वि.दा सावरकर यांच्याविषयी माहीती – V D Savarkar Information In Marathi

Table of Contents

वि.दा सावरकर हे कोण होते? – V D Savarkar Information In Marathi

वि.दा सावरकर यांचे संपुर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते.वि.दा सावरकर हे एक भारतातील थोर क्रांतीकारक,स्वातंत्र्यसेनानी होते.

याचसोबत वि.दा सावरकर हे एक थोर राजकीय कार्यकर्ते,कवी तसेच लेखक,पत्रकार देखील होते.

याचसोबत वि.दा सावरकरांना भाषा तसेच लिपीशुदध चळवळीचे प्रणेते,हिंदुत्वाचे तत्व मांडणारे महान तत्वज्ञ म्हणुन देखील ओळखले जाते.

वि.दा सावरकर यांचा जन्म कधी आणि कोठे झाला होता?

वि.दा सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 मध्ये महाराष्टातील नाशिक जिल्हयातील भगुर येथे झाला होता.

वि.दा सावरकर यांची जयंती कधी साजरी केली जात असते?

दरवर्षी वि.दा सावरकर यांची जयंती 28 मे रोजी साजरी केली जात असते.

2022 मध्ये वि.दा सावरकर यांची जयंती कधी आहे?

2022 मध्ये वि.दा सावरकर यांची जयंती मे महिन्यात 28 तारखेला म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार आहे.

विदा सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

1857 मध्ये इंग्रजांविरूदध भारतात करण्यात आलेल्या उठावाचे वर्णन करणारा एक इतिहासविषयक ग्रंथ वि.दा सावरकर यांनी लिहिला.ज्याचे नाव 1857 चे स्वातंत्र समर असे होते.

विदा सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

सावरकरांनी लिहिलेले इतर महत्वाचे ग्रंथ तसेच त्यांचे साहित्य-

See also  हार्ड काँपी आणि साँफ्ट काँपी मधील फरक - Difference Between Hard Copy And Soft Copy In Marathi

मोपल्याचे बंड

● हिंदुत्व

● इंडियन वाँर आँफ इंडिपेंडन्स 1857

● हिंदु पद पदाशाही

● हिंदु राष्ट दर्शन

● काळे पाणी

● भारताच्या इतिहासामधील सहा सोनेरी पाने

● सावरकरांच्या कवितांचा संग्रह

● गांधी आणि गोंधळ

● क्रांतीघोष

● हिंदुत्वाचे पंचप्राण

● माझी जन्मठेप

इत्यादी.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली क्रांती संघटना कोणती?

राष्टभक्त समुह ह्या गुप्त संघटनेची स्थापणा पागे आणि म्हस्कर नावाच्या आपल्या सहकारींच्या मदतीने विदा सावरकर यांनी केली होती.

आणि ह्या गुप्त संघटनेची प्रकट शाखा ही मित्रमेळा ही होती.जिचे पुढे जाऊन अभिनव भारत ह्या संघटनेमध्ये रूपांतरण करण्यात आले होते.

वि.दा सावरकर यांचा मृत्यु कधी कोठे आणि कसा झाला होता?

वि.दा सावरकर यांचा मृत्यु 26 फेब्रुवारी 1966 रोजी महाराष्टातील दादर मुंबई येथे झाला होता.सावरकरांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय 80 पेक्षा अधिक होते म्हणून असे म्हटले जाते की वृदधाल्पकाळामुळे तसेच खुप अनशन केल्याने वेळेवर गोळया औषध न घेतल्याने झाला होता म्हणजेच सावरकरांनी स्वताच ईच्छामृत्यु स्वीकारला होता.

वि दा सावरकर यांच्या क्रांती तत्त्वावर कोणाचा प्रभाव होता?

वि.दा सावरकर यांच्या क्रांती तत्वावर जोसेफ मँझिनी,चाफेकर बंधु आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता.

वि.दा सावरकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?

वि.दा सावरकर यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर असे होते.

वि.दा सावरकर यांच्या आईचे नाव काय होते?

वि.दा सावरकर यांच्या आईचे नाव हे राधाबाई दामोदर सावरकर असे होते.

वि.दा सावरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते?

वि.दा सावरकर यांच्या पत्नीचे नाव यमुनाबाई विनायक सावरकर असे होते.

वि.दा सावरकर यांना एकूण किती अपत्ये होती?

वि.दा सावरकर यांना एकुण चार अपत्ये होती त्यात दोन मुले आणि दोन मुली होत्या.ज्यांची नावे विश्वास,प्रभाकर आणि प्रभा,शालिनी असे होते.

वि.दा सावरकर यांच्या भावंडांची नावे काय होती?

वि.दा सावरकर यांना एकूण दोन भाऊ होते त्यात धाकटया भावाचे नाव हे गणेश असे होते आणि थोरल्या भावाचे नाव नारायण असे होते.

वि,दा सावरकर यांना लोकांनी कोणती उपाधी तसेच पदवी दिली होती?

