IVF म्हणजे काय? प्रक्रिया, तयारी व जोखीम – IVF information in Marathi

 IVF विषयी माहीती -IVF information in Marathi

आज अशी अनेक विवाहीत जोडपे(Married Couples) आहेत जे आपणास संतान प्राप्ती व्हावी यासाठी IVF Treatment करण्याचा विचार करत असतात.

पण यामध्ये दोघांनाही काही Physical तसेच Mental Obstacles तसेच Problems ला Face करावे लागत असते.

कारण IVF च्या First Cycle मध्ये यशस्वीपणे गर्भधारणा होणे हे पुर्णपणे आपल्या Physical Ability आणि Mental Condition वर Depend असते.

आपण देखील आयव्ही एफ Treatment Use करून आईवडील होऊ इच्छित आहात तर आपण हा आजचा लेख नक्की वाचायला हवा कारण आजच्या लेखात आपण IVF विषयी एकदम सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

IVF चा फुलफाँर्म काय होतो?(IVF Full Form In Marathi)

आयव्हीएफचा फुलफाँर्म In Vitro Fertilization असा होतो.

IVF म्हणजे काय?(IVF Meaning In Marathi)

IVF म्हणजेच In Vitro Fertilization ही एक प्रक्रिया असते ज्यात स्त्रीच्या अंडाशयातुन बीज घेण्यात येते.आणि ते विरयासोबत Fertilize केले जात असते.IVF म्हणजे काय?(IVF Meaning In Marathi) IVF म्हणजेच In

IVF उपचाराची प्रक्रिया कशी असते?(IVF Treatment Process In Marathi)

In Vitro Fertilization (आयव्हीएफ) ही गर्भाधानाची(Fertilization) एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंडी,शुक्राणू इन विट्रो (काचेमध्ये) एकत्र केली जात असतात.

या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या Ovulate Process चे निरीक्षण करणे आणि उत्तेजित करणे(Stimulate) त्यांच्या अंडाशयातून बीजांड किंवा (अंडी) काढून टाकणे आणि शुक्राणूंना प्रयोगशाळेतील संस्कृती माध्यमात त्यांना फलित करणे समाविष्ट आहे.

फलित अंड्याचे (झायगोट) 2-6 दिवस गर्भ संवर्धनानंतर,यशस्वी गर्भधारणा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने गर्भाशयात रोपण केले जाते.

IVF Treatment का केली जाते?आणि केव्हा केली जाते(Why Is IVF Treatment Done? And When Is It Done?)

IVF Treatment पुढील Conditions मध्ये केली जात असते-

● जेव्हा Fallopian Tube Block किंवा Damage झालेला असतो.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.

● जेव्हा पुरूषात शुक्राणुंची संख्या कमी असेल म्हणजेच Sperm Count ची कमतरता असते.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.

● जेव्हा महिलेस स्त्रीबीजाची (Ovulation) चा Problem असेल.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.

● Premature Ovarian Failure Condition असेल तेव्हा तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.

● गर्भामध्ये काही समस्या असली तर स्त्रियांना गर्भवती व्हायला अडचणी येत असतात.तेव्हा देखील IVF Treatment चा वापर केला जात असतो.

IVF Treatment केली जाण्याची इतर कारणे(-Other Reasons And Causes Of IVF Treatment

ज्या स्त्रीची Fallopian Tube काढुन टाकण्यात आलेली असते.किंवा ती स्त्री एखाद्या अनुवांशिक आजराने त्रस्त असेल ज्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाही अशा महिलेसाठी IVF Treatment चा पर्याय वापरला जात असतो.

IVF Method चा वापर करून यशस्वीपणे गर्भधारणा करण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत?(What Are The Remedies And Best Tips For Successful Pregnancy Using IVF Method?)

दिल्ली येथील मदर लँप आयव्हीएफ सेंटर येथील मेडिकल डायरेक्टर आणि आयव्हीएफ स्पेशालिस्ट डाँ एस गुप्ता यांनी IVF Method चा वापर करून यशस्वीपणे गर्भधारणा करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत जे आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.

