दहावी किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे.

यात आपली एक लेखी परीक्षा घेतली जात असते.यात ग्रेड सी आणि ग्रेड डी साठी वेगवेगळे वेतन असते.

19 thoughts on “12 वी नंतर करता येतील अशा सरकारी नोकरी – Government Jobs After 12th In Marathi”

  1. 12 झाली आहे मला रेल्वे मध्ये जॉब भेटेल का

  2. 1 )12 झाली आहे मला रेल्वे मध्ये जॉब भेटेल का
    २) MSCT झाली आहे
    3) 30 Taping pan jali ahe

Comments are closed.