वि,दा सावरकर यांना लोकांनी स्वातंत्र्यवीर ही उपाधी तसेच पदवी देऊन सन्मानित केले होते.

वि.दा सावरकर यांचे शिक्षण-

  • वि.दा सावरकरांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे जन्मगाव नाशिक भगुर येथेच झाले.
  • तसेच पुढचे माध्यमिक शिक्षण मुंबई,पुणे येथे एल एलबीपर्यत टप्याटप्याने पार पडले.
  • पुढे मग अमेरिकेतील लंडन शहरात उच्च शिक्षणासाठी जाऊन त्यांनी बँरीस्टरची पदवी ग्रहण केली होती.
  • वि.दा सावरकरांचे विचार(सामाजिक,धार्मिक आणि राजनैतिक,शैक्षणिक,देशभक्तीपर विचार )
See also  मानवी शरीरातील प्रमुख सात चक्रांविषयी माहीती - 7 Chakra in Human body and it's meaning

सावरकरांचे देशभक्तीपर विचार –

● देहाकडुन परमेश्वराकडे जात असताना राष्ट लागत असते.आणि ह्या राष्टाचे आपण काही तरी देणे लागत असतो.

सावरकरांचे सामाजिक,धार्मिक शैक्षणिक आणि आधुनिकतावादी विचार-

● कुठलाही धार्मिक ग्रंथ ईशवराने निर्माण केलेला नसून तो मानवाने निर्माण केला आहे.

● धर्मग्रंथावर आधारीत समाज संस्था उभी करण्याचे दिवस आता संपुष्टात आले आहेत,म्हणुन आता समाज संस्थेस बुदधीवादापासुन तयार झालेल्या नव्या तत्व आणि ग्रंथांवर उभे करणे फार आवश्यक आहे.

● कुठलेही महान ध्येय प्राप्त करण्यासाठी दिलेले बलिदान कधीच व्यर्थ जात नसते.

सावरकरांचे राजकीय विचार –

● खरी युदधकला ती असते ज्यात आपल्या पक्षाची कमी आणि अन्याय करत असलेल्या पक्षाची सर्वाधिक हानी होत असते.

सावरकरांची कार्ये तसेच वैशिष्टये –

सावरकरांच्या कार्य आणि वैशिष्टयांविषयी जाणुन घ्याव्या अशा महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत-

● लंडनमधील ब्रिटिश साम्राज्याच्या मध्ये वास्तव्य करून त्यांच्यात राहुन त्यांच्याच विरोधात क्रांतिकारी चळवळ उभारणारे वि.दा सावरकर हे भारतातील पहिले क्रांतीकारक व्यक्ती होते.

● संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती म्हणुन आपणास परिचित आहे

● वि.दा सावरकर भारतातील पहिले असे लेखक आणि जगातील एकमेव साहित्यिक होते ज्यांचे पुस्तक प्रकाशित होण्याअगोदरच ब्रिटिश सरकारकडुन त्यावर बंदी घालण्यात आली होती.

● आपल्या क्रांतीकारी विचारांमुळे बॅरिस्टरची पदवी गमवावी लागणारे ते भारतातील पहिले व्यक्ती होते.यासोबत त्यांनीच भारतामध्ये स्वदेशीचा पुरस्कार करत परदेशी कपडयांची होळी देखील केली होती.

वि.दा सावरकरांच्या नावावर स्थापित करण्यात आलेल्या संस्थांची नावे-

सावरकर यांच्या कार्यास बढती देण्यासाठी ते अजुन पुढे नेण्यासाठी विविध क्षेत्रात भारतात आज अनेक संस्था कार्य करीत आहे.त्यातील काही प्रमुख संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

● वीर सावरकर फाऊंडेशन

● समग्र सावरकर साहित्य वाडमय प्रकाशन समिती

● सावरकर रूग्णसेवा मंडळ

● सावरकर गणेश मंडळ

● सावरकर साहित्य अभ्यास मंडळ(ह्या संस्थेकडुन सावरकरांवर लिखित साहित्य संम्मेलन आयोजित करण्यात येते.)

वि.दा सावरकरांच्या लिहिलेल्या कविता कोणकोणत्या आहेत?

वि.दा सावरकरांच्या लिहिलेल्या काही प्रमुख कवितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

See also  धनंजय चंद्रचूड कोण आहेत? - D Y Chandrachud Biography

● सागर प्राण तळमळला

● स्वदेशीचा फटका

● गेला अहो देश रसातळास

● सायंकाळी रानामध्ये चूकलेले कोकरू

इत्यादी.

सावरकरांवर तयार करण्यात आलेल्या काही मराठी,चित्रपट नाटक कार्यक्रमांची नावे-

● होय मी सावरकर बोलतोय(वैचारिक नाटक)

● अनादी मी अनंत मी (नाटयाविष्कार)

● व्हाँट अबाऊट सावरकर,स्वा.सावरकर (चित्रपट)

● मी विनायक दामोदर सावरकर(एकपात्री नाटक)

विदा सावरकरांवर निबंध,भाषण –

वि.दा सावरकर यांचे संपुर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते.वि.दा सावरकर हे एक भारतातील थोर क्रांतीकारक,स्वातंत्र्यसेनानी होते.याचसोबत वि.दा सावरकर हे एक थोर राजकीय कार्यकर्ते,कवी तसेच लेखक,पत्रकार देखील होते.