IVF Method चा वापर करून यशस्वीपणे गर्भधारणा करण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकतो-

1) IVF ची पुर्वतयारी करावी-

See also  नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

2) Stress घेणे टाळायला हवे –

3) Acupuncture करावे –

4) सकस आणि पौष्टिक आहाराचे सेवण करावे-

5) भरपुर तसेच पुरेस पाणी पिणे-

6)कँफिनचे अतिसेवण करू नये-

7) अल्कोहोल घेणे टाळावे –

8) नेहमी डाँक्टरांच्या संपर्कात राहावे-

9) स्वताच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी-

10)पहिल्या पर्यायात अपयश आले तर दुसरा पर्याय निवडा :

1) IVF ची पुर्वतयारी करावी-

IVF Treatment ला सुरूवात करण्याअगोदर किमान तीन महिने अगोदर आपल्या मासिक पाळीच्या डेटस तसेच इतर महत्वाच्या बाबींची एखाद्या वहीमध्ये लिखित स्वरूपात नोंद करून ठेवायला हवी.

कारण Treatment घेत असताना याचा खुप फायदा आपणास होत असतो.गर्भधारणा कधी होऊ शकते?त्यात कोणत्या अडचणी आहेत?हे समजून घ्यायला डाँक्टरांना सोपे जात असते.

म्हणुन आपण IVF Treatment घेण्याअगोदर त्याची पुर्वतयारी करून ठेवायला हवी.

2) Stress घेणे टाळायला हवे –

आयुष्य म्हणजे अडीअडचणी चिंता ताण तणाव ह्या गोष्टी येणारच आहे.पण यात आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो जेवढे शक्य होईल तेवढे ताण तणावापासुन दुर राहण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.

उपचाराला सुरूवात करण्याआधी नवीन जागी राहण्यासाठी शिफ्टींग करणे,नवीन लोकेशनवर जाँब साठी जाणे करीअरमध्ये बदल करणे ह्या गोष्टी करणे शक्यतो टाळायला हवे.

आपल्याला जर आयव्हीएफ ट्रिटमेंटचा चांगला परिणाम हवा असेल तर पती आणि पत्नी दोघांनीही जास्त स्टेस घेऊ नये.कारण जेव्हा आपण जास्त स्ट्रेस घेत असतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या Fertility वर होत असतो.म्हणुन आपण आयव्हीएफ ट्रींटमेंटला सुरूवात करण्याअगोदर स्ट्रेस घेऊ नये.

3) Acupuncture करावे –

आपण आपल्यावर उपचार करत असलेल्या डाँक्टरांची परवानगी घेऊन एखाद्या Trusted Acupuncture Center मधुन उपचार घ्यायला हवे.Acupuncture Treatment चा स्त्रियांना आयव्हीएफ ट्रिटमेंट घेण्याअगोदर चांगला फायदा होत असतो.

महिलांना जर अँम्ब्रीओज ट्रान्सफर करून झाल्यानंतर लगेच एक दिवसाच्या आतच Acupuncture Treatment घेतले तर त्या महिलेस अँमाब्रीओज इंप्लांटेशन तसेच यशस्वीपणे गर्भधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरत असते.

4) सकस आणि पौष्टिक आहाराचे सेवण करावे-

IVF Treatment Successfully पुर्ण होण्याकरीता तसेच गर्भधारणा राहावी ह्यासाठी आपण आपला आहार देखील सकस आणि पौष्टिक ठेवायला हवा.

कारण अन्नातील पोषकतत्व स्त्रीयांच्या शरीरामध्ये सुदृढ एग्ज निर्माण करीत असतात.ज्याचा फायदा त्यांना गर्भधारणा करताना होत असतो.

म्हणुन स्त्रियांनी संतुलित आहाराचे सेवण करायला हवे.दिवसातुन तीन ते चार वेळेस थोडेफार का होईना सकस अणि पोषक अन्न आहारात घ्यायला हवे.

ज्यात भाजीपाला,फळे बाऊन राईस इत्यादींचा समावेश प्रामुख्याने करायला हवा.कारण याने आपल्या शरीराला विपुल प्रमाणात कर्बोदके प्राप्त होत असतात.

याने आपल्या शरीराला गर्भधारणेसाठी लागत असणारी पुरेशी उर्जा प्राप्त होत असते.

5) भरपुर तसेच पुरेस पाणी पिणे-

IVF Treatment घेण्याअगोदर महिलांनी शरीरात पुरेसे पाणी प्यायला हवे.कारण पाणी पिल्याने आपल्या रीरात जी विषारी द्रव्ये असतात ती शरीराबाहेर टाकली जात असतात.याचा फायदा हा होतो की आयव्हीएफ ट्रीटमेंटदरम्यान कुठलाही प्राँब्लेम आपणास येत नाही.

बहुतेक स्त्रिया अशा असतात ज्यांना Ovarian Hyper stimulation Syndrome चा Problem असतो.ह्याच साठी अशा महिलांना Treatment करत असताना Injection दिले जात असते.आणि हे इंजेक्शन घेत असताना जो त्रास आपणास होतो तो त्रास त्या वेदना,येणारी सुज घालवण्यासाठी आपण पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते.

ज्यांना Ovarian Hyper stimulation Syndrome चा Problem असतो अशा स्त्रियांनी दिवसातुन कमीत कमी तीन ते चार लीटर पाणी पिणे आवश्यक असते.

6)कँफिनचे अतिसेवण करू नये-

ज्या महिला दिवसातुन पाचदा तसेच त्यापेक्षा अधिक प्रमाणात काँफी पित असतात.अशा महिलांचा मिसकँरेज होण्याची दाट संभावना असते.

काँफीच नव्हे तर Soft Drink,Juice,Cock इत्यादींचे अधिक प्रमाणात सेवण केले तरी देखील शरीरातील कँफिनचे प्रमाण वाढते आणि गर्भधारणा होत नाही.

7) अल्कोहोल घेणे टाळावे –

अल्कोहोल किती घ्यावे?गर्भधारणेच्या आधी घ्यावे किती घ्यावे?कधी घ्यावे आणि गर्भधारणेनंतर किती घ्यायला हवे हा एक खुप मोठा चर्चेचा आणि वादाचा विषय आहे.

पण जर महिलांनी नियमित प्रमाणात देखील अल्कोहोलचे सेवण केले तर त्यांचे गर्भधारणा होण्याचे ५० टक्के इतके प्रमाण कमी होत असते.

See also  रोबोटिक्स म्हणजे काय? Robotics basic information Marathi

8) नेहमी डाँक्टरांच्या संपर्कात राहावे-

IVF Treatment ला सुरूवात करण्याअगोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत राहायला हवी.कधीही आपल्याला काही त्रास जाणवला अस्वस्थ वाटले तसेच मनात कशाबाबतीत भय वाटत असेल तर लगेच निसंकोचपणे आपण डाँक्टरांचा याबाबतीत सल्ला घ्यायला हवा.

9) स्वताच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी-

IVF Treatment ला सुरूवात करण्याअगोदर महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.त्यासाठी योगा एक्सरसाईज करणे,शुदध हवेत फिरणे,आपल्याला आवडेल ते काम करणे,एखादे चांगले पुस्तक वाचणे जे काम करताना आपण तणावापासुन दुर राहु ते प्रत्येक काम करायला हवे.

10) पहिल्या पर्यायात अपयश आले तर दुसरा पर्याय निवडा :

लाईफमध्ये जसे आपण प्लँन करतो तसे सर्व होतच असे नसते.म्हणुन आपण आपले फस्ट आयव्हीएफ सायकल फेल ठरले धीर न सोडता आयव्हीएफ एक्सपर्टचा याबाबत सल्ला घ्यावा ज्यात आपण सेकंड आँप्शन म्हणुन दुसरी आयव्हीएफ सायकल घेण्याचा किंवा एग डोनरचा पर्याय निवडु शकतो.

IVF Treatment विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –

1) IVF Treatment करण्यासाठी भारतात किती खर्च येतो?(Cost Of IVF Treatment In India)

IVF ही भारतातील 42 वर्ष जुनी परंतु एक अगदी New Process आहे,

IVF Treatment साठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानासह,ही सर्वात स्वस्त प्रक्रिया नाही.परंतु सहाय्यक पुनरुत्पादनाच्या सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक मानली जाते.

कोणतेही दोन IVF अनुभव कधीही एकदम सारखे नसतात.म्हणून,प्रत्येक व्यक्तीची IVF Treatment Cost त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आवश्यकतांवर अवलंबून असते आणि त्यानुसार ती बदलू शकते.

तथापि,भारत देशामध्ये IVF Treatment प्राप्त करण्याची किमान किंमत(Minimum Cost) सुमारे 70,000 (Indian Rupees) इतकी आहे.

IVF Treatment च्या एका Cycle चा Success Rate 50/72% असतो जो पेशंटच्या Specific Characteristics वर अवलंबून असतो.

म्हणून,गर्भाशयात फलित गर्भाच्या यशस्वी रोपणासाठी IVF Treatment मध्ये अनेक सायकल्सची आवश्यकता असू शकते.

सरासरी, प्रत्येक IVF सायकलची Cost अंदाजे 70,000 ते 1,25,000 Inr असते IVF Treatment चा खर्च देखील रूग्णालयानुसार बदलत असतो.

भारतातील काही उच्च-स्तरीय रुग्णालये,जसे की क्लाउडनाईन हॉस्पिटल्समध्ये अनुभवी डॉक्टर/भ्रूणशास्त्रज्ञ आहेत.जे IVF उपचारांसाठी सर्वात यशस्वी आणि त्रास-मुक्त प्रक्रिया प्रदान करण्यासाठी बाजारात उपलब्ध सर्वोत्तम तंत्रज्ञान/पायाभूत सुविधांचा वापर करतात.

औषधोपचार,सल्ला मसलत आणि वास्तविक प्रक्रियेच्या खर्चासह,ही रुग्णालये IVF उपचारांच्या प्रत्येक सायकलसाठी अंदाजे 1.25 ते 3 लाख Inr इतक्या पैशांची आकारणी करत असतात.

2)IVF Treatment घेण्याचे Side Effect कोणकोणते असतात?(Side Effect Of IVF Treatment)

IVF Treatment घेण्याचा जसे फायदे असतात म्हणजेच ज्यांना नैसर्गिकरीत्या आईवडील होता येत नाहीये त्यांना आईवडील होण्याचे सुख प्राप्त होते तसेच याचे काही Side Effect देखील असतात जे आपणास माहीत असणे गरजेचे आहे.

आता आपण काही असे दुष्परिणाम जाणुन घेणार आहोत जे IVF Process मुळे होण्याची शक्यता असते.आणि याविषयी डाँक्टरांकडुन देखील खुपदा मार्गदर्शन केले जात असते.

1)Physical आणि Mental S trees :

2) Multiple Pregnancy :

3) Side Effect Of Drugs And Medicine :

4) Premature Birth :

5) Miscarriage :

6) Side Effect Of Egg Retrieval :

1)Physical आणि Mental stress:

ज्या महिला आयव्हीएफ ट्रिटमेंट करत असतात त्यांच्यावर खुप जास्त Physical आणि Mental stress येत असतो.

कारण उपचारादरम्यान स्त्रियांना विविध इंजेक्शन दिले जात असतात.ज्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक Negative Effect पडत असतात तसेच त्यांच्या शरीरात काही बदल घडताना आपणास दिसुन येतात.

याचसोबत Married Couples च्या Life वर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

2) Multiple Pregnancy :

IVF Treatment दवारे Multiple Pregnancy होऊ शकते.म्हणजेच महिला एकाच वेळेस एकापेक्षा अधिक बाळाला जन्म देत असतात.काही वेळेस तर महिला आयव्हीएफ ट्रिटमेंटमुळे एकाच वेळी तीन मुलांना म्हणजेच तिळयांना जन्म देत असतात.ज्याला इंग्रजीत Multiple Pregnancy असे म्हटले जात असते.

आणि अशा प्रकारच्या प्रेगनेन्सी फार गुंतागुंतीच्या ठरत असतात कारण यात बाळाची आई आणि बाळ या दोघांचा जिवितास धोका होण्याची देखील शक्यता असते.

See also  माती च शेतीतल महत्व - भाग -01 Importance of soil in agriculture Marathi - संकलन:- अनंत जुगेले,कृषी अधिकारी

कारण यात Multiple Birth, High Blood Pressure, Premature Birth इत्यादी समस्या उदभवत असतात.

3) Side Effect Of Drugs And Medicine :

IVF Treatment घेत असताना महिलांना Hormonal Injection दिली जात असतात.ज्यात इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी वेदना होणे,मुड स्विंग होतो,हाँट फ्लँशेज होतात.

याचसोबत महिलांची योनी देखील कोरडी पडत असते.अचानक वजनात वाढ घडुन येते,पोट फुगुन येते,स्थनांमध्ये वेदना होत असतात,डोके दुखते मळमळ जाणवते,चक्कर येत असतात,थकवा जाणवत असतो.ब्लीडिंग होत असते आणि झोप देखील पुर्ण होत नसते.अशा अनेक दुष्परिणामांना महिलांना सामोरे जावे लागत असते.

म्हणुन IVF Treatment घेण्याअगोदर महिलांनी याविषयी सर्व माहीती प्राप्त करायला हवी.कारण अशा भरपुर केसेस देखील पाहायला मिळाल्या आहेत ज्यात आयव्हीएफ ट्रिटमेंटच्या कुठल्याही साईड इफेक्टचा विचार न करता आयव्हीएफ ट्रिटमेंट घेतली आणि त्यांना याच्या अनेक साईड इफेक्टसला देखील नंतर सामोरे जावे लागले आहे.

म्हणुन महिलांनी आपल्या पतीचा कुटुंबियांना विश्वासासात घेऊन आणि डाँक्टरांचा सल्ला घेऊनच आयव्हीएफ ट्रिटमेंट घ्यायला हवी.जर डाँक्टर म्हणत असतील की तुम्ही आयव्हीएफ ट्रिटमेंट करू शकता यात कुठलीही अडचण नाही तेव्हाच आपण हे पाऊल उचलायला हवे अन्यथा नाही.

4) Premature Birth :

काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये,असे देखील निदर्शनास आले आहे की IVF ने गर्भवती झालेल्या महिलेने नऊ महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला.

तसेच बाळाचे जन्मताच वजन कमी दिसून आले. प्रसुती नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच अकाली प्रसूतीमुळे(Premature Birth मुळे) बाळाच्या आरोग्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात.

5) Miscarriage :

जरी गर्भपाताचा IVF उपचाराशी कुठलाही संबंध असल्याचा कोणताही पुरावा नसला तरी,देखील गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत गर्भपात(Miscarriage) होण्याचा धोका नेहमी कायम असतो.

गर्भपात होण्याची शक्यता देखील आईचे वय किती आहे यावर अवलंबून असते.

IVF द्वारे गर्भधारणा झाल्यानंतर तसेच गर्भपात झाल्यानंतर काही स्त्रियांना जास्त वाईट वाटत असते.

6) Side Effect Of Egg Retrival :

ह्या Process मध्ये अंडाशयातून अंडी काढून फलित झाल्यानंतर गर्भ गर्भाशयात टाकला जात असतो.

यामुळे,सौम्य क्रॅम्पिंग,योनीतून स्त्राव,स्तनाला स्पर्श करताना वेदना होणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होण्याची शक्यता असते.

100.5 डिग्री फॅरेन हाइटपेक्षा जास्त ताप असल्यास ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्यास जास्त लघवी होत असल्यास किंवा जास्त रक्तस्त्राव होणे यासारखी गंभीर लक्षणे आढळल्यास आपण त्वरीत डॉक्टरांना भेटुन त्यांचा सल्ला घ्यायला हवा.

हे दुष्परिणाम दुर्मिळ असले तरी IVF नंतर संसर्ग आणि इतर गुंतागुंत होण्याची अधिक संभावना असते.

3) आयव्हीएफ ट्रिटमेंटमध्ये अपयशी ठरण्याचे मुख्य कारण कोणते असते?(IVF Treatment Failure Reason)

खुप उपास तापास करून,देवाला साकडे घालून सुदधा जेव्हा काही दांपत्यांना नैसर्गिक रीत्या संतती प्राप्त होत नाही तेव्हा ते आयव्हीएफ ट्रिटमेंटचा पर्याय निवडत असतात.

पण आयव्हीएफ ट्रिटमेंट करून देखील काही दांपत्यांना संतान सुख प्राप्त होत नसते.IVF Treatment देखील Fail ठरत असते.आणि ह्या अपयशाची पुढील कारणे असु शकतात-

● आपण आयव्हीएफ ट्रिटमेंटसाठी कोणते क्लिनिक तसेच लँब निवडली आहे हे देखील यात महत्वाचे ठरत असते.तेथील गर्भशास्त्रज्ञांची पात्रता अनुभव याचा देखील आयव्हीएफ ट्रिटमेंटवर परिणाम होत असतो.

● काही क्रोमोसोमल विकृती(Chromosomal Abnormalities) असलेल्या भ्रूणांमुळे IVF अयशस्वी होऊ शकते.याचा अर्थ गर्भामध्ये क्रोमोसोमल डीएनएचा गहाळ,अतिरिक्त किंवा अनियमित भाग असतो.शरीर नंतर भ्रूण नाकारत असते आणि यामुळे IVF अपयशी ठरते.

● रोपण समस्या(In-plantation Issues)

याचा अर्थ भ्रूण गर्भाशयात रोपण करण्यात अयशस्वी झाले.हे गर्भाशयाच्या पॉलीप्सच्या उपस्थितीमुळे, प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमध्ये अकाली वाढ,एंडोमेट्रियल अस्तर जे खूप पातळ आहे किंवा गर्भाशयाचे संक्रमण असू शकते.

डॉ.गॉर्गी याबाबत असे म्हणतात की भ्रूण रोपण करण्यात अयशस्वी झाल्यास तो तुमचा दोष नाही,बहुतेक वेळा,रोपण समस्या कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात.

● Ovarian Response

IVF Treatment च्या Starting ला,फिमेलला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (follicle Stimulating Hormone Fsh) नावाच्या प्रजनन संप्रेरकाचे दररोज इंजेक्शन देणे आवश्यक असते.ज्याचा उद्देश अंड्याचे उत्पादन वाढवणे हा असतो.

काही महिलांचे अंडाशय या औषधाला योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि त्यामुळे गोळा करण्यासाठी अनेक अंडी तयार करण्यात अपयशी ठरतात.

डॉ. गॉर्गी याबाबत असे म्हणतात की जर अंडाशयाचा प्रतिसाद खराब झाला,तर त्याचा अर्थ IVF Treatment संपुष्टात आली असा होत नाही.

तपासणी आणि औषधोपचार मधील बदल परिस्थिती सुधारण्यास सक्षम होऊ शकतात.

डिम्बग्रंथि आरक्षिततेचे मुल्यांकन अँटी-मुलेरियन हार्मोन (Amh) साठी रक्त तपासणी आणि अँट्रा फॉलिकल(Antro Follicle Count) काउंट पाहून अल्ट्रा साऊंड स्कॅनद्वारे केले जाते.

डिम्बग्रंथि राखीव(Ovarian Reserve) तुमच्या अंडाशयांना उत्तेजित करण्यासाठी आणि वाजवी प्रमाणात अंडी तयार करण्यासाठी हार्मोनचा सर्वोत्तम प्रोटोकॉल आणि डोस निर्धारित करते.

● Embryo Quality(गर्भ गुणवत्ता)

IVF Treatment प्रयोगशाळेच्या भागादरम्यान, गर्भाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्राणू एकत्र मिसळले जात असतात.

प्रयोगशाळेत भ्रूण निरोगी दिसू शकतात,परंतु गर्भाशयात रोपण केल्यावर अदृश्य दोषामुळे ते रोपण करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता असते.

4 thoughts on “IVF म्हणजे काय? प्रक्रिया, तयारी व जोखीम – IVF information in Marathi”

Comments are closed.