याचसोबत वि.दा सावरकरांना भाषा तसेच लिपीशुदध चळवळीचे प्रणेते,हिंदुत्वाचे तत्व मांडणारे महान तत्वज्ञ म्हणुन देखील ओळखले जाते.

वि.दा सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 मध्ये महाराष्टातील नाशिक जिल्हयातील भगुर येथे झाला होता.

विदा सावरकरांवर निबंध,भाषण -

वि.दा सावरकरांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे जन्मगाव नाशिक भगुर येथेच झाले.सावरकर यांना लहान पणापासुन वाचन लेखनाची अत्यंत आवड होती.त्यांचे पुढचे माध्यमिक शिक्षण मुंबई,पुणे येथे एल एलबीपर्यत टप्याटप्याने पार पडले.पुढे मग अमेरिकेतील लंडन शहरात उच्च शिक्षणासाठी जाऊन त्यांनी बँरीस्टरची पदवी ग्रहण केली होती.

सावरकर हे एक उत्तम लेखक देखील होते.1857 मध्ये इंग्रजांविरूदध भारतात करण्यात आलेल्या उठावाचे वर्णन करणारा एक इतिहासविषयक ग्रंथ देखील वि.दा सावरकर यांनी लिहिला होता.ज्याचे नाव 1857 चे स्वातंत्र समर असे होते.

या व्यतीरीक्त सावरकरांनी मोपल्याचे बंड,हिंदुत्व,इंडियन वाँर आँफ इंडिपेंडन्स 1857,हिंदु पद पदाशाही,हिंदु राष्ट दर्शन,काळे पाणी,भारताच्या इतिहासामधील सहा सोनेरी पाने,सावरकरांच्या कवितांचा संग्रह ,गांधी आणि गोंधळ,क्रांतीघोष,हिंदुत्वाचे पंचप्राण ,माझी जन्मठेप इत्यादी ग्रंथांचे देखील लेखन केले आहे.

लंडनमध्ये शिक्षण घेत असताना राष्टभक्त समुह ह्या गुप्त संघटनेची स्थापणा पागे आणि म्हस्कर नावाच्या आपल्या सहकारींच्या मदतीने विदा सावरकर यांनीच केली होती.आणि ह्या गुप्त संघटनेची प्रकट शाखा ही मित्रमेळा ही होती.जिचे पुढे जाऊन अभिनव भारत ह्या संघटनेमध्ये रूपांतरण करण्यात आले होते.

वि.दा सावरकर यांच्या क्रांती तत्वावर जोसेफ मँझिनी,चाफेकर बंधु आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता.

आपल्या क्रांतीकारी विचारांमुळे त्यांना प्रसंगी बॅरिस्टरची पदवी देखील गमवावी लागली होते असे करणारे विदा सावरकर भारतातील पहिले व्यक्ती होते.यासोबत त्यांनीच भारतामध्ये स्वदेशीचा पुरस्कार करत परदेशी कपडयांची होळी देखील केली होती.

लंडनमध्ये जेव्हा त्यांना ब्रिटीशांकडुन अटक केली गेली तेव्हा तेव्हा त्यांच्यापासुन सुटका करण्यासाठी सावरकरांना समुद्रामध्ये उडी मारून पलायन करावे लागले.पण त्यात त्यांना यश आले नही.आणि ब्रिटीशांकडुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगायला अंदमानात पाठविण्यात आले.

पण अंदमान येथील शिक्षा भोगुन आल्यानंतर देखील सावरकरांनी आपले कार्य थांबवले नाही.त्यांनी धार्मिक प्रबोधन अस्पृशयता निवारण केले.

रत्नागिरीमधील अस्पृश्यांसाठी बंद करण्यात आलेली मंदीर खुली करून जातीभेद दुर करण्याच्या कार्यात आपले अमुल्य योगदान दिले.

अशा ह्या थोर क्रांतीकारकाचा मृत्यु 26 फेब्रुवारी 1966 रोजी महाराष्टातील दादर मुंबई येथे झाला होता.

सावरकरांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय 80 पेक्षा अधिक होते म्हणून असे म्हटले जाते की वृदधाल्पकाळामुळे तसेच खुप अनशन केल्याने वेळेवर गोळया औषध न घेतल्याने झाला होता म्हणजेच सावरकरांनी स्वताच ईच्छामृत्यु स्वीकारला होता.

दरवर्षी आपण वि.दा सावरकर यांची जयंती 28 मे रोजी साजरी करत असतो.ह्या वर्षी 2022 मध्ये वि.दा सावरकर यांची जयंती मे महिन्यात 28 तारखेला म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार आहे.

आपणा सर्वाना विदा सावरकर जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